पाटवडी रस्सा विदर्भ स्पेशल (paatvadi rassa recipe in marathi)

#cooksnap
संध्या चिमुरकर यांची रेसिपी मी ट्राय करून पाहीली. मला हा रस्सा फार आवडतो. मी तिखट कमी खाणारी असल्याने थोडे कमी तिखट वापरून बनवीले.
विदर्भातील प्रसिद्ध पदार्थ आहे हा.हा रस्सा झनझनीत तिखट असतो. पण पाटवडी मुळे तो खायला मजा येते. पाटवडी रस्स्यात बुडवून खायची पोळी सोबत.
पाटवडी रस्सा विदर्भ स्पेशल (paatvadi rassa recipe in marathi)
#cooksnap
संध्या चिमुरकर यांची रेसिपी मी ट्राय करून पाहीली. मला हा रस्सा फार आवडतो. मी तिखट कमी खाणारी असल्याने थोडे कमी तिखट वापरून बनवीले.
विदर्भातील प्रसिद्ध पदार्थ आहे हा.हा रस्सा झनझनीत तिखट असतो. पण पाटवडी मुळे तो खायला मजा येते. पाटवडी रस्स्यात बुडवून खायची पोळी सोबत.
कुकिंग सूचना
- 1
कढईत तेल गरम करून त्यात फोडणी करावी आणि लसूण बारिक चेचून घाला सोबत जिरे घालून परता नंतर पाणी घालावे आता लाल तिखट 1/2टेबलस्पून आणि चवीनुसार मीठ घालून पाणी उकळू द्यावे. उकळी आली की त्यात बेसन पीठ टाकत टाकत हलवावे. किंवा पिठ आधीच थंड पाण्यात भिजवून घ्यावे व ते हळूहळू सोडावे.
- 2
छान घोटावे. तेल थोडे जास्त असावे म्हणजे वड्या छान पडतात. एक वाफ येऊ द्यावी. गोळा बनायला लागला की गॅस बंद करावा कोथिंबीर घालून सर्व एकत्र करावे.
- 3
गरम गरम तेल लावलेल्या ताटात हाताने थापून घ्यावे. पाण्याचा हात लावला तरी चालेल. थापून लगेचच वडी पाडून घ्यावे.
- 4
या वड्या तेलात तळून घ्या.
- 5
कढईत पुन्हा तेल गरम करत ठेवावे आता त्यात खडा मसाला घालून परतवावे नंतर त्यात कांदा घालावा व विरघळून जाईपर्यंत हलवावे. टोमॅटो बारिक चिरून घालावा.खोबर्याचे वाटण हि परतवावे. सोबत मीठ, लाल तिखट, हळद, धने, जिरे पूड घालून हलवून घ्यावे.
- 6
मसाला चांगला भाजू द्या अगदी तेल सुटेपर्यंत. यात शेगंदाणा कुट ऑप्शनल आहे. आवडत असल्यास घालावे. खोबर्याचे वाटणातच खसखस बारिक करून घालावी. नंतर पाणी घालून उकळू द्यावे.
- 7
सर्व्ह करताना गरमागरम रस्सा आणि सोबत पाटवडी. मग ते मांडे,रूमाली रोटी, चपाती, फूलका, रोटी किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावे. जास्त तिखट रस्सा असतो विदर्भात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मटन ताबंडा रस्सा (mutton tambada rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमत#मटन ताबंडा रस्सानाॅनव्हेज रेसिपीज मध्ये अनेक रेसिपी बनवल्या जातात पण कोल्हापूरी ताबंडा रस्सा खायला मजा येते कारण ही तसेच आहे झनझनीत गरमागरम रस्सा आणि बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी चूरून खायला जि मजा येते आणि मधे मधे भूरके मारत रस्सा पिताना जी चव रेंगाळते ती अजब असतं ते.पावसाळी वातावरण थंडावा निर्माण करत आणि मटनाचा रस्सा ती थंडी पळवतो. Supriya Devkar -
भरलेल्या वांग्याचा रस्सा (bharali wangi rassa recipe in marathi)
भरलेली सुकी वांगी तर खायला आवडतातच पण जर त्याच भरलेल्या वांग्याचा थोडासा रस्सा ही असेल तर आणखीनच खायला मजा येते.मला वांग भात खायला आवडतो आणि तुम्हाला.? Supriya Devkar -
विदर्भ स्पेशल पाटवडी रस्सा (patwadi rassa recipe in marathi)
#डिनरसाप्ताहिक डिनर प्लॅनरशुक्रवार- पाटवडी रस्सावैदर्भीय लोक जेवण्याच्या बाबतीत अतिशय आग्रही. वैदर्भीयांचा आदरातिथ्याचा गुण तर सर्वश्रुतच आहे. विदर्भ म्हटलं की "सावजी' हे नाव हमखास येणारच. सावजी ग्रेव्ही, सावजी मटण, पाटोड्या, कोथिंबीरवड्या ही विदर्भाची खासियतच. अशीच एक खास वैदर्भीय पाककृती पाटवडी रस्सा सादर करीत आहे. Deepti Padiyar -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#KS3 विदर्भ विशेष मध्ये मी आज नागपूर प्रसिद्ध पाटवडी रस्सा ही पाककृती बनवली आहे,मी तिकडे कधीच गेलेले नाही पण एकूण व वाचून या पदार्थबाबत मला समजले व मी आज केली .खरतर आमच्याकडे या वड्या आम्ही आधीपासूनच करतो पण नागपूर ला या वडी सोबत रस्सा करायची व खायची पध्दत आहे.तर मग बघूयात कशी करायची ही रेसिपी Pooja Katake Vyas -
नागपुर स्पेशल झणझणीत पाटवडी रस्सा (patwadi rasa recipe in marathi)
#cf महाराष्ट्राच्या गावरान रेसिपी खूप प्रसिद्ध आहे आणि विदर्भाची स्पेशल झणझणीत पाटवडी रस्सा भाजी ची चव वेगळीच आहे R.s. Ashwini -
भरली वांगी (bharli vangi recipe in marathi)
#KS3 विदर्भात तिखट खूप खातात .भरलेली रस्सा वांगे तर लोकं तेल घालून खातात. हि झनझनीत तिखट वांगी अनेक प्रकारे बनवली जातात. Supriya Devkar -
पाटवडी रस्सा किंवा पाटोडी रस्सा (patwadi rassa recipe in marathi)
#डिनर #साप्ताहिक डिनर प्लॅनर #शुक्रवार#पाटवडी रस्सा पाटवडी रस्सा महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीचा एक अविभाज्य घटक.. नागपूर विदर्भातील एक पारंपारिक चमचमीत आणि झणझणीत पदार्थ.. नाव काढताच तोंडाला पाणी सुटते. साधारणपणे पावसाळ्यात केली जाणारा हा पदार्थ.. जेव्हां भाज्या मिळत नाहीत किंवा भाज्यांची कमतरता असते त्यावेळेस बाहेर धो-धो पाऊस आणि घरात गरमागरम पाटवडी रस्सा बेत .. अफलातून कॉम्बिनेशन.. खरंतर विदर्भातील, नागपुरातील जेवण हे देखील कोल्हापूर सारखेच चमचमीत आणि झणझणीत.. नागपूर म्हटले की आठवतो तो सावजी रस्सा .. नाका तोंडातून धूर काढणारा.. त्याचप्रमाणे हा पाटवडी रस्सा .. लालबुंद रंगाचा..विदर्भात,नागपुरात घरी पाहुणे यायचे म्हटले की पुडाची वडी, पाटवडी रस्सा,श्रीखंड.. हा बेत हमखास असतोच तसेच लग्नसमारंभात लग्न घरी पुडाची वडी,पाटवडी रस्सा आणि श्रीखंड हा बेत हवाच.. लेकी बाळी उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी आल्या की त्यांच्या आया हा बेत हमखास करणारच.. आणि आपल्या लेकींना प्रेमाने खाऊ घालणार .आईचं प्रेम ते ..कुठल्याही प्रदेशात राहणारी आई असो..त्या भागातील जे प्रसिद्ध व्यंजन आहे ते आपल्या मुलीसाठी माहेरी आल्यावर करतेच करते.असो..तर विदर्भाची स्पेशालिटी असलेला पाटवडी रस्सा मी पहिल्यांदाच करून बघितलेला आहे.. चमचमीत झणझणीत पाटवडी रस्सा अफलातून झालाय.. सगळ्यांनाच नाविन्यपूर्ण पदार्थ खूप आवडला.. Cookpad मुळे वेगवेगळ्या प्रदेशातील नवनवीन रेसिपी करायला मिळतात आणि चाखून बघायला मिळतात.. खूप खूप आभार..🙏 चला माह्या किचन कडे..सांगते तुमाले पाटवडी रश्श्याची गोष्ट..😊 Bhagyashree Lele -
मटण ताबंडा रस्सा (mutton tambda rassa recipe in marathi)
#GA4 #week3 #muttonमटण हा क्लू वापरून बनवलेले मटण ताबंडा रस्सा. सागंली कोल्हापूर भागात झनझनीत तिखट ताबंडा रस्सा खाल्ला जातो. मटनावरची तर्री पाहूनच मटनाची चव कळते. सागंली,सातारा, कोल्हापूर भागात बोकडाचे मटण बनवले जाते तर पुणे भागात बहुतांशी बोल्हाई चे मटण खाल्ले जाते. मटण ताजे आहे का हे त्याच्या रंगावरून कळते. ताजे मटण हे गुलाबी रंगाचे असते तर खूप वेळ कापून ठेवलेले मटण डार्क गुलाबी रंगाचे असते. Supriya Devkar -
पाटवडी रस्सा (patvadi rassa recipe in marathi)
#विदर्भ #महाराष्ट्र लाल चटाकेदार महाराष्ट्रीयन स्पेशल पाटवडी रस्सा! Jaishri hate -
-
पाटवडी (patvadi recipe in marathi)
#KS3मसाला पाटवडी , रस्सा पाटवडी , फ्राय पाटवडी.विदर्भ स्पेशल..! kalpana Koturkar -
मटकी रस्सा (matki rassa recipe in marathi)
#cfमटकी रस्सा हा फक्त पोळी सोबत नव्हे तर मिसळ मध्ये ही खाल्ला जातो. झनझनीत तिखट असेल तर उत्तमच कारण मटकी काहीशी गोड असते. Supriya Devkar -
पाटवडी रस्सा (patwadi rassa recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र#पाटवडी रस्सामस्त रस्सा भाजी व मिक्स पिठाची गरम भाकरी कांदा म्हणजे संडे मेजवानी Charusheela Prabhu -
मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा (chicken rassa recipe in marathi)
#ks5#मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सामराठवाडा झणझणीत पदार्थांसाठी प्रसिद्ध.. आणि तो झणझणीत काळा मसाला....खाल्ल्याशिवाय खरंच चव नाही कळणार....तर्री.....दार रस्सा.... आज मीही तुमच्यासाठी घेऊन आले आहे मराठवाडा स्पेशल झणझणीत चिकन रस्सा......बघूया... Namita Patil -
आलू बोंडा रस्सा (aloo bonda rassa recipe in marathi)
आलू बोंडा रस्सा हा विदर्भातील प्रसिध्द पदार्थ आहे.जसा मुंबईत बटाटा वडा- पावासोबत खाल्ला जातो तसेच विदर्भात आलू बोंडा म्हणजेच बटाटा वडा झणझणीत पातळ चण्याच्या उसळीसोबत ज्याला रस्सा किंवा तर्री म्हणतात खाल्ला जातो. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
मटण पांढरा रस्सा (pandhra rassa recipe in marathi)
#GA4 #week3#मटणमटण म्हटले की आठवतो तो कोल्हापूरचा पाढंरा आणि ताबंडा रस्सा. तर आज आपण पाहूयात पाढंरा रस्सा.पाढंरा रस्सा हा नारळाचा दुधापासून बनवला जातो. अप्रतिम चवीचा हा रस्सा प्यायला मोहीनीच घालतो. Supriya Devkar -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#डिनर प्लॅनर चॅलेंज#पाटवडी रस्सायामधील आजची माझी ही शेवटची रेसिपी मी पाठवत आहे. पाटवडी रस्सा यालाच आमच्याकडे रसपट वडी म्हणतात. आमच्या घरात आम्हा सर्वांनाच अतिशय आवडणारा हा मेनू. वरण, भात, तूप, लिंबू आणि रसपट खरंच अप्रतिमच बेत. आणि वडीही तितकीच चविष्ट... Namita Patil -
स्पेशल सावजी पाटोडी रस्सा (patodi rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक विदर्भातील स्पेशल झणझणीत सावजी स्टाईल पाटोडी रस्सा ची रेसिपी. Sarita B. -
झणझणीत पाटवडी रस्सा (Patvadi rassa recipe in marathi)
#goldenapron3 18thweek besan ह्या की वर्ड साठी झणझणीत आणि चमचमीत पाटवडी रस्सा केला आहे. भाजी नसताना हा उत्तम पर्याय आहे. भाकरी ,चपाती ,भात कशाहीसोबत मस्तच लागतो. Preeti V. Salvi -
झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा (tambda rassa recipe in marathi)
#EB5#W5"झणझणीत कोल्हापुरी तांबडा रस्सा" तांबडा आणि पांढरा रस्सा म्हटलं, की अस्सल गावरान चव जिभेवर रेंगाळते नाही का!!!!, नॉनव्हेज प्रेमींच्या आवडीचा विषय म्हणजे तांबडा-पांढरा रस्सा, यात चिकन किंवा मटण आपापल्या आवडीनुसार वापरले जाते..आणि खास थंडीच्या दिवसात तर या झणझणीत आणि मसालेदार रश्श्याला खूपच चव येते नाही का.....!!!!चला तर मग झटपट अशी रेसिपी पाहूया . Shital Siddhesh Raut -
व्हेज पांढरा रस्सा (veg pandra rassa recipe in marathi)
#EB4#W4 आज माज्या शहरातील खूप प्रसिद्ध अशी पाककृती मी शेयर करत आहे ती म्हणजे व्हेज पांढरा रस्सा.कोल्हापूर म्हणलं की शाहूची नगरी, रांगड्या मातीचं शहर, कोल्हापूर माझं माहेर, माजी जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून मला त्याचा फार अभिमान आहे व सदैव असेलच.अश्या या माज्या शहरातील बरेच पदार्थ प्रसिद्ध आहेत.तसं म्हणलं तर कोल्हापूरकर हौशी खवय्ये असतात त्यामुळे खूप व्हेज ,नॉन व्हेज पदार्थ इथे बनवले जातात व खाल्ले जातात.कोणी कोल्हापूरला आले आणि कोल्हापुरी मिसळ ,वडा खाल्ला नाही असे होत नाही तसेच कोल्हापूर चा तांबडा -पांढरा रस्सा हे तर खूप प्रसिद्ध आहे कोल्हापूर ला पण हा रस्सा नॉन व्हेज असल्याने शाकाहारी लोकांचा व्हेज पांढरा रस्सा कसा करायचा ते मी आज सांगेन करून बघा ही पाककृती अप्रतिम लागते व्हेज रस्सा पिलात तर नॉन व्हेज रस्सा वीसराल,मग बघूयात कसा करायचा तर Pooja Katake Vyas -
विदर्भ स्पेशल वांगभात
#लॉकडाऊनरेसिपीनमस्कार मंडळी 🙏तेच तेच खाऊन कंटाळा आला ना......चला तर मग माझ्या सोबत विदर्भात.......हो हो घरबसल्याच,..आज आपण ताव मारणारे आहोत ,विदर्भातील प्रसिद्ध अश्या वांगभाता वर....Anuja P Jaybhaye
-
व्हेज पांढरा रस्सा (veg pandra rassa recipe in marathi)
#KS2 महाराष्ट्र किचन स्टार ह्या आपल्या स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्र ही थीम कूकपॅड कडून सध्या दिलेली असून त्या अंतर्गत मी आज माज्या शहरातील खूप प्रसिद्ध अशी पाककृती आज शेयर करत आहे ती म्हणजे व्हेज पांढरा रस्सा. कोल्हापूर म्हणलं की शाहूची नगरी, रांगड्या मातीचं शहर, कोल्हापूर माझं माहेर, माजी जन्मभूमी व कर्मभूमी म्हणून मला त्याचा फार अभिमान आहे व सदैव असेलच.अश्या या माज्या शहरातील बरेच पदार्थ प्रसिद्ध आहेत.तसं म्हणलं तर कोल्हापूरकर हौशी खवय्ये असतात त्यामुळे खूप व्हेज ,नॉन व्हेज पदार्थ इथे बनवले जातात व खाल्ले जातात. कोणी कोल्हापूरला आले आणि कोल्हापुरी मिसळ ,वडा खाल्ला नाही असे होत नाही तसेच कोल्हापूर चा तांबडा -पांढरा रस्सा हे तर खूप प्रसिद्ध आहे कोल्हापूर ला पण हा रस्सा नॉन व्हेज असल्याने शाकाहारी लोकांचा व्हेज पांढरा रस्सा कसा करायचा ते मी आज सांगेन करून बघा ही पाककृती अप्रतिम लागते व्हेज रस्सा पिलात तर नॉन व्हेज रस्सा वीसराल,मग बघूयात कसा करायचा तर Pooja Katake Vyas -
