खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi)

Trupti Temkar-Bornare
Trupti Temkar-Bornare @cook_26301660

#GA4 #week 5
Keyword काजू

खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही (khoya kaju makhana with white gravy recipe in marathi)

#GA4 #week 5
Keyword काजू

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिट
४ जणांसाठी
  1. 1चिरलेला कांदा१
  2. 3चिरलेली हिरवी मिरची
  3. 3-4लसूण पाकळ्या
  4. 1/2 इंचअदरक
  5. १ टीस्पून जीर
  6. १ टीस्पून मगज/टरबूज (पांढरे) बीया
  7. 5-6काळे मीरे
  8. 5-6लवंग
  9. 1 छोटातुकडा दालचिनी
  10. 1तमालपत्र
  11. 2-3हिरवी इलायची
  12. चवीनुसार मीठ
  13. १ टीस्पून साखर
  14. १ टीस्पून किचन किंग मसाला
  15. १ वाटी काजू
  16. १ वाटी मखाने
  17. १ चमचा कस्तुरी मेथी
  18. १ वाटी दूध
  19. १ वाटी मावा/ खवा
  20. 2 चमचेफ्रेश क्रीम
  21. 3-4 चमचेबटर
  22. २-३चमचे तेल

कुकिंग सूचना

तीस मिनिट
  1. 1

    सर्वप्रथम वर दिल्याप्रमाणे सर्व साहित्य काढून घेणे. गॅस वर एक पॅन गरम करून त्यात थोडे पाणी घालावे पाणी गरम झाल्यावर त्यात चिरलेला कांदा,दालचिनी,लवंग,काळेमिरे,सात ते आठ काजू,मगज बीया,जिरे,हिरवी मिरची, लसूण,अद्रक, दोन ते तीन हिरवी इलायची घालून पाणी कमी होईपर्यंत शिजवून घ्यावे. हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरला याची पेस्ट बनवून घ्यावी.

  2. 2

    नंतर एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घेऊन त्यात मखाने व काजू मंद आचेवर बदामी रंग येईपर्यंत परतून घ्यावे.

  3. 3

    आता एका कढई मध्ये दोन चमचे तेल व दोन चमचे बटर घेऊन त्यात तमालपत्र व 1-2 हिरवी इलायची घालावी तयार केलेली पेस्ट घालून परतून घ्यावे. दोन ते तीन मिनिटे पेस्ट शिजल्यावर त्यात एक वाटी दूध व एक वाटी पाणी घालावे आणि पुन्हा एक ते दोन मिनिट शिजवून घ्यावे. आता ह्या मिश्रणामध्ये एक वाटी मावा किंवा खवा घालावा व चांगले परतून घ्यावे. यानंतर परतून घेतलेले मखाने व काजू मिक्स करावे.

  4. 4

    आता यामध्ये फ्रेश मलाई, चवीनुसार मीठ,साखर, छोटा चमचा किचन किंग मसाला,एक चमचा कस्तुरी मेथी घालावी आणि चार ते पाच मिनिट शिजवून घ्यावे गॅस बंद करावा.

  5. 5

    आता तयार आहे आपली खोया काजू मखाना व्हाइट ग्रेव्ही. ही ग्रेव्ही नान,गार्लिक नान, पराठा,फुलके सोबत गरम गरम सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Trupti Temkar-Bornare
Trupti Temkar-Bornare @cook_26301660
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes