ज्वारीची इडली (jowarichi idli recipe in marathi)

#MSज्वारीची ईडली खूप पौष्टिक आणि चवदार लागते ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते
-ज्वारीमध्ये फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते.
ज्वारीत लोह मोठ्या प्रमाणात असते.
लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.-
ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.
ज्वारीची इडली (jowarichi idli recipe in marathi)
#MSज्वारीची ईडली खूप पौष्टिक आणि चवदार लागते ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते
-ज्वारीमध्ये फायबर्स असल्याने अन्नाचे सहज पचन होते.
ज्वारीत लोह मोठ्या प्रमाणात असते.
लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.-
ज्वारीत असणाऱ्या तंतुमय पदार्थांमुळे पोट साफ राहते.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तीन वाट्या ज्वारी आणि दोन वाट्या उडदाची डाळ व मेथ्या पाण्यामध्ये सहा ते आठ तास बिजू घालावी
- 2
सहा ते आठ झाल्यानंतर ज्वारी आणि उडदाची डाळ वेगवेगळी मिक्सरमध्ये बारीक करावी बारीक करताना कमीत कमी पाण्याचा वापर करावा आणि जाडसर अशी पेस्ट करावी त्यामध्ये अगदी थोडेसे मीठ टाकावे आणि वरील मिश्रण बारा तासासाठी आंबवण्यासाठी ठेवून द्यायचे
- 3
बारा तास झाल्यानंतर मिश्रण पूर्ण वर फुगून येईल त्यावेळी हलक्या हाताने त्याच्यामध्ये अजुन मीठ टाकून फिरवावे आता एका कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवून द्यायचे त्याच्यावर झाकण ठेवायचं इकडे आपल्याला इडली पात्राला किंचीत तेल लावून घ्यायचा आहे आणि वरील मिश्रणाचे छोटे छोटे गोष्ट आपल्याला इडली पात्र मध्ये टाकायचे आहे कूकरच्या झाकणाला शिट्टी काढून टाकायची आणि इडली दहा मिनिटांसाठी शिजवून घ्यायची दहा मिनिट झाल्यानंतर इडली अगदी फुगून वर येते
- 4
इडली फुगून वर येते आणि परफेक्ट अशी आपली ज्वारी इडली तयार होते
- 5
चटणी तयार करण्यासाठी एका मिक्सरच्या पॉटमध्ये ओले नारळाचे तुकडे हिरव्या मिरच्या कोथिंबीर मीठ बारीक करून घ्यायचे त्यावर लिंबू पिण्याचे त्यानंतर तडका तयार करण्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचे त्यात जिरं मोहरी हिंग पडू द्यायचं ते तर पडल्यानंतर कडीपत्त्याचे पाणी टाकायची आणि चटणी वर याचा तडका टाकायचा अशा प्रकारे आपली चटणी सुद्धा तयार झाली
- 6
- 7
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट भरलेले कारले (Bharlele Karle Recipe In Marathi)
#NVRकारले भाजी खाण्याचे फायदे :कारल्यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कारले खाण्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. करल्यात असणाऱ्या अँटिऑक्सिडेंटमुळे कॅन्सर होण्यापासून रक्षण होते. कारले खाल्याने वाईट कोलेस्टेरॉल कमी ह Mrs. Snehal Rohidas Rawool -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#cpm8 रेसिपी मॅगझिन. बाजरी ह्या धान्यापासून आपल्याला एनर्जी मिळते.कॅलशियम,लोह, व्हिटॅमिन बी,असते.बाजरी खाल्ल्याने कोलॅस्ट्रोल कंट्रोल होण्यास मदत होते.फायबर असल्याने पचन व्यवस्थित होते. Pragati Hakim -
ज्वारीची खिचडी
ज्वारी मध्ये कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, प्रथिने, लोह, जीवनसत्व B3 मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे मी आज ज्वारीची खिचडी केली आहे. खूप छान झाली. तुम्ही ही नक्की करून बघा.पोटभरीचा नाश्ता. वेटलाॅस साठीही उपयुक्त. Sujata Gengaje -
ज्वारीची भाकरी (jwarichi bhakari recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो अॅसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटिन्स,लोह मिळते तसेच पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.जेवणात ज्वारीचे सेवन केल्यास लठ्ठपणा (अतिरिक्त चरबी) कमी होण्यास मदत होते. Rajashri Deodhar -
काळा तांदूळ मिनी इडली आणि मिनी डोसा.. (kada tandud mini idli and dosa recipe in marathi)
#GA4 #Week19 की वर्ड--Black Riceकाळा तांदूळ हा तांदळाचा एक प्रकार आहे. यात तंतुमय पदार्थ (फायबर), तसेच लोह व तांबे ह्या घटकांची मात्रा नेहमीच्या तांदुळापेक्षा अधिक असते. तसेच, उच्च गुणवत्तेचे वनस्पती प्रथिन असते. यात ॲंटिऑक्सिडंटची मात्राही अधिक असते.काळ्या तांदळाचे महत्वाचे फायदे..लठ्ठपणा : अनेक लोकं लठ्ठपणा वाढू नये म्हणून भात खाणे टाळतात. अशा लोकांसाठी काळे तांदूळ फायदेशीर आहेत. कारण यामुळे लठ्ठपणा कमी होतो.२. हृदय : हृदयाच्या आरोग्यासाठी काळे तांदूळ फायदेशीर आहे. यामधले फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. हे वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत करतात. याव्यतिरिक्त हे हृदय रक्तवाहिन्यांमध्ये अर्थ्रोस्क्लेरोसिस प्लेक निर्मितीची शक्यता कमी करतात ज्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते३. पचन: काळे तांदूळमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतात. जे बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करतात. पचनसंबंधित तक्रारही यामुळे दूर होतात.४. रोगप्रतिकार शक्ती : काळे तांदुळात एंथोसायनिन नामक अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळतात. जे कार्डियोवेस्कुलर आणि कर्करोग सारखे रोगांपासून बचाव करतात. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.५. अँटीऑक्सीडेंट : हे तांदुळ गडद रंगाचे आहेत. अँटीऑक्सीडेंट तत्त्वांमुळे यांचा रंग गडत असतो जे आपल्या त्वचा, मेंदु आणि डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. चला तर मग अत्यंत गुणकारी अशा काळ्या तांदळाच्या इडल्या डोसे करु या.. Bhagyashree Lele -
-
-
बाजरी, ज्वारीचा उपमा (bajari jwari upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमागोल्डन अप्रन 4च्या पझल मध्ये उपमा हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली आहे.आजचा मेनू पचायला हलका पौष्टिक भिजविलेल्या बाजरी ज्वारीचा उपमा🥘🍲बाजरी ची भाकरी खाण्याने ऊर्जा मिळते ती शरीरा साठी लाभदायक ठरते व भुक देखील लवकर लागत नाही. ही पचन क्रियेस अगदी हलकी असते ज्याने पचनक्रिया व्यवस्थित होते पचनक्रिया व्यवस्थित झाल्यास ऍसिडिटी जळजळ असे प्रकार होत नाहीत.ज्वारीत मुबलक प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे त्याने पोट साफ होण्यास मदत होते. ज्या व्यक्तींना ऍसिडिटी त्रास आहे त्यांनी चपातीच्या ऐवजी आहारात ज्वारीची भाकरी समाविष्ट करावी. ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधीचा त्रास देखील कमी होण्यास मदत होते.आज आपण बनविणार आहोत पचायला हलका पौष्टिक भिजविलेल्या बाजरी,ज्वारीचा उपमा🥘🍲 Swati Pote -
दुधी भोपळ्याचा पराठा (dudhi bhopla paratha recipe in marathi)
#GA4 #week1दुधी भोपळा आरोग्यसाठी खूप फायदेशीर आहे .यात कॅल्शियम ,लोह ,खनिजे ,आहेत .सकाळ-संध्याकाळ रस पिल्याने हृदयविकार कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते .थंडीच्या दिवसात अधिक लाभदायक असते. 12 टक्के पाण्याची असते. सर्वात महत्त्वाचे वजन कमी करण्यास उपयुक्त .केस गळती कमी होते, पचनक्रिया चांगली राहते ,एक वाटी रसात एक चमचा जायफळ पूड मिसळून लावल्यास कांती उजळते. Seema Salunkhe -
दाल कश्मिरी (daal kashmiri recipe in marathi)
#उत्तर#जम्मुकाश्मिर कोणतीही डाळ ही पौष्टीकच असते.यात प्रोटीन चे प्रमाण चांगले असते.त्यामुळे शरीराची वाढ चांगली होते.ही खास दाल कश्मिरी रेसिपी आहे जी कश्मिरमधे प्रत्येक घरी बनवली जाते.कारण थंड वातावरण असल्याने भाज्यांची कमतरता असते .म्हणून कश्मिरी लोक जास्त प्रमाणात ही दाल बनवतात.तेही घी मधे.अतिशय पौष्टीक होते.शरीराची सगळी झिज भरून निघते. Supriya Thengadi -
बहुगुणी गाजर मुळा सॅलड (bahuguni gajar mula salad recipe in marathi)
#spबहुगुणी गाजर, मुळा सॅलड आरोग्यास खूपच चांगले आहे . गाजरात ए विटामिन, कॅल्शियम ,आयर्न आहेत . डोळ्याचे आरोग्य उत्तम राहते . रोगप्रतिकारक शक्ती वाढते. व मुळ्यामुळे भूक चांगली लागते . महत्त्वाचे म्हणजे गाजर व मुळ्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते . अशाप्रकारे गाजर मुळा सॅलड तयार केले. कसे करायचे ते पाहूयात. Mangal Shah -
ज्वारी बाजरी भाकरी. (jowari bhakri recipe in marathi)
#GA4 #Week16 की वर्ड--Jowar..ज्वारी.. ज्वारीची भाकरी शरीरासाठी अतिशय पौष्टीक असून बाजरीच्या तुलनेत शीत (थंड) गुणाची, पचावयास हलकी असते. यात कर्बोदके, प्रथिने व तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे ज्वारीची भाकरी ऊर्जादायी ठरते. ज्वारीची भाकरी पचनक्रिया सुरळीत ठेवते व बद्धकोष्ठाचा त्रास कमी करते आणि मुळव्याधीचाही त्रास होत नाही..पोटाच्या विकारांवर अत्यंत गुणकारी..acidityहोत नाही. यातील तंतुमय पदार्थ व अँटीऑक्सिडेंटमुळे लठ्ठपणा, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी व रक्तातील साखर नियंत्रित ठेवणे सोपे जाते. नियमित आहारात ज्वारीची भाकरी घेतल्याने शरीरात अतिरिक्त चरबी (मेद) साठत नाही. ज्यांना वजन कमी करण्याची ईच्छा आहे त्यांनी तर रोज जेवणात ज्वारीचा समावेश करावा. हाडांची मजबुतीवर गुणकारी आहे.ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणाऱ्या अमिनो ऍसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी. ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते. ज्वारीमध्ये असणाऱ्या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो.लालपेशींचीवाढ होण्यासमदतहोते.गुगलस्त्रोत.. ज्वारी व बाजरी एकत्र करून हिवाळ्यात भाकरी खाव्यात.. चला तर मग गरमागरम भाकरी करु या. Bhagyashree Lele -
मका (कॉर्न) उसळ (makka usal recipe in marathi)
#bfr पावसाच्या दिवसात सर्वानाच हा मका हवा हवासा वाटतो. अत्यंत पौष्टिक आणि यात फायबर भरपूर प्रमाणात मिळते. कोणी भाजून खातात तर कोणी उकडून... मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. जर तुम्हाला दमल्यासारखे वाटत असेल तर किंवा काम करताना आळस येत असेल तर आहारात मक्याचा समावेश करा. त्यामुळे पोट लवकर भरते आणि उत्साह टिकून राहतो.तसेच यामुळे हृदय रोग बरा होतो. हाडे मजबूत तर होतात शिवाय दृष्टी सुधारते..अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारख्या पोटाच्या समस्या दूर होण्यास फायदा होतो. मक्यात फायबर असते त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. तर आज मी ब्रेकफास्ट साठी मक्याची उसळ केली आहे.. जी घरातील सर्वांसाठी पौष्टिक आणि भूक भागवण्यााठी एक उत्तम रेसिपी आहे.. Aparna Nilesh -
मटकी ची भाजी (matkichi bhaji recipe in marathi)
#cpm3 मटकी हा भारतीय आहारामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मोड आलेल्या मटकी मध्ये त्याच्या गुणधर्मात अजून वाढ होते. मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात. मटकीमुळे मलावरोध दूर होतो, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते, लोह भरपूर प्रमाणात असल्याने ॲनिमिया पासून संरक्षण होते, रक्तदाब कमी होतो. अशी ही बहुगुणी मटकी आहारात असणं गरजेचं आहे. सुप्रिया घुडे -
बाजरीची खिचडी (bajrichi khichdi recipe in marathi)
#cpm8 बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते. बाजरीमध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) अधिक असून, ते पचनक्रियेसाठी मदत करतात. बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. मधुमेही व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी लाभदायी ठरते. तर अशा बहुगुणी बाजरीची खिचडी मी बनवली आहे. सुप्रिया घुडे -
शेवग्याच्या शेंगा - बटाटा भाजी (shevgyachya shenga batata bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4माझे आवडते पर्यटन शहर - नाशिकशेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे -शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. शेवग्याच्या शेंगांप्रमणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटामिन सी असते. ज्यामुळे थकवा दूर होतो.यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे हाडे मजबूत होतात.यात लोह असते ज्यामुळे रक्ताची कमतरता दूर होते.यात झिंक असते ज्यामुळे स्पर्म काऊंट वाढतो. तसेच फर्टिलिटी वाढते.यात व्हिटामिन ए असते. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते.यात प्रोटीन्स असल्यामुळे मसल्स आणि अॅब्स मजबूत होतात.हे खाल्ल्याने चयापचय क्रियेचा वेग वाढतो तसेच वजन कमी होण्यास मदत होते.यात पोटॅशियम असते. हृदयरोगांपासून बचाव होतो.यात फायबर्स जास्त असतात.ज्यामुळे डायजेशन सुधारते. Sampada Shrungarpure -
बार्बेक्यू इडली
#इडली.....काही तरी वेगळे करायचा प्रयत्न केला...आणि तो सफल झाला ...मस्त लागते ही रेसिपी तुम्ही सुद्धा करून बघास्वाती सारंग पाटील
-
तिरंगा कलर इडली चटणी (tiranga idli chutney recipe in marathi)
#26#तिरंगाकलरइडलीचटणी#idli#इडलीइडली हा भारतातला साउथ भागातला सर्वात लोकप्रिय सर्वात जास्त खाल्ला जाणारा नाश्त्याचा प्रकार आहे शिवाय खूप पौष्टिकही माझ्या घरात तर साउथ इंडियन डिशेश चे खूपच फॅन आहे. आठवड्याच्या प्लॅनिंग मध्ये साउथ इंडियन डिश नक्की असते. मी दिलेली इटलीची रेसिपी मी माझ्या पॉटलक च्या तेलगु फ्रेंड करून शिकून घेतली आहे माझ्या सासूबाई चेन्नईच्या असल्या मुळे ऑरेंज कलर ची चटणी मी त्यांच्याकडून शिकून घेतली आहे (कांदा टोमॅटोची चटणी) आमच्याकडे सर्वात जास्त ही चटणी आवडते. अशाप्रकारे 26 जानेवारी साठी पारंपारिक रेसिपी तयार केली . 26 जानेवारी साठी साउथ इंडियन मिल प्लॅन केले होते . बनवलेल्या बॅटर पासून उत्तप्पा आणि बाकीच्या बॅटर पासून इडली बनवली इडलीबरोबर तिन्ही चटण्या बनून तिरंग्याच्या ट्राय कलरचे इन्स्पिरेशन मिळाले. इडलीच्या वरून तिन चटण्या लावून तीन कलर तयार केले. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून पूर्ण भारतभर उत्सव साजरा केला जातो. या दिवशी ध्वजाचे आरोहण केले जाते शाळेत असताना शाळेच्या गोष्टी आठवतात पण आता देश प्रेम दाखवण्यासाठी कुकिंग मधुनही आपण आपल्या देशाविषयी चा आदर आणि देश प्रेम दाखवू शकतो. तिरंग्याचे तीन कलर आपल्याला खूप प्रेरणा देतात १) केसरी रंग निस्वार्थ सेवा शौर्य देशभक्तीचे प्रतीक आहे २) पांढरा रंग सत्य आणि पवित्र याचे प्रतीक आहे 3) हिरवा रंग देशाची समृद्धी धनधान्याची भरभराटी यातून दर्शवली जाते तिरंगा हा आपला राष्ट्रध्वज आहे राष्ट्रध्वज आपला सर्वांचा सन्मान व एकतेचे प्रतिक आहे. देशा विषयी आदर व्यक्त केला पाहिजे . सगळ्यांना 72 व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा Chetana Bhojak -
उपवास इडली आणि चटणी (Upvasachi Idli Chutney Recipe In Marathi)
#नवरात्री उपवास#इडली चटणी Sampada Shrungarpure -
चंद्रकला ईडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 चंद्रकोर थीम असल्याने इथे मी चंद्रकला ईडली फ्राय हा पदार्थ स्पेशली बनवत आहे. फार मजा आली असा आकार देऊन हे बनवताना. ही डिश लहान, मोठे दोघे एन्जॉय करतात. एनी टाइम खाऊ शकतो ही. Sanhita Kand -
चणाडाळीची आमटी मालवणी पद्धतीने (chana daliche amti recipe in marathi)