पाटवडी रस्सा (patvadi rasa recipe in marathi)
#साप्ताहिक डिनरप्लॅनर#शुक्रवार#पाटवडी रस्सा🤤 Madhuri Watekar -
आलुबोंडा रस्सा (aloobonda rassa recipe in marathi)
#KS 3 # विदर्भ स्पेशल... आलुबोंडा रस्सा.. आलुबोंडा रस्सा म्हटला की मला अमरावतीच्या प्रसिद्ध गड्डा हॉटेल ची आठवण येते... मी पहिल्यांदा तिथेच आलुबोंडा रस्सा खाल्ला... तिखट आलुबोंडा सोबत झणझणीत रस्सा...खवय्यांसाठी मेजवानी.... एकदा हे खाल्यावर खाणारा त्याच्या प्रेमातच पडणार... Varsha Ingole Bele -
पटोडी रस्सा भाजी (patodi rassa bhaaji recipe in marathi)
#स्टफ्डव्हेज भाज्यां मधली माझे सगळ्यात फेवरेट भाजी म्हणजे पाटवडी रस्सा भाजी.आणि पाटवडी मध्ये स्टफिंग केलं म्हणजेच सोने पे सुहागा.. Ankita Khangar -
वड्याचा रस्सा (vadyacha rassa recipe in marathi)
नागपूर मध्ये वड्याचा रस्सा ही भाजी खूप प्रसिद्ध आहे..ही भाजी जास्त वडा भात असतो तेव्हा आणि श्राद्ध च्या महिन्यात (अधिकमासात,सर्वपित्री अमावास्या ला) करतात. कमी मसाले वापरून भाजी बनवली जाते.मला माहिती नव्हता की वड्याचा रस्सा कसा बनवतात नेहमी माझ्या सासूबाई(आई) ही भाजी बनवत होत्या.आजcookpad मुळे ही भाजी मी बनवली.मस्त झाली. Roshni Moundekar Khapre -
विदर्भ स्पेशल झणझणीत चुनवडी (चुनगोंडा) रस्सा/ डुबुक वड्याची भाजी (chungoda rassa recipe in marathi)
# ks3दिसते तर अंडा करी पण ही रेसिपी आहे व्हेज अंडा करी... चुन म्हणजे बेसन आणि गोंडा म्हणजे वडा पण हा वडा न तळता तयार केलेल्या रस्सा मध्ये शिजवून घेतला जातो खरचं खूप छान चव येते नेहमीच्या रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा आला की नाहीतर काही भाजी शिल्लक नसेल की ही भाजी नक्कीच करता येऊ शकते.. Rajashri Deodhar -
पाठवडी रस्सा (padvadi rassa recipe in marathi)
#डिनर# महाराष्ट्र मधील अतिशय प्रसिद्ध व पारंपरिक अशी भाजी... पाठवडी रस्सा... Priya Lekurwale -
चिकन काळा रस्सा... मराठवाडा (महाराष्ट्र) (chicken kala rassa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4 ..... भारत माझा देश आहे त्यामुळे भारतातील सर्वच राज्य मला आवडतात पूर्ण भारत फिरण्याची खूप इच्छा आहे तेथील रिसिपींचा स्वाद घायचा आहे.No. 1 वर माझे आवडते प्रांत, राज्य, पर्यटन स्थळ म्हंटले की सर्वात अगोदर महाराष्ट्र.आपल्या महाराष्ट्रात चिकन /मटण तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, हिरवा खर्डा रस्सा, काळा रस्सा बनवला जातो सर्व रस्से छानच असतात. मी नॉन व्हेज असल्यानी मला आवडतातच 😜😜 हे सगळे रेसिपी आपल्या महाराष्ट्रतील बऱ्याच पर्यटन स्थळी सहज मिळतात.माझी आजची रेसिपी माझा आई कडून शिकली आहे. तर आज मी बनवत आहे माझा आईची स्पेशल काळा रस्सा चिकन खूपच छान बनवते माझी आई. फक्त ती पातेल्यात बनवते मटण /चिकन फोडणी देऊन उकळून नंतर मसाल्यात शिजवते. आपलं कस झटपट 😄😄😜😜 कुक्करमध्ये 2 शिट्ट्या झाल्या की रस्सा तयार 🥰😊 Jyoti Kinkar
More Recipes
टिप्पण्या