मलबेरी- स्ट्रॉबेरी जॅम (mulberry strawberry jam recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

माझ्या मुलाला गोड पदार्थ खूप आवडतात. त्याच्या साठी आंब्याच्या सीजन मध्ये आंब्याचा जॅम मी दरवर्षी करते. मार्केट मध्ये मलबेरी दिसली, छान दाणेदार, गोड. मग विचार केला की या वेळी स्ट्रॉबेरी आणि मलबेरी जॅम करून बघुया... करायला सोपा आणि चव अप्रतिम!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

12-15 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 5-6मोठय स्ट्रॉबेरी
  2. 12-15मलबेरी
  3. 3/4 कपसाखर
  4. 1 टीस्पूनलिंबू रस

कुकिंग सूचना

12-15 मिनिटे
  1. 1

    प्रथम स्ट्रॉबेरी आणि मलबेरी स्वच्छ धुवून घ्या. नंतर दोन्हींचे जेवढे बारीक तुकडे करता येतील तेवढे करून घ्या. कपाने किँवा वाटीने ते मोजून घ्या.(माझे एक मोठी वाटी एवढे झाले)

  2. 2

    जाड बुडाच्या नॉनस्टिक पॅनमध्ये या फोडी घालून मंद ते मध्यम गॅस वर ठेवा. जेवढ्या फोडी होत्या त्यापेक्षा थोडी कमी साखर घ्या (पाऊण वाटी) घ्या आणि ती पण फोडींमध्ये घालून मिक्स करा.

  3. 3

    हळूहळू साखर विरघळून पाणी सुटेल... मध्ये मध्ये चमचा फिरवत रहा. फळांच्या फोडी सुद्धा नरम होऊन साखरेबरोबर एकजीव होतील. साधारण 12-15 मिनीटात मिश्रण दाट व्हायला लागेल. सतत पळीने हलवत रहा. आता त्यामधे १ टीस्पून लिंबू रस घालून मिक्स करा.

  4. 4

    जॅम तयार झाला कि नाही कळण्यासाठी थोडा जॅम डिश वर टाकून बघा आणि डिश तिरकी करा,तो जागच्या जागी हलला आणि खाली ओघळला नाही तर समजा जॅम तयार आहे. गॅस बंद करून जॅम बाजूला काढून थंड करा आणि हवाबंद बाटलीत भरून फ्रिज मध्ये ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes