शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

#GA4 #week17
#शाही पनीर रेसिपी

शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)

#GA4 #week17
#शाही पनीर रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिटे
5 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामपनीर
  2. 2मोठे कांदे
  3. 3टोमॅटो
  4. 15-20काजू
  5. 1/2 कपफ्रेश क्रीम
  6. 2 टेबलस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  7. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 1 टीस्पूनगरम मसाला
  9. 1 टेबलस्पूनकसुरी मेथी
  10. 1तमालपत्र
  11. 4-5लवंग
  12. 5-6काळी मिरी
  13. 4हिरवा वेलदोडा
  14. 1मसाला वेलदोडा
  15. 2 तुकडेदालचिनी
  16. 2 टेबलस्पूनबटर
  17. 2 टेबलस्पूनतेल
  18. चवीनुसारमीठ
  19. आवश्यकतेनुसार पाणी
  20. 6-7लसूण पाकळ्या
  21. 1 इंचआले
  22. 2हिरवी मिरची

कुकिंग सूचना

30-40 मिनिटे
  1. 1

    प्रथम कांदे, टोमॅटो बारीक चिरून घेणे. आले लसूण पेस्ट करून घेणे. काजू 1/2 तास भिजत घालावेत. आता चिरलेल्या कांदे, मिरची यांची पेस्ट करून घेणे. टोमॅटो ची ही पेस्ट करून घेणे. भिजलेल्या काजुची पेस्ट करून घेणे. खडे मसाले प्लेट मध्ये काढून घेणे.

  2. 2

    आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये आवडीप्रमाणे तेल आणि बटर घालून घेणे. ते गरम झाले कि त्या मध्ये खडे मसाले घालून 2 मिनिटे परतून घेणे. आता त्यात कांदा पेस्ट घालावी. ती पेस्ट 3-4 मिनिटे गुलाबी रंगावर परतून घेणे. त्या मध्ये आले लसूण पेस्ट ही परतून घेणे. दोनीही चा कच्चा वास जाई पर्यंत परतून घेणे.

  3. 3

    आता त्या मध्ये टोमॅटो पेस्ट घालून तेल सुटे पर्यंत परतून घेणे. नंतर त्यात काजू पेस्ट घालून 3-4 मिनिटे परतणे. आता त्या मध्ये काश्मिरी तिखट, लाल तिखट, गरम मसाला घालून 2मिनिटे सगळे परतणे.

  4. 4

    आता त्या मध्ये आर्धी वाटी फ्रेश क्रीम घालून सगळे एकत्र करणे.3-4 मिनिटे मध्यम आचेवर हलवत राहणे. त्या मध्ये ग्रेव्ही किती घट्ट आणि पातळ हवी आहे त्या नुसार पाणी घालावे. व त्यात चवीनुसार मीठ आणि हाताने बारीक करून कसुरी मेथी घालावी. ही ग्रेव्ही 5 मिनिटे छान शिजवून घेणे.

  5. 5

    आता या मध्ये पनीर चे आवाडीनुसार तुकडे करून त्या मध्ये घालून घेणे.5-7 मिनिटे पनीर ग्रेव्ही सोबत छान शिजवून घेणे.

  6. 6

    अशाप्रकारे मस्त टेस्टी अशी शाही पनीर तयार झाली. ही भाजी सर्व्ह करताना वरून आवडत असल्यास फ्रेश क्रीम घालावी व गरम गरम पोळी, फुलके किंवा रोटी सोबत सर्व्ह करावी.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes