क्रंची मखाना तिळगुळ (crunchy makhana tilgul laddu recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

"क्रंची मखाना तिळगुळ"

झटपट होणारी रेसिपी आणि खायला ही मस्त कुरुम...कुरुम... कुरकुरीत..
पाच मिनिटांत संपणारी..😋

क्रंची मखाना तिळगुळ (crunchy makhana tilgul laddu recipe in marathi)

"क्रंची मखाना तिळगुळ"

झटपट होणारी रेसिपी आणि खायला ही मस्त कुरुम...कुरुम... कुरकुरीत..
पाच मिनिटांत संपणारी..😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिटे
सर्व सदस्य
  1. 40 ग्रॅममखाने (दोन कप)
  2. 1/2 कपगूळ (125 ग्रॅम)
  3. 1/2 टीस्पूनवेलचीपूड
  4. 1/4 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  5. 1/2 टीस्पूनसुंठ पावडर
  6. 1 टेबलस्पूनपांढरे तीळ
  7. 2 चिमुटकाळे मीठ
  8. 2 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिटे
  1. 1

    पॅनमध्ये एक टीस्पून तूप घालून मखाना छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.. गॅस बारीक असावा. हाताने दाबून बघावे, बारीक चुरा झाला तर भाजले असे समजावे.

  2. 2

    गूळ सुरीने बारीक कापून घ्या व बाकीचे साहित्य जवळ घेऊन ठेवा

  3. 3

    मखाने प्लेटमध्ये काढून घ्या व पॅनमध्ये एक टीस्पून तूप आणि गूळ घालून बारीक गॅसवर पाक करायला ठेवा. बाजूला वाटी मध्ये पाणी घेऊन त्यात पाकाचे दोन थेंब टाकून पाक तयार झाला का ते चेक करा.. बोटांनी पाक खेचला जात असेल तर पाक झाला नाही समजावे.. आणि पाकाचे तुकडे होत असतील तर पाक तयार आहे असे समजावे

  4. 4

    काळीमिरी पावडर, काळे मीठ,तीळ,सुंठ पावडर घालून मिक्स करा व भाजलेले मखाने घालून मिक्स करा. गुळाचा पाक पुर्ण मखान्यांना कोट झाला पाहिजे.

  5. 5

    गॅस बंद करा व लगेच मखाने एका ताटात पसरवून घ्या.थोडे हात लावण्या इतपत थंड झाले की लगेचच एक एक करून वेगवेगळे करा.. थंड झाल्यावर वेगवेगळे करताना तुटतात.. मस्त क्रंची तिळगुळ मखाने तयार आहेत..

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes