राजगिरा पिठाचा हलवा (rajgira halwa recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#GA4#week6 नवरात्राचे उपवास सुरू आहेत. त्यामुळे उपवासाचे वेगवेगळ्या पदार्थाची सध्या रेलचेल आहे. अशातच राजगिर्‍याच्या पिठाचा हलवा पौष्टिक मध्ये खूपच उजवा आहे .म्हणून आज मी राजगिर्‍याच्या पिठाचा हलवा बनवला आहे . आणि त्यात गुळाचाच वापर केलाय . तसे तर सर्वजण हा हलवा बनवतात ,परंतु प्रत्येकाची पद्धत थोडीफार वेगळी असते . तर बघूया....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रॅमराजगिऱ्याचे पीठ
  2. 3 टेबलस्पूनसाजूक तूप
  3. 1/4 मेजरींग कप बारीक चिरलेला गूळ किंवा चवीनुसार गूळ
  4. 2 टेबलस्पूनआवडीप्रमाणे ड्रायफ्रूट
  5. 2 टेबलस्पूनविलायची पावडर
  6. चिमुटभर मीठ
  7. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

10 मिनीट
  1. 1

    सर्वप्रथम राजगिऱ्याचे पीठ चाळून घ्यावे गॅस सुरू करून गॅस वर ठेवावे. गरम झाल्यावर तूप टाकावे.राजगिऱ्याचे पीठ टाकावे व छान भाजून घ्यावे.

  2. 2

    गरम असतानाच त्यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकावे. त्यानंतर त्यात गूळ टाकून चांगले एकत्र करावे. गुळ विरघळायला लागेल. गूळ विरघळल्यावर, त्यात पीठ ओले होईल, इतपत पाणी टाकावे आणि चांगले मिक्स करून घ्यावे.

  3. 3

    चांगले मिक्स झाल्यावर, त्यात चिमूटभर मीठ आणि विलायची पावडर टाकावी. एक मिनिट झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. राजगिरा चा शिरा तयार झालेला असेल.

  4. 4

    हा राजगिरा चा शिरा, गरमागरम, ड्रायफ्रुट्स टाकून किंवा आवडत असेल तर खोबऱ्याचा कीस,टाकून सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes