मुगाची दाल फ्राय(Moong dal fry recipe in Marathi)

Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
Pune

#dr
भारतीय खाद्यसंस्कृतीत डाळीचा वापर अगदी रोजच्या जेवणात केला जातो. त्यातही वैविध्यपूर्ण असा ह्या डाळींचा ऊपयोग करून नवनवीन डाळीचे पदार्थ केले जातात पण रोजच्या जेवणात गरमागरम भाताचा खरा सोबती म्हणजे ही दाल फ्राय. मी ही दाल फ्राय हिरवी सालपटांची मुगाची डाळ वापरून बनवली. ह्या डाळीत सांबार मसाला व गुळ वापरल्याने वेगळीच पण खमंग चव येते #Dal

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपहिरवी सालपटांची मुगाची डाळ
  2. 1/2कांदा ऊभा चिरून
  3. 1मध्यम कांदा बारिक चिरून
  4. 1 टेबलस्पूनआल लसुण पेस्ट
  5. 1/2 कपटोमॅटो प्युरी
  6. 1/2टीस्पुन मोहरी जीरे
  7. 3 टेबलस्पूनतेल
  8. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  9. 1/2 टीस्पूनगोडा मसाला
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1/2 टीस्पूनसांबार मसाला
  12. 1/4 टीस्पूनगुळ
  13. 4-5पान कडीपत्ता
  14. 1/4 कपपाणी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    हिरवी मुगाची डाळ स्वच्छ धुवून ऊभा चिरलेला कांदा घालून 3 शिट्ट्या करून शिजवून थंड करून घ्यावी.

  2. 2

    शिजलेली डाळ थोडी हाटून घ्यावी.

  3. 3

    आता कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे घालून फोडणी तडतडल्यावर कांदा,आले-लसूण पेस्ट व कडीपत्ता घालून परतून घ्यावे. आता लाल तिखट,गोडा मसाला,हळद,मीठ चवीनुसार घालून सांबार मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे.

  4. 4

    आता फोडणीत टोमॅटोची प्युरी घालून शिजवून घ्यावे. शेवटी गुळ घालावा व शिजलेली डाळ घालून हलवून एक ऊकळी आणावी. आपली हिरवे मुग दाल फ्राय तयार आहे.

  5. 5

    गरमागरम मुग दाल फ्राय सर्व्ह करताना वरून कश्मिरी लाल मिरचीचा तडका घालून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anjali Muley Panse
Anjali Muley Panse @Anjaliskitchen_212
रोजी
Pune
I am not a Master chef,but passionate about food - the tradition of it,cooking it and sharing it😊
पुढे वाचा

Similar Recipes