स्विस रोस्टी मिक्स व्हेजिटेबल्स पॅनकेक (swiss roasty mix vegetable pancake recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

#पॅनकेक घरच्या घरी उपलब्ध असलेल्या भाज्या वापरून झटपट नाश्त्याला तयार होणाऱ्या पॅनकेक्स मधला एक नाविन्यपूर्ण प्रकार बनविण्याचा मी आज प्रयत्न केला. या रेसिपीमध्ये मी वेगवेगळ्या भाज्या वापरल्या आहे आणि माझ्या रेसिपीला आणखी पौष्टिक बनविले आहे. चला तर मग बनवूया.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1बारीक किसलेला बटाटा
  2. 1बारीक किसलेली काकडी
  3. 1बारीक किसलेला गाजर
  4. 1बारीक किसलेलेे बीट
  5. 2 चम्मचरवा
  6. 2 चम्मचतांदळाचे पीठ
  7. 2 चम्मचहिरव्या मिरची ची पेस्ट
  8. 1 चम्मचआले-लसूण पेस्ट
  9. 3 चम्मचदही
  10. 1 चम्मचतीळ
  11. 1 चम्मचतेल
  12. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एका मोठ्या बाऊल मध्ये सर्व किसलेल्या भाज्या घेऊन (बटाटा, काकडी, गाजर, बीट) एकत्र करून घ्यावे.

  2. 2

    आता त्यात रवा, तांदळाचे पीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट, आले-लसूण पेस्ट, दही, तीळ, थोडे तेल आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यावे.

  3. 3

    गॅसवर तवा किंवा फ्राय पॅन गरम करायला ठेवावे. तवा गरम झाल्यावर त्यावर 1 चम्मच तेल घालून मिक्स केलेल्या भाज्यांच्या मिश्रणाचे छोटे-छोटे हाताने गोळे करून ते गोळे तव्यावर हाताने पसरवून गोल आकार दयावा. एक बाजू फ्राय झाल्यावर दुसऱ्या बाजूला पलटवून त्यावर तेल घालून शॅलो फ्राय करून घ्यावे. अश्याच पध्दतीने बाकीचे पॅनकेक्स बनवून शॅलो फ्राय करून घ्यावे.

  4. 4

    तयार केलेले सगळे पॅनकेक्स प्लेट मध्ये ठेवून वरून तीळ गार्निश करून गरमागरम सर्व्ह करावे. आपले स्विस रोस्टी मिक्स व्हेजिटेबल पॅनकेक्स तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

Similar Recipes