राजस्थानी दुपडी रोटी (rajasthani dupadi roti recipe in marathi)

Pradnya Patil Khadpekar
Pradnya Patil Khadpekar @cook_21077744

#पश्चिम #राजस्थान

राजस्थानी लोक प्रवास करताना ही रोटी बरोबर घेतात.छान मऊ रहाते आणि टिकते.ह्या रोटी बरोबर रसभाजी छान लागते.पण तूप आणि गूळ घालून मुलांना देण्याची पद्धत आहे.

राजस्थानी दुपडी रोटी (rajasthani dupadi roti recipe in marathi)

#पश्चिम #राजस्थान

राजस्थानी लोक प्रवास करताना ही रोटी बरोबर घेतात.छान मऊ रहाते आणि टिकते.ह्या रोटी बरोबर रसभाजी छान लागते.पण तूप आणि गूळ घालून मुलांना देण्याची पद्धत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
1 सर्विंग
  1. 250 ग्रॅम गव्हाचे पीठ
  2. 1/2 चमचामीठ
  3. 2 कपपाणी
  4. 2 चमचेतूप किंवा तेल

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    गव्हाच्या पिठात मीठ,तूप पातळ करून घालावे.पाणि घालून मळून घ्यावे, मऊसर गोळा बनवून घ्यावा.

  2. 2

    हे पीठ झाकून ठेवावे.कमीतकमी 20 मिनिटे झाकून ठेवावे.नंतर छोटे गोळे करून घ्यावेत,एक गोळा लाटून घ्यावा

  3. 3

    त्यावर तूप लावून घ्यावे, थोडं कोरड पीठ पसरवून घ्याव.दुसरा गोळा लाटून घ्यावा.आणि पहिल्या पोळी वर ठेवावा.

  4. 4

    आता पोळी पूर्ण लाटून घ्यावी.तवा गरम करून घ्यावा त्यावर पोळी भाजून घ्यावी. भाजताना, मलमलच्या कपड्याने दाबून दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यावी.

  5. 5

    काढून दोन्ही पोळी वेगळ्या करून घ्या.तूप आणि गूळ बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Patil Khadpekar
Pradnya Patil Khadpekar @cook_21077744
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes