मिरची टोमॅटोचा ठेचा (mirchi tomotacha thecha recipe in marathi)

जान्हवी आबनावे
जान्हवी आबनावे @cook_27681782

#GA4 #week13
#keyword chille
मिरची ही रोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा घटक आहे. तिचे आयुर्वेदीक अनेक फायदे आहेत. अशा या मिरचीचा ठेचा, खर्डा, चटणी तोंडी लावायला मस्तच वाटते. अगदी नुसती तळलेली मिरची सुद्धा आपण आवडिने खातो. मिरची टोमॅटो ठेचा हा झणझणीत, आंबट आणि लसणाची एक वेगळीच चव आणणारी रेसिपी आहे..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१0 मिनिटे
२ व्यक्तींसाठी
  1. 15हिरव्या मिरच्या कमी तिखटाच्या
  2. 1/4 कपलसूण ठेचून घेतलेला
  3. 2टोमॅटो बारीक चिरून
  4. 1/2 टीस्पूनजीरे
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

१0 मिनिटे
  1. 1

    मिरचीचे एक इंचाचे तुकडे करून घ्यावे. लोखंडी तव्यावर किंवा कढईत दोन टेबलस्पून तेल घेऊन मिरच्या ½ मिनिटे परतून घ्यावे.

  2. 2

    मिरच्या एका बाजूला करून मध्यभागी तेलात जीरे घाला. जीरे फुलले कि लसूण घालून ½ मिनिटे परतून घ्यावे.

  3. 3

    लसूण आणि मिरची एकञ छान रगडून घ्यावे. मी स्मॅशरने रगडले आहे. चांगले एकजीव करून घ्यावे.

  4. 4

    आता टोमॅटो आणि मीठ घालून परतून घ्यावे. स्मॅशरने मिश्रण रगडून घ्यावे. टोमॅटो मऊसर झाला कि गॅस बंद करावा. टोमॅटो खूप शिजवू नये.

  5. 5

    तयार ठेचा भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
जान्हवी आबनावे
रोजी

Similar Recipes