चिंच गोळी (chincha goli recipe in marathi)

Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
Mumbai

#GA4 #Week1
Tamarind
माझ्या लहानपणाची ही गोष्ट.... शाळा सुटली की घरी येताना आम्ही बाजूच्या छोट्याश्या दुकानातून आईने दिलेल्या 25 पैसे-50पैसे ने ह्या आंबट गोड तिखट चवीच्या चिंच गोळ्या आवडीने घ्यायचो. आज खूप वर्षांनी पुन्हा ती आठवण जागे झाली. कूकपॅड मध्ये चिंच पासून काय नवीन बनवता येईल हा विचार करताना अचानक चिंच गोळ्याची आठवण झाली. ह्या गोळ्या पाचक सुद्धा आहे.जिभेची चव वाढवतात. अजून ह्यातील पदार्थ बरेच फायदेशीर आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
30-40 गोळ्या
  1. 1 वाटीचिंच (बिया व कठीण कवच काढून)
  2. 1 वाटीगुळ
  3. 2 टीस्पूनतूप
  4. 1/2 टीस्पूनतिखट
  5. 3 टीस्पूनकाळ मीठ
  6. 1/2 टीस्पूनहिंग
  7. 3 टीस्पूनजीर पावडर
  8. 1/2 वाटीपिठी साखर

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम 3 टीस्पून जीर भाजून दळून घ्या. साखर दळून घ्या व चिंच छान बिया व कठीण कवच काढून मिक्सर मध्ये पाणी न घालता थोडी दळून घ्या.

  2. 2

    कढई मध्ये तूप गरम करून त्यात किसलेला गुळ घाला. गॅस कमीच ठेवा. गुळ विरघळला की त्यात तिखट, काळ मीठ, हिंग, भाजून घेतलेली जीर पावडर टाका व एकत्रित करा.

  3. 3

    नंतर त्यात दळून घेतलेली चिंच टाकून मिक्स करा. थोडं घट्ट झाल्यावर गॅस बंद करून घ्या (जास्त घट्ट करू नये) व थोडं गार होऊ द्या.

  4. 4

    थोडं गार झालेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून पिठी साखर मध्ये घोळून घ्या.

  5. 5

    अश्या प्रकारे अगदी सोप्पे व पाचक अशी चिंच गोळी तय्यार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deveshri Bagul
Deveshri Bagul @Deveshri89
रोजी
Mumbai

Similar Recipes