मनचाऊ सूप (Manchow Soup recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#GA4 #week10
# मनचाऊ सूप
आज आपल्या भारतात सर्वांना चायनीज पदार्थ खूप आवडतात . फ्राइड राइस, हाक्का नुडल्स व मनचाऊ सूप हे त्यातील काही पदार्थ. सूप हे कीवर्ड घेऊन मी मनचाऊ सूप केले आहे.

मनचाऊ सूप (Manchow Soup recipe in marathi)

#GA4 #week10
# मनचाऊ सूप
आज आपल्या भारतात सर्वांना चायनीज पदार्थ खूप आवडतात . फ्राइड राइस, हाक्का नुडल्स व मनचाऊ सूप हे त्यातील काही पदार्थ. सूप हे कीवर्ड घेऊन मी मनचाऊ सूप केले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनीटे
2 माणसांसाठी
  1. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोबी
  2. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली हिरवी सिमला मिरची
  3. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेले गाजर
  4. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेला पातीचा कांदा
  5. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कांदा पात
  6. 1/4 टेबलस्पूनबारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या
  7. 1/4 टेबलस्पूनबारीक चिरलेले आले
  8. 1बारीक चिरलेली हिरवी मिरची
  9. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेले मशरूम
  10. 1 टेबलस्पूनकाॅर्नफ्लाॅवर
  11. 2 टेबलस्पूनरेड चिली सॉस
  12. 2 टेबलस्पूनडार्क सोया साॅस
  13. 2 टेबलस्पूनपाणी
  14. 1/4 टेबलस्पूनह्विनेगर
  15. 5 वाटिव्हेजीटेबल स्टाॅक
  16. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

20 मिनीटे
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या बारीक चिरून घ्याव्यात.

  2. 2

    गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवावे. त्यात लसूण व आलं घालावे.

  3. 3

    त्यात कांदा, गाजर व कोबी घालावी.

  4. 4

    हिरवी मिरची, मशरूम व सीमला मीरची घालावी.

  5. 5

    त्यात रेड चिली सॉस व सोया साॅस घालून मिक्स करून घ्यावे. आता त्यात व्हेजीटेबल स्टाॅक घालावा व चांगले उकळू द्यावे.

  6. 6

    सूपला उकळी आल्यावर त्यात काॅर्नफ्लाॅवरची पेस्ट घालून सतत ढवळत रहावे. शेवटी कांदा पात घालावी व 2 मिनीटानंतर गॅस बंद करावा.

  7. 7

    गरमागरम सूप व तळलेले नुडल्स वाटी मध्ये काढून सर्ह्र करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes