मेथीची ताक भाजी (methichya taakachi bhaji recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#GA4#week7 संध्याकाळी स्वयंपाकाच्या वेळेस काय करावे, हा प्रश्न पडला असताना दही बेसन करावे असा विचार आला. पण फ्रिजमधून दही काढताना मेथी भाजी दिसली... मग विचार बदलला आणि मग मेथीची ताक भाजी तयार झाली... आतां भाजी केल्यानंतर, तळलेली हिरवी मिरची आलीच... आणि सोबत भाकरी सुद्धा.... इकडे भाकरीचा गॅस बंद केल्याबरोबर, जेवायला वाढले बघा ! गरमागरम भाकरी आणि गरमागरम ताक भाजी, सोबत तळलेली हिरवी मिरची आणि कांद्याच्या फोडी ! मग काय विचारावे लागते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 मेजरींग कप मेथीची भाजी चिरलेली
  2. 200 ग्रॅमआंबट दही
  3. 3/4मेजरींग कप बेसन चना किंवा तुरीच्या डाळीचे
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 10-12कडीपत्त्या पाने
  6. 2 टेबलस्पूनहिरवा वाटाणा
  7. 1 टीस्पूनआलेलसूण पेस्ट
  8. 1/2 टीस्पूनधने पूड
  9. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  10. 1 टेबलस्पूनतेल
  11. 1-1/2 टेबलस्पूनतिखट किंवा आवडीप्रमाणे
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. मीठ चवीनुसार
  14. पाणी आवश्यकतेनुसार
  15. थोडीशी कोथिंबीर
  16. 4 टेबलस्पूनशेंगदाणा तेल
  17. 3हिरव्या मिरच्या तुकडे करून
  18. 1 टीस्पूनजीरे मोहरी

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    प्रथम मेथी धूऊन चिरून घ्यावी. दही घेऊन त्यामध्ये बेसन टाकून चांगले घुसळून घ्यावे. गुठळ्या राहू नये याची काळजी घ्यावी. फोडणी करिता हिरवी मिरची, कढीपत्त्याची पाने, आणि वाटाणा तयार ठेवावा.

  2. 2

    गॅस सुरू करून गॅसवर कढई ठेवावे. त्यात तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, मोहरी, हिरवी मिरची, कडीपत्ता व हिरवा वाटाणा टाकावा. एक मिनिट त्यावर झाकण ठेवावे, म्हणजे वाटाणा उडणार नाही. त्यानंतर त्यात आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट, धने पूड टाकून एकत्र करावे. त्यानंतर त्यात चिरलेली मेथी टाकावी.

  3. 3

    आता मेथी मिक्स केल्यानंतर 3/4 मेजरींग कप पाणी टाकावे व दोन मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे. झाकण काढल्यावर तयार असलेले दही व बेसनाचे मिश्रण त्यात ओतावे.

  4. 4

    त्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ टाकावे व आवश्यकतेनुसार पाणी टाकावे. आपल्याला ज्या प्रमाणात बेसन घट्ट हवे असेल त्या प्रमाणात! नंतर झाकण ठेवून त्याला चार ते पाच मिनिट शिजू द्यावे. शिजल्यानंतर त्यावर कोथिंबीर टाकुन मिक्स करावे. अशा रीतीने मेथीची चविष्ट ताक भाजी तयार आहे.

  5. 5

    या ताकभाजी सोबत गरम केलेले तेल व तळलेली हिरवी मिरची खूप छान लागते. तेव्हा एका छोट्या कढईत, शेंगदाणा तेल गरम करून, त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे टाकावे. ते किंचित कडक झाल्यावर मोहरी आणि जीरे टाकावे. हे गरम तेल ताटामध्ये ताकभाजी वाढल्यावर त्यावर वाढावे व सोबत कांद्याच्या फोडी असल्या की गरमागरम भाकरी किंवा पोळी सोबत जेवणाची मजा काही औरच येते...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes