अंगुरी रसमलाई (angoori rasmalai recipe in marathi)

Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
Mumbai

रसमलाई ही बंगाली मिठाई, बघताबघता महाराष्ट्रीयन गोड पदार्थात मिसळून गेली .. जशी दूधात साखर मिसळावी ना अगदी तशी.
रसमलाई दूध, पनीर, आणि ड्राय फ्रुट्स वापरून तयार करण्यात येते. स्वाद वाढविण्यासाठी आणि वेगळा रंग आणण्यासाठी यामध्ये केशरही वापरलं जातं.
चपटे पेढ्याच्या आकाराचे गोळे असले की, रसमलाई. लहान लहान द्राक्षासारखे गोळे असले की अंगुरी रसमलाई..
सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ आहे त्यामुळे तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
5-6 जणांसाठी
  1. 2 लिटरदुध
  2. 3 कपसाखर
  3. 2 टीस्पूनलिंबाचा रस
  4. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  5. 7-8केसर काड्या
  6. 1/2 कपड्रायफ्रुट
  7. 1 टीस्पूनकेवडा इसेन्स
  8. 3 कपपाणी
  9. 1 टीस्पूनकॉर्नफ्लोअर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    1 लिटर दुध एका पातेल्यात उकळत ठेवा दुधाला उकळी आली की त्यात लिंबाचा रस टाकून दुध चांगलं फाटेपर्यंत चमच्याने ढवळत राहा. आता गॅस बंद करून एका चाळणीत किंवा सुती कपड्यात ते ओता. मग वरून त्यात थंड पाणी टाकून त्याचा आंबटपणा कमी करा व 20 मि. तसेच ठेऊन द्या.

  2. 2

    आता उरलेले 1 लिटर दुध उकळत ठेवा ते आटून अर्धे झाले की त्यात 1-1/2 कप साखर, वेलची पावडर, ड्रायफ्रुट, केवडा इसेन्स व केसर काड्या टाकून मिक्स करा.

  3. 3

    आता फाटलेल्या दुधाचा झालेला छेना एका प्लेट मध्ये कडून त्यात कॉर्नफ्लोअर टाकून तळहाताने जोर देऊन पीठ मळतो तसे मळून घ्या.मग त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत.

  4. 4

    एका पातेल्यात 1-1/2 कप साखर व3 कप पाणी घालून एक उकळी यायला द्या मग त्यात एक एक गोळा अलगद सोडा व 10 मि. उकळी यायला द्या. आता त्यावर झाकण ठेवून 15 मि. चांगले उकळू द्या मग गॅस बंद करा.

  5. 5

    तयार रसगुल्ले थोडे थंड झाल्यावर थोडेसे दाबून त्यातलं पाणी कडून घ्या व एका पसरट भांड्यात काढून त्यावर घट्ट केलेलं दूध टाका. फ्रिजमध्ये ठेऊन थंड झालं की सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sanskruti Gaonkar
Sanskruti Gaonkar @sanskruti_1307
रोजी
Mumbai
I love cooking.... it's one of my favorite hobby....I m passionate about cooking.
पुढे वाचा

Similar Recipes