गूळ पापडी वड्या (gul papadi vadya recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#गूळ #वड्या

ही रेसिपी पटकन होते, लहान मुले तसेच वयस्कर लोकां पर्यंत सगळेच खाऊ शकतात. तसेच ह्या खूपच पौष्टिक आहेत, तसेच लहान मुलांना खाऊ व पोट भरीचे होते.

गूळ पापडी वड्या (gul papadi vadya recipe in marathi)

#गूळ #वड्या

ही रेसिपी पटकन होते, लहान मुले तसेच वयस्कर लोकां पर्यंत सगळेच खाऊ शकतात. तसेच ह्या खूपच पौष्टिक आहेत, तसेच लहान मुलांना खाऊ व पोट भरीचे होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
15 ते 20 वड्या
  1. 2 कपगव्हाचे पीठ
  2. 1आणि 1/2 कप गूळ
  3. 1 कपसाजूक तूप
  4. 1 टीस्पूनवेलची जायफळ पावडर
  5. 1/2 कपखोबरं किस
  6. 1 टेबलस्पूनखस खस
  7. 1/4 कपपाणी

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम खसखस भाजून घ्यावी खमंग

  2. 2

    आता खोबरं किस घ्या व ते खरपुस भाजून घ्यावे. जरा पण जास्त डार्क रंग नको. नाहीतर कडवट लागते

  3. 3

    आता भाजल्या वर खोबरं आणि खसखस असे दिसते

  4. 4

    आता कढई मध्ये तूप घालून घ्यावे व ते वितळले की त्यात गव्हाचे पीठ घालावे. व खमंग बदामी रंगावर भाजून घ्या

  5. 5

    गॅस बंद करा आणि चिरून घेतलेला गूळ घालून घ्या, व त्यावर पाणी घालून ते मिश्रण मिक्स करून घ्यावे

  6. 6

    आता ते मिश्रण बारीक गॅस वर ठेवा, व त्यात खोबरं, खस खस घालून घ्या. व एकजीव करून घ्या. त्यात वेलची जायफळ पावडर घालून घ्या व चांगले मिक्स करावे. गॅस बंद करावा

  7. 7

    एका ताटाला तूप लावून घ्या, व तयार मिश्रण त्यात टाकून घ्या, व थापून घ्यावे, वरून खोबरं किस लावून दाबून घ्या.

  8. 8

    आता थापलेल्या मिश्रणाच्या वड्या कापून घ्याव्या, वाड्या गार झाल्यावर खाण्यासाठी तयार.

  9. 9

    टीप:- खोबरं किस करतो तेव्हा खोबरं वाटी चा डार्क भाग स्लायडर ने काढून टाकावा. व किस करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes