गँलेट (galette recipe in marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#रेसिपीबुक #week13
इंटरनँशनलरेसिपी
गँलेट चा फ्रेंच मधील शब्दशः अर्थ बघाल तर फ्लँट केक कींवा फ्रेंच क्युझीन नुसार कींग केक जो Epiphany फीस्ट डे ला सर्व्ह केला जातो. ह्या फ्रेंच केकचे मुळ आहे Normandy Brittany ह्या राज्यात. हा केक किंवा पेस्ट्री स्वीट अँड सेव्हरी ह्या दोन्ही प्रकारात बनवली जाते. फ्लँट पेस्ट्री क्रस्टवर फळे व साखर घालून गोड गँलेट बेक केले जाते. मी सेव्हरी गँलेट बनवले ते ही रँटटुइ च्या भाज्या व साँस वापरून.

गँलेट (galette recipe in marathi)

#रेसिपीबुक #week13
इंटरनँशनलरेसिपी
गँलेट चा फ्रेंच मधील शब्दशः अर्थ बघाल तर फ्लँट केक कींवा फ्रेंच क्युझीन नुसार कींग केक जो Epiphany फीस्ट डे ला सर्व्ह केला जातो. ह्या फ्रेंच केकचे मुळ आहे Normandy Brittany ह्या राज्यात. हा केक किंवा पेस्ट्री स्वीट अँड सेव्हरी ह्या दोन्ही प्रकारात बनवली जाते. फ्लँट पेस्ट्री क्रस्टवर फळे व साखर घालून गोड गँलेट बेक केले जाते. मी सेव्हरी गँलेट बनवले ते ही रँटटुइ च्या भाज्या व साँस वापरून.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास 10 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. गँलेट क्रस्टसाठी
  2. 100 ग्रॅम मैदा
  3. 1/4 कपफ्रीजमधे थंडगार केलेले पांढरे लोणी
  4. 1/4 टीस्पूनमीठ
  5. 2 टेबलस्पूनबर्फाचे पाणी
  6. 1/4 टीस्पूनमीरपुड
  7. फीलींग साठी
  8. 1/2ग्रीन झुकीनी
  9. 1/2यलो झुकीनी
  10. 1 लहानकांदा
  11. 1मध्यम बटाटा
  12. 1 लहानगाजर
  13. 4 टेबलस्पूनटोमॅटो प्युरी
  14. 4 टेबलस्पूनटोमॅटो प्युरी
  15. 1/2कांदा बारिक चिरून
  16. 2लसणाच्या पाकळ्या किसुन
  17. 1/2 टीस्पूनसाखर
  18. 1/4 टीस्पूनचीलीफ्लेक्स
  19. 1/4 टीस्पूनओरीगँनो
  20. 1/4 टीस्पूनमीरपुड
  21. 1/4 टीस्पूनमीठ
  22. 1/2 टीस्पूनव्हीनेगर
  23. 1 टीस्पूनकाँर्नफ्लोर स्लरी
  24. 1 टेबलस्पूनबटर
  25. 1/2 कपक्रीमचीज
  26. 2 टेबलस्पूनफ्रेशक्रीम
  27. 3 टेबलस्पूनदुध
  28. 1 टेबलस्पूनबटर
  29. 7-8 पुदीन्याचे पान

कुकिंग सूचना

1 तास 10 मिनिटे
  1. 1

    मैदा व मीठ एकत्र करून त्यात लोणी घालून हाताने मिक्स करावे. ब्रेडक्रम सारखे पीठ तयार झाले की बर्फाचे पाणी घालून घट्ट पीठ भिजवून 10 मिनिटे फ्रीजमधे झाकुन ठेवावे

  2. 2

    आता टोमँटो साँस बनवण्यासाठी एका पँनमधे बटर घालून त्यावर कांदा व लसूण घालून ट्रान्सुलन्ट होइपर्यंत परतून त्यावर चीलीफ्लेक्स, ओरीगँनो, मीठ,साखर,मीरपुड घालावी. आता टोमँटो प्युरी घालून 2 मिनिटे शिजू द्यावे. व्हीनेगर घालून मिक्स करून काँर्नफ्लोर स्लरी घालून साँस घट्ट होवू लागला की गँस बंद करावा. साँस तयार आहे.

  3. 3

    आता स्टफींग च्या भाज्या धुवून स्वच्छ पुसुन घ्याव्या.झुकीनी, गाजर,बटाटा हे स्लाइसरने गोँ पातळ स्लाइस करून घ्यावे. कांदा ऊभा पातळ चिरून घ्यावा.

  4. 4

    चीजस्प्रेड बनवण्यासाठी क्रीमचीज बीटरने मऊ करून त्यात फ्रेशक्रीम घालून फेटुन एकसारखे करून घ्यावे.

  5. 5

    आता फ्रीजमधे ठेवलेल्या पीठाचे तीन गोळे करून एक गोळा गोल व मध्यम जाडीचा लाटून घ्यावा त्यावर चीजस्प्रेड लावून त्यावर स्लाइस केलेल्या भाज्या गोलाकार रचुन घ्याव्यात

  6. 6

    भाज्यांवर तयार टोमॅटो साँस घालून तयार गँलेट पींच करून फोल्ड करून घ्यावे. आपले गँलेट बेकींग साठी रेडी आहे. आता दुध व बटर एकत्र करून तयार गँलेट ला मील्क वाँश द्यावा.

  7. 7

    तयार गँलेट बेकींग डीशवर ठेवून प्रीहीटेड ओव्हनमधे 180℃ ला 30-35 मिनिटे बेक करून घ्यावे.

  8. 8

    फ्रेच गँलेट तयार आहे.गरमागरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Similar Recipes