मोठ्या प्रमाणात फायबर्स असेलली चणाडाळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होण्यास मदत होते. चणाडाळमध्ये झिंक, कॅल्शियम, प्रोटीन सारखी पोषकतत्वे असतात. यामुळे शरीराला आवश्यक एनर्जी मिळते.तर चला आज आपण बघू मालवणी पद्धतीने चणा डाळ आमटी#dr Mrs. Snehal Rohidas Rawool -
करटोली (कंटोली)भजी (kantolechi bhaji recipe in marathi)
#msr#एक बहुगुणी रानभाजी.ही भाजी अत्यंत औषधी गुणधर्म असलेली आहे फक्त पावसाळ्यात म्हणजे जुन ते ऑगस्ट पर्यंत मिळते.चवीला रुचकर,प्रोटीनयुक्त,लोह असते नि कॅलरीज कमी म्हणून वजन कमी करण्यासाठी एकदम उत्तम. करटोल्यामधे फायटोकेमिकल्स असते ते शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करते, अॅन्टीऑक्सिडंट असल्याने रक्त शुध्द करते त्यामुळे त्वचेच्या रोगापासून बचाव होण्यास मदत होते. पचनक्रीया सुधारण्यास मदत होते.अशी ही बहुगुणी भाजी आहे तरी आठवड्यात एकदा तरी खा.चला तर कशी करायची ते बघुयात. Hema Wane -
-
रताळाच्या पुऱ्या (Ratalyacha purya recipe in marathi)
#MLRजानेवारी पासून रताळे बाजारात दिसतात. अनेकांना रताळी उकळून किंवा भाजुन खायला आवडतात. त्यात लोह, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी, सी, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, पोटॅशियम भरपुर प्रमाणात असते. रताळे सेवन केल्यास पचन क्रिया सुधारण्यास मदत होते. रताळ्या मध्ये कार्बोहाइड्रेट चे प्रमाण जास्त असते. अशा वेळी शुगर पेशंट जास्त प्रमाणात रताळे खाऊ शकत नाही. Priya Lekurwale -
-
इडली फ्राय मसाला(idli fry masala recipe in marathi)
#cooksnapमी ...ही रेसिपी..सोनल कोल्हे यांची बघुन जरा माझ्या कडून थोडे बदल करून केली आहे. Shubhangee Kumbhar -
इडली सांबार चटणी (Idli Sambar Recipe In Marathi)
#BRK #ब्रेकफास्ट रेसिपी इडली सांबार हा हेल्दी ब्रेकफास्ट आहे. आपल्या आरोग्याला फायदेशीर आपल्या शरीरातील सर्व घटकांचे पोषक मुल्ये वाढवतो. तांदुळ व डाळी पासुन इडली बनवली जाते. त्यात प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. इडलीच्या सेवनाने शरीरातील प्रोटीनची कमी भरून निघते. इडलीतील अधिक फाइबर मुळे बर्याच वेळा पर्यंत पोट भरलेले राहाते त्यामुळे वजन कंट्रोल करण्यास मदत होते. त्यातील एमिनो एसिड मुळे आपले डोके शांत राहाते . तसेच सांबार मध्ये वेगवेगळ्या डाळी व भाज्यांचा समावेश असल्यामुळे ते शरीराला पोषकच ठरते. चला तर अशा पौष्टीक इडली सांबारची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
इडली पोडी (idli podi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4आवडते पर्यटन स्थळ कर्नाटक २प्रेक्षणीय स्थळे पाहाण्याबरोबरच तेथील संस्कृती समजून घेणे आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेणे हा पर्यटनाचा मूळ उद्देश असतो. भारतातील प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती वेगळी आहे. जगभरात भारतीय खाद्यपदार्थांचे अनेक चाहते आहेत.खूप वर्षांपूर्वी आम्ही गोवा कर्नाटक फिरायला गेलो होतो. तेव्हा कर्नाटक मध्ये असताना एका हॉटेलमध्ये इडली पोडी खाल्ली होती. वेटरने प्लेटमध्ये गरमागरम इडली, नारळाची चटणी, तेलामध्ये मिक्स केलेली पोडी चटणी आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये लाल रंगाची इडली म्हणजेच इडली पोडी आणून दिली होती. मला खूप आवडली इडली पोडी. तेव्हापासून मी पोडी चटणी नेहमी करते. अगदी कधी घाई असेल इडली बरोबर चटणी करायला वेळ मिळाला नाही तर तेलात मिक्स करून ही चटणी इडली बरोबर खाऊ शकतो. इडली पोडीला मल्गापोडी पण म्हणतात. आज तुमच्या बरोबर पोडी चटणी आणि इडली पोडीची रेसिपी शेअर करतेय. स्मिता जाधव -
-
इडली चटणी सांबार (idli chutney sambar recipe in marathi)
#wdr रविवार आणि इडली सांबार यांचं हे गणित घरोघरी पाहायला मिळत.... आमच्या कडे सुद्धा रविवार ची सकाळ याच डिश ने होते Aparna Nilesh
More Recipes
टिप्पण्या