कच्चा पपईचा हलवा (kaccha papai cha halwa recipe inmarathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#उपवास#नवरात्र#शेतातून पपया आणल्या होत्या . त्यातील एक कच्ची तर इतर पिकणाऱ्या होत्या. म्हणून मग त्या कच्च्या पपईचा काहीतरी वेगळा पदार्थ करावा, नेहमीपेक्षा, म्हणून त्याचा हलवा बनवला आहे .पौष्टिक आणि चविष्ट ....

कच्चा पपईचा हलवा (kaccha papai cha halwa recipe inmarathi)

#उपवास#नवरात्र#शेतातून पपया आणल्या होत्या . त्यातील एक कच्ची तर इतर पिकणाऱ्या होत्या. म्हणून मग त्या कच्च्या पपईचा काहीतरी वेगळा पदार्थ करावा, नेहमीपेक्षा, म्हणून त्याचा हलवा बनवला आहे .पौष्टिक आणि चविष्ट ....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 मेजरींग कप कच्चा पपई चा किस
  2. 1 मेजरींग कप दूध साईसकट
  3. 3 टेबलस्पूनसाखर
  4. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  5. 2 टेबलस्पूनसुक्‍या मेव्याचे तुकडे आवडीप्रमाणे
  6. 1/2 टीस्पूनविलायची ची पूड

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    हलव्या साठी आवश्यक सर्व सामग्री एकत्र ठेवावी. कच्ची पपई धुऊन त्याची साल काढून घ्यावी.

  2. 2

    त्यानंतर पपई किसून घ्यावी. गॅस सुरू करून त्यावर कढई ठेवावी.कढईत तूप टाकावे व त्यानंतर पपईचा किस टाकावा.तुपामध्ये कीस चांगला सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यावा.

  3. 3

    आता या भाजलेल्या किसा मध्ये साईसकट दूध टाकावे व आटवून घ्यावे. आता त्यात साखर व सुक्या मेव्याचे तुकडे टाकावे.

  4. 4

    ते चांगले मिक्स केल्यानंतर साखर पातळ होईल. तो पर्यंत फिरवत रहावे. त्यानंतर त्यात विलायची पूड टाकावी.

  5. 5

    आता हे छान एकत्र केल्यावर कच्च्या पपईचा हलवा तयार झालेला आहे. हा हलवा गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे चांगला लागतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes