शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#GA4 #week17 # शाही पनीर

शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)

#GA4 #week17 # शाही पनीर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 200g Cheese
  2. 2मोठे टोमॅटो प्यूरी
  3. 1कांदा प्युरी
  4. 1/2 वाटीकाजू पेस्ट
  5. 7-8बदाम पेस्ट
  6. 1/2 वाटीदही
  7. 1/2 वाटीमलई क्रीम
  8. 1तेजपा न
  9. 1चक्रिफुळ
  10. 3लवंग
  11. 1मोठी वेलची
  12. 3हिरवी वेलची
  13. 1/4 टीस्पूनशहाजीर
  14. 1 इंचदालचिनीचा तुकडा
  15. 4मिरे
  16. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  17. 1 टीस्पूनधणे पावडर
  18. 1/2 टीस्पूनमसाला
  19. 1/2 टीस्पूनहळद
  20. 1 टेबलस्पूनकाश्मिरी लाल तिखट
  21. चवीनुसारमीठ
  22. 4 चमचेबटर / तूप
  23. 1/2 कपदूध
  24. 1 टेबलस्पूनकसूरी मेथी
  25. 1/2 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

60 मिनिट
  1. 1

    पनीरचे तुकडे करून घ्यावे. कांदा, टोमॅटो, काजू बदाम पेस्ट करून घ्यावी. दही घेऊन त्यात धणे पावडर टाकून चांगले मिक्स करून घ्यावे.

  2. 2

    एका पॅनमध्ये बटर टाकून त्यात पनीर सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यावे. व काढून घ्यावे.

  3. 3

    आता त्याच पॅनमध्ये, तेजपान, वेलची, लवंग, शाहजिरे, मिरे, दालचिनी टाकून परतून घ्यावे. आता त्यात कांदा टाकून परतून घ्यावे.

  4. 4

    त्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट, आणि काजू बदाम पेस्ट टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. त्यानंतर चांगले परतल्यावर त्यात हळद आणि तिखट टाकून एकत्र करावे. आता त्यात टोमॅटो प्यूरी आणि मीठ टाकून एकत्र करावे आणि झाकण ठेवून शिजू द्यावे.

  5. 5

    बाजूने तूप सुटल्यावर, त्यात धणे पावडर मिश्रित दही टाकून चांगले मिक्स करावे.

  6. 6

    त्यावर झाकण ठेवून शिजू द्यावे. 3-4 मिनिटानंतर झाकण काढून आता त्यात मलई क्रीम घालून चांगले मिक्स करावे.

  7. 7

    पुन्हा झाकण ठेवून शिजू द्यावे. आता त्यात दूध टाकून एकत्र करावे व एक उकळी येऊ द्यावी.

  8. 8

    आता त्यात कसुरी मेथी, मसाला आणि साखर टाकावी. व मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यात तळलेले पनीरचे तुकडे टाकून एकत्र करावे. शाही पनीर तयार आहे.

  9. 9

    वरून क्रीम घालून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes