कस्टर्ड बीट हलवा शॉट (custard beet halwa shots recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

दोन स्वीट डिश चे कॉम्बिनेशन करून मी ही कस्टर्ड बीट हलवा शॉट रेसिपी तयार केली आहे.

कस्टर्ड बीट हलवा शॉट (custard beet halwa shots recipe in marathi)

दोन स्वीट डिश चे कॉम्बिनेशन करून मी ही कस्टर्ड बीट हलवा शॉट रेसिपी तयार केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2 जणांसाठी
  1. कस्टर्ड बनविण्यासाठी
  2. 1/4 लिटरदूध
  3. 5 टेबल स्पूनपिठी साखर
  4. 1 टेबल स्पूनकस्टर्ड पावडर
  5. 3 टेबलस्पूनड्राय फ्रूट
  6. 1/2 टी स्पूनमीठ
  7. बीट हलवा बनविण्यासाठी
  8. 2किसलेले बीट
  9. 5 टेबलस्पूनसाखर
  10. ५० ग्रॅम खवा
  11. 4 टेबलस्पूनसाजूक तूप
  12. 2 टेबलस्पूनदूध
  13. 1/4 टीस्पूनमीठ

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम कस्टर्ड बनविण्यासाठी पाव लिटर दूधात साखर घालून गरम करायला ठेवावे. त्यातील थोडेसे थंड दूध घेऊन त्यात कस्टर्ड पावडर घालून मिक्स करावे.

  2. 2

    दुधाला उकळी आली की त्यात हे थंड दुध घालून मिक्स करावे. थोडे ड्राय फ्रूट घालावे. हे दूध फ्रीज मध्ये अर्धा तास ठेवावे.

  3. 3

    बीट हलवा बनविण्यासाठीप्रथम बीट वाफवून ते किसून घ्यावे. एका कढईत साजूक तूप घालून त्यावर हा किस टाकावा त्यात साखर व दुध घालून थोडा घट्ट करावा. नंतर त्यात खवा घालून एकजीव करून घ्यावा.

  4. 4

    आता शॉट तयार करण्यासाठी एका ग्लास मध्ये आधी बीट हलवा घेऊन मग त्यावर थंड केलेले कस्टर्द ओतले. अशाप्रकारे हे तयार झालेले कस्टर्ड बीट हलवा शॉट वरून ड्राय फ्रूट घालून सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes