डोनट (donut recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#डोनट #सप्टेंबर
#week3
आज मी पहिल्यांदाच डोनट घरी केले.
माझी 6.5 वर्षांची लेक म्हणाली "आई बाहेर दुकानात मिळतात न त्याहून खूप मस्त लागत आहेत, आता तू घरीच करत जा". यम्मी यम्मी आहेत...

हे वाक्य होते तिचे पहिला घास खाल्ल्यावर.

आणि बाकीचांना पण इतके आवडले की सगळे अवघ्या 10 मिनिटांत फस्त झाले पण.....

चला तर डोनट ची रेसिपी बघूया.....

डोनट (donut recipe in marathi)

#डोनट #सप्टेंबर
#week3
आज मी पहिल्यांदाच डोनट घरी केले.
माझी 6.5 वर्षांची लेक म्हणाली "आई बाहेर दुकानात मिळतात न त्याहून खूप मस्त लागत आहेत, आता तू घरीच करत जा". यम्मी यम्मी आहेत...

हे वाक्य होते तिचे पहिला घास खाल्ल्यावर.

आणि बाकीचांना पण इतके आवडले की सगळे अवघ्या 10 मिनिटांत फस्त झाले पण.....

चला तर डोनट ची रेसिपी बघूया.....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 व्यक्तींसाठी
  1. 2 कपमैदा
  2. 1/8 टीस्पूनमीठ
  3. 1/2 कपपाणी
  4. 1.5 टेबलस्पूनबटर
  5. 3 टेबलस्पूनसाखर
  6. 2 टीस्पूनइन्स्टंट ड्राय यीस्ट
  7. 1/4 कपकोमट दूध
  8. तळण्यासाठी तेल
  9. ग्लेझिंग साठी
  10. 4 ते 5 टाबेलस्पून पिठी साखर किंवा कॅस्टर शुगर डस्टिंग साठी
  11. 50 ग्रॅमडार्क
  12. 50 ग्रॅमव्हाईट चॉकलेट
  13. 50 ग्रॅमरेग्युलर चॉकलेट
  14. डेकोरेशन साठी
  15. 2 टेबलस्पूनकलर गोळ्या
  16. 1 टेबलस्पूनजेम्स गोळ्या

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्व प्रथम थोड्या कोमट (लूक वॉर्म) दूधात साखर, घालून मिक्स करावी नंतर त्यात इन्स्टंट ड्राय यीस्ट घालून १५ मिनिटे झाकून ठेवा.

  2. 2

    १५ मिनीटानी यीस्ट एक्टीव होईल. (म्हणजे फुलते)

  3. 3

    आता एका वाडग्यात मैदा घ्या, त्यात मीठ घाला व मिक्स करा. नंतर त्यात ऍक्टिव्ह केलेलं यीस्ट घालून घ्या. थोडे चमच्याने मिक्स करा व नंतर त्यात थोडे थोडे पाणी घालून मिक्स करावे.

  4. 4

    आता ओट्यावर थोडा कोरडा मैदा भुरभुरावा. नंतर त्यावर भिजवून घेतलेला गोळा ठेवा, व तो स्ट्रेटच करून करून चांगला मळून घ्या, त्याचा चिकटपणा जाई पर्यंत.

  5. 5

    आता थोडे थोडे बटर घेऊन चांगले स्ट्रेच करून करून मळून घ्या. मऊसर गोळा होई पर्यंत.

  6. 6

    आता तो गोळा एका वाडग्यात ठेवून तो फुलण्यासाठी (दुप्पट) ठेवून द्या. व त्याला तेलाने ग्रीस करा. 20 मिनिटे झाकून ठेवावे.

  7. 7

    २० मिनीटात भिजवलेला पिठाचा गोळा डबल होईल. आता ५-१० मिनिटे व्यवस्थित मळून घ्यावे.

  8. 8

    आता त्याची थोडी जाडसरच पोळी लाटून घ्या व वाट्यांचा सहाय्याने डोनट कट करून वरुन तेलाचे ब्रशींग करा व १५ मिनिटे झाकून ठेवा.

  9. 9

    १५ मिनिटांनी पुन्हा डोनट ची साईज डबल होईल.आता तेल गरम करून मध्यम आचेवर तयार केलेले सर्व डोनट तळून घ्या. दोन्ही बाजूने डोनट व्यवस्थित तळून घ्या.

  10. 10

    काही डोनट गरम असतानाच आवडत असल्यास पीठी साखरेत घोळवून घ्या.

  11. 11

    आता डार्क चॉकलेट आणि डेअरी मिल्क कॅडबरी डबल बोईलर पद्धतीने मेल्ट करा व त्यात तयार केलेले डोनट एका बाजूने चॉकलेट मध्ये डीप करून घ्यावे.

  12. 12

    बारीक कलर गोळ्या, जेम्स च्या गोळ्यानी सजवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes