कोबीची कुरकुरीत भजी (kobiche kurkurit bhaji recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#GA4
#WEEK14
#Keyword_Cabbage

कोबीची भजी खुप कुरकुरीत आणि चविला भन्नाट लागतात..
कोबीची भाजी ज्यांना आवडत नसेल त्यांना कोबीची भजी दिली तर नक्कीच आवडीने खाणार..

कोबीची कुरकुरीत भजी (kobiche kurkurit bhaji recipe in marathi)

#GA4
#WEEK14
#Keyword_Cabbage

कोबीची भजी खुप कुरकुरीत आणि चविला भन्नाट लागतात..
कोबीची भाजी ज्यांना आवडत नसेल त्यांना कोबीची भजी दिली तर नक्कीच आवडीने खाणार..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
पाच जणांसाठी
  1. 100 ग्रॅमकोबी
  2. 1मध्यम आकाराचा कांदा
  3. 3हिरव्या मिरच्या
  4. 1 टेबलस्पूनजिरं
  5. 1/2 टेबलस्पूनओवा
  6. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1/4 टेबलस्पूनहळद
  8. मीठ चवीनुसार
  9. 1 कपतेल
  10. चिमुटभरहिंग
  11. 3 टेबलस्पूनतांदूळ पीठ
  12. 1/2 कपबेसन पीठ

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    कोबी व कांदा लांबट आकाराचा कापून घ्यावा.

  2. 2

    कोबी व कांदा एकत्र करून त्यात मीठ घालून चांगले मिसळून घ्यावे व पंधरा मिनिटे झाकून ठेवावे.

  3. 3

    पंधरा मिनिटांनंतर त्यात लाल तिखट, हळद,हिंग,ओवा, हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे आवडीनुसार भरपूर कोथिंबीर, तांदूळ पीठ, बेसन पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.

  4. 4

    कढईत तेल गरम करून मिश्रणात दोन टेबलस्पून गरम तेल घालून भजी तळून घ्यावीत...

  5. 5

    टाॅमेटो केचअप किंवा कोणत्याही चटणी सोबत सर्व्ह करावीत... किंवा अगदी अशीच खाल्ली तरीही खुप छान लागतात..

  6. 6

    कोबीची गरमागरम कुरकुरीत भजी तय्यार.. भजीमध्ये बेकिंग सोडा घालण्याची गरज नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes