दाल मखनी (dal makhani recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

दाल मखनी हा पंजाबी पदार्थ आहे. अतिशय स्वादिष्ट व पौष्टिक, प्रथिने युक्त आहे.भरपूर बटर,क्रिम असल्याने खूप चं चवदार होते. दाल मखनी पंजाब मध्ये रात्रभर तंदुर च्या निखारा वर ठेवून शिजवतात.त्यामुळे डाळी व मसाल्यांचा फ्लेवर त्यात उतरतो..झकाससस लागते.

दाल मखनी (dal makhani recipe in marathi)

दाल मखनी हा पंजाबी पदार्थ आहे. अतिशय स्वादिष्ट व पौष्टिक, प्रथिने युक्त आहे.भरपूर बटर,क्रिम असल्याने खूप चं चवदार होते. दाल मखनी पंजाब मध्ये रात्रभर तंदुर च्या निखारा वर ठेवून शिजवतात.त्यामुळे डाळी व मसाल्यांचा फ्लेवर त्यात उतरतो..झकाससस लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1-1.5 तास
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपअख्खे उडीद
  2. 1/4 कपराजमा
  3. 1दालचिनी तुकडा
  4. 1 तमालपत्र
  5. 1 मसाला वेलदोडा
  6. छोट चक्र फुल
  7. 1.5 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  8. 3/4 कपटोमॅटो प्युरी
  9. 2 टेबलस्पूनतूप फोडणी साठी
  10. 1/2 कपक्रीम
  11. 3/4 टेबलस्पूनलोणी
  12. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  13. 1.5 टेबलस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  14. मीठ चवीनुसार
  15. 1 टीस्पूनकसूरी मेथी

कुकिंग सूचना

1-1.5 तास
  1. 1

    सर्व प्रथम साहित्य गोळा करून घ्यावे. अख्खे उडीद व राजमा स्वच्छ धुवून घ्यावेत व भिजवून घ्यावे. उडीद 4-5 तासात भिजते व राजमा रात्रभर भिजवून घ्यावे.

  2. 2

    नंतर प्रेशर कुकर मध्ये उडीद व राजमा,खडे मसाले व थोडं मीठ घालून 4-5 शिट्ट्या काढून शिजवून घ्यावे

  3. 3

    एका कढईत तूप गरम करावे व त्यात आलं लसूण पेस्ट घालावी.छान परतून झाली की टोमॅटो प्युरी घालावी.मंद आचेवर तूप सुटे पर्यंत परतून घ्यावे.काश्मिरी लाल तिखट घालावे. आता शिजवून घेतलेले मिश्रण घालावे.

  4. 4

    लोणी,गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर उकळू द्यावे. गरज वाटल्यास अजून पाणी घालावे. नंतर कसूरी मेथी व क्रीम घालून उकळून घ्यावे. नान/पराठा/स्टीम राईस सोबत सर्व्ह करू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21
रोजी
I love cooking and trying new recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes