दाल मखनी विथ जीरा राईस (dal makhani with jeera rice recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#उत्तर
#पंजाब
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर दाल मखनी जिरा राईस ही रेसिपी शेअर करते. पंजाब मध्ये ही दाल मखनी खूपच फेमस आहे. खरं तर दाल मखनी तंदुरी रोटी पराठा सर्व बरोबर छान लागते पण मी आज दाल मखनी ची रेसिपी जीरा राईस बरोबर शेअर करतेय.
हे कॉम्बिनेशन खूपच मस्त लागते नक्की ट्राय करा 🙏🥰

दाल मखनी विथ जीरा राईस (dal makhani with jeera rice recipe in marathi)

#उत्तर
#पंजाब
नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्याबरोबर दाल मखनी जिरा राईस ही रेसिपी शेअर करते. पंजाब मध्ये ही दाल मखनी खूपच फेमस आहे. खरं तर दाल मखनी तंदुरी रोटी पराठा सर्व बरोबर छान लागते पण मी आज दाल मखनी ची रेसिपी जीरा राईस बरोबर शेअर करतेय.
हे कॉम्बिनेशन खूपच मस्त लागते नक्की ट्राय करा 🙏🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
  1. १५० ग्राम" काळे उडीद
  2. ३० ग्राम राजमा
  3. 2-3टोमॅटो
  4. 4-5लसूण पाकळ्या
  5. 1 इंचआलं
  6. 2 टेबलस्पूनमलाई
  7. 2 टेबलस्पूनबटर
  8. 2 टीस्पूनलाल तिखट पावडर
  9. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  10. मीठ
  11. तेल
  12. २०० ग्राम"बासमती तांदूळ
  13. 2 टीस्पूनजीरा
  14. कोथिंबीर

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    आदल्या रात्री काळे उडीद, राजमा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घालावेत. ही डाळ आठ ते दहा तास भिजल्यावर परत एकदा धुऊन कुकरमध्ये घालावी. मग त्यामध्ये टोमॅटो पेस्ट,१ टी स्पून लाल तिखट पावडर व मीठ,१ टी स्पून अमूल बटर हे सर्व घालून पाणी घालून शिजवून घ्यावी.

  2. 2

    डाळ शिजे पर्यंत आपण जिरा राईस ची तयारी करून घेऊयात. तांदूळ स्वच्छ धुऊन साधारण दहा मिनिटे भिजत घालावेत.त्यानंतर भिजलेले तांदूळ एक वाटी तांदूळ असेल तर दोन वाटी पाणी या रेषा प्रमाणे पाणी घालून आपल्याला भात तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ घालावे. अशा पद्धतीने भात तयार करून घ्यावा. भात तयार झाल्यावर तो एका प्लेटमध्ये काढून पसरून ठेवावा म्हणजे भात मोकळा होतो.

  3. 3

    आता कुकरमध्ये शिजवलेली डाळ मऊ शिजलेली आहे की नाही हे चेक करून दाल मखनी साठी आपण फोडणी करून घेणार आहोत.एका पॅनमध्ये तेल अमूल बटर गरम करण्यासाठी ठेवावे मग त्यामध्ये लाल तिखट पावडर मीठ कसुरी मेथी आणि आलं-लसणाची पेस्ट घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. मग ही सगळी फोडणी शिजलेल्या कुकरमधील डाळीवर आपल्याला घालायची आहे. मग आपल्याला हवे तेवढे ग्रेव्ही होण्यासाठी थोडे पाणी घालून मिश्रण मिक्स करावे.मग त्यामध्ये दोन टेबलस्पून मलाई घालून ही दाल मखनी साधारण मंद आचेवर 15 ते 20 मिनिटे उकळू द्यावी

  4. 4

    आता आपण तयार केलेला भात थंड झालेला आहे त्याचा पण आता जीरा राईस बनवून घ्यावे एका कढईमध्ये तेल गरम करुन तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे घालावेत व्यवस्थित तडतडल्यावर त्यामध्ये मीठ व तयार केलेला भात व कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे. हा झाला आपला जीरा राईस तयार.

  5. 5

    आताही दाल मखनी व जीरा राईस गरमागरम सर करण्यासाठी रेडी आहे दाल मखनी सर्व्ह करताना त्यावर अमूल बटर घालावे. ही दाल मग तुम्ही तंदुरी रोटी,पराठा या बरोबर ही खाऊ शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
रोजी

Similar Recipes