"पारंपारिक पद्धतीने चविष्ट मेथीची भाजी" (methichi bhaji recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

# मेथीची भाजी खुप पौष्टिक असते...हे तर आपल्या सगळ्यांना माहितच आहे..पण बरेच जण कंटाळा करतात भाजी खाण्यासाठी.मी खुप लोकांकडून ऐकले आहे म्हणे भाजी कडू लागते..पण नाही,भाजी जर तुम्ही लोखंडाच्या सुरीने कापली, किंवा लोखंडाच्या काविलत्याने हलवली तर कडू होऊ शकते....या पद्धतीने भाजी बनवली तर अजिबात कडू होत नाही.. चला तर मग माझी रेसिपी बघुया..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिटे
दोन
  1. 2 कपमेथीची भाजी
  2. 1कांदा
  3. 5सहा लसणाच्या पाकळ्या
  4. 3चार हिरव्या मिरच्या
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. चिमुटभरहिंग
  7. 2 -3 टेबलस्पूनशेंगदाणे कूट
  8. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

दहा मिनिटे
  1. 1

    भाजी निवडून स्वच्छ धुवून घ्यावी..

  2. 2

    कांदा, हिरवी मिरची,लसूण बारीक कापून घ्यावे.. शेंगदाणे भाजून साल काढून मिक्सरमध्ये ओबडधोबड वाटून घ्यावे..

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे, लसुण, मिरची तळून घ्यावेत हिंग, कांदा घालून चांगले परतून घ्यावे.

  4. 4

    फोडणी मध्ये भाजी घालावी व एक दोन वेळा हलवुन घ्यावी.. मीठ, शेंगदाणे कूट घालून अर्धा कप पाणी घालावे व चांगले मिक्स करावे झाकण ठेवून बारीक गॅसवर ंंशिजू द्यावी

  5. 5

    पाच सहा मिनिटांनंतर झाकण काढून भाजी हलवुन घ्यावी.. सुकी झाली की गॅस बंद करावा..व चपाती भाकरी सोबत सर्व्ह करावी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes