ऑरेंज मार्मालेड जॅम (orange Marmalade jam recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#GA4 #week26 #जॅम# ऑरेंज# ऑरेंज मार्मालेड जॅम! आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व मैत्रिणींना समर्पित..

ऑरेंज मार्मालेड जॅम (orange Marmalade jam recipe in marathi)

#GA4 #week26 #जॅम# ऑरेंज# ऑरेंज मार्मालेड जॅम! आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने माझ्या सर्व मैत्रिणींना समर्पित..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

60-75 मिनिट्स
  1. 1भांडे संत्रा रस
  2. 1भांडे साखर (जेवढा रस, तेव्हढी साखर)
  3. 4संत्राच्च्या सोललेल्या फोडी
  4. 3संत्रांची साले
  5. 1लिंबाचा रस

कुकिंग सूचना

60-75 मिनिट्स
  1. 1

    संत्रे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्याचा गरसहित रस काढून घ्यावा. 4 संत्रे सोलून घेवून फोडी स्वच्छ करून घ्याव्यात. तसेच त्या संत्राची साले ठेवावीत. कारण सालांमुळे जॅमला चांगली चव येते.

  2. 2

    सालांना पाण्यात 3-4 मिनिट उकळून घ्यावे. त्यानंतर ते साले, घेऊन त्याचा पांढरा भाग चमच्याने खरडवून काढून घ्यावा. नंतर त्याचे चाकूने बारीक उभे तुकडे करून घ्यावे.

  3. 3

    आता एका मोठ्या भांड्यात रस ओतून घ्यावा. त्यात सालाचे केलेले तुकडे टाकावे. तसेच, सोललेल्या संत्र्याच्या फोडी टाकाव्यात.

  4. 4

    मिक्स केल्यानंतर त्यात लिंबाचा रस पिळावा.

  5. 5

    रसा एवढीच साखर टाकून मिक्स करून घ्यावे. आता गॅस सुरू करून त्यावर रसाचे भांडे ठेवावे. मोठ्या आचेवर शिजवावे.

  6. 6

    सतत ढवळत राहावे. नाहीतर उतू जाण्याची शक्यता असते. 30- 40 मिनिट झाल्यावर एका प्लेट मध्ये थोडासा जॅम टाकून 5 मिनिट फ्रीज मध्ये ठेवावे. तोपर्यंत गॅस कमी करावा. 5 मिनिटांनी प्लेटमध्ये असलेल्या जॅम मध्ये मध्ये बोटाने रेष पाडून ती जर तशीच राहिली तर जॅम झाले असे समजावे.

  7. 7

    नाहीतर पुन्हा थोडेसे शिजू द्यावे. अशाप्रकारे जॅम तयार झालेले आहे. थंड झाल्यावर बरणीमध्ये भरून ठेवावे. ब्रेडसोबत किंवा पोळी सोबत खाण्यास छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या (6)

Archana bangare
Archana bangare @Archana2020
छान, मस्त दिसत आहे.चवीला पण छान असेल

Similar Recipes