डोनट/दाल माखनी डोनट (donut recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#डोनट #सप्टेंबर #week3
डोनट--*रिश्ता वही सोच नयी*...
डोनट हा पाश्चिमात्य संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा खाद्यपदार्थ.. नेदरलँड्स मध्ये याचा जन्म होऊन याने पुढे अमेरिका खंडात पाय पसरले..आता तर याची पाळेमुळे जगभर खोलवर रुजली आहेत..सगळ्या पिढीतील लोकांचा आवडता पदार्थ..कारण हे sweet tooth प्रकरण..मी हा पदार्थ आतापर्यंत चाखलाच नाही‌..MOD shop वरुन कधी चक्कर मारली तर वाटायचे खरंच mad over donut वर का बरं एवढी फिदा ही आजची पिढी.. पाश्र्चात्यांचे अंधानुकरण असं यायचं मनात..माझ्या मुलांना देखील मी म्हणत असे..तर ते मला म्हणायचे..तू खाऊन बघ एकदा ..मग आम्ही या donut साठी का mad आहोत ते कळेल..जेव्हा थीम साठी हा पदार्थ दिला तेव्हां शोधाशोध सुरू केली..बिनअंड्याची रेसिपी हवी होती मला...एकेक रेसिपी बघता बघता लक्षात आले की यातील key ingredientमैदा,साखर,तेलकिंवातूप,तळणे,yeast ..आता 7-8तास आंबवून केलेलं पीठ आणि yeast घालून तयार झालेलं पीठ..साम्य आहेच की..मग लक्षात आले की अरेच्चा आपली #बालुशाही #ईमरती #जिलबी ताई आणि डोनट भाऊंची एकच की वंशावळ...अस्मादिकांना‌‌..आणि पहिल्यांदाच डोनट भाऊंना साकारायचा ,त्यांना रंगरंगोटी करुन सजवण्याचा मेकप करायचा घाट घातला..ह्या सगळ्या process मध्ये मी इतकी रंगून गेले होते की..आता कोण mad झालंय..असं डोनट भाऊ चिडवतात की काय असं क्षणभर वाटून गेलं मला..आणि जेव्हां डोनट भाऊंचे मेकप, फोटोसेशन पार पडले आणि त्यांना घेतलं पंगतीला माझ्याबरोबर..पहिल्या घासातच माझं दिल तो पागल है,हुआ असं झालं ना राव

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1.50 मिनीटे
10-12 सर्व्हिंग्ज
  1. 1.5 कपमैदा
  2. चिमूटभर मीठ
  3. 1/4 कपआणि 1टेबलस्पून साखर
  4. 1 टीस्पूनड्राय यीस्ट
  5. 1/2 कपकोमट दूध
  6. 1/4 कपबटर
  7. तळण्यासाठी तेल
  8. 2 टेबलस्पूनडार्क चॉकलेट सॉस
  9. 3 टेबलस्पून स्प्रिंकलर, जेम्सच्या गोळ्या
  10. 2 टेबलस्पूनव्हाईट चॉकलेट सॉस
  11. 2 टेबलस्पूनकलर्ड साॅस

कुकिंग सूचना

1.50 मिनीटे
  1. 1

    प्रथम एका बाऊलमध्ये दूध आणि बटर व्यवस्थित फेटून घ्यावे

  2. 2

    आता दुसऱ्या बाउल मध्ये मैदा मीठ साखर हे कोरडे जिन्नस चाळून घ्यावेत आणि त्यात ड्राय ईस्ट घालून मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करून घ्यावे. आता या मिश्रणात दूध आणि बटर चे मिश्रण घालून व्यवस्थित एकजीव करावे आणि पाच ते सात मिनिट चांगले मळून घ्यावे.

  3. 3

    आता हा पिठाचा गोळा टक फोल्ड करून दीड तास ओल्या फडक्याखाली झाकून ठेवावा. नंतर या पिठाला पंच करत मळून घ्यावे.आता परत पाच ते सहा मिनिटे व्यवस्थित पंच करून मळून घ्यावे.

  4. 4

    नंतर किचन टॉप वर मैदा भुरभुरून मळलेल्या पिठाची एक ते दीड सेंटिमीटर जाडीची पोळी लाटून घ्या. आणि त्या पिठाचे वाटीच्या साह्याने डोनट पाडून घ्या.

  5. 5

    आता सगळे डोनट परत पस्तीस ते चाळीस मिनिट रेस्ट करायला ठेवा.

  6. 6

    एकीकडे कढईत तेल तापत ठेवा आणि मध्यम ते मंदआचेवर सगळे डोनट सोनेरी रंगावर तळून घ्या. डोनट तेलात सोडल्यावर झार्याने थोडा press करावा..म्हणजे तो फुलतो.डोनट पूर्णपणे गार होऊ द्या.

  7. 7

    तोपर्यंत डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट मेल्ट करुन घ्या. तसंच थोड्या मेल्टेड व्हाईट चॉकलेट मध्ये कलर मिसळून ठेवा.

  8. 8

    आता आपण जो पुरीसारखा डोनट केलाय त्याच्या साईडने एखादी टोकदार वस्तू आत मध्ये घालून पोकळ करून घ्यावं आणि त्यात चॉकलेट साॅस भरावा आणि हा डोनट मेल्टेड चॉकलेट मध्ये बुडवून बाजूला ठेवा. आणि त्यावर डिझाईन करून घ्या.हा झाला आपला double trouble donut..

  9. 9

    बाकीचे डोनट व्हाईट सॉस आणि कलर्ड साॅस मध्ये डिप करून बाजूला ठेवावे आणि त्यांच्यावर कलर्ड स्प्रिंकलर तसेच जेम्सच्या गोळ्या बडीशेप च्या गोळ्या घालून डोनट डेकोरेट करावेत. येथे तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरू शकता.

  10. 10

    मी अजून एक variation केलं..घरी दाल माखनी होती..ती एका प्लेन डोनट वर सगळ्या बाजूने पसरवून त्यावर तिखट भुरभुरवून ठेवलं..हा डोनट पण खूप छान लागतो चवीला..

  11. 11

    अशा तऱ्हेने सजवलेले डोनट डिश मध्ये काढून सर्व्ह करा.

  12. 12
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

टिप्पण्या (5)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
दाल मखनी डोनट तर खूपच मस्त 👌👌💖

Similar Recipes