साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#UVR
साबुदाणा वडा’ ही एक लोकप्रसिद्ध फराळाची रेसिपी असून ती नवरात्र किंवा इतर उपवासां दरम्यान बनवली जाते. साबुदाणा वडा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून हल्ली तो इतर राज्यातही चवीने खाल्ला जातो. कार्बोहायड्रेट आणि ग्लुकोजने परिपूर्ण असलेल्या साबुदाण्याचे पदार्थ उपवासा दरम्यान मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात, कारण यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. पण याव्यतिरिक्त तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यामध्येही साबुदाणा वडा खाऊ शकत. तर मंडळी वाट कसली पाहताय? जाणून घ्या झटपट तयार होणारी व साधीसोपी साबुदाणा वड्याची रेसिपी!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2किलो साबुदाणे
  2. 4-5मोठे बटाटे उकडून
  3. 5-6तिखट हिरव्या मिरच्या
  4. 1 टिस्पून जीरे
  5. 1कप शेंगदाण्याचा कूट
  6. चवीपुरते मीठ
  7. वडे तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    साबुदाणे पाण्यात भिजवावे. उरलेले पाणी काढून टाकावे. झाकण ठेवून ४ ते ५ तास भिजत ठेवावेत.शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे. मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात. शेंगदाण्याचा कूट : शेंगदाणे भाजून त्याची साले काढावीत आणि मिक्सरवर भरडसर बारीक करावेत.

  2. 2

    भिजवलेले साबुदाणे, बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.भिजवलेल्या मिश्राणाचे छोटे गोळे तयार करावेत. कढईत तेल गरम करावे आणि मीडियम हाय गॅस वर गोल्डन ब्राउन तळावेत.

  3. 3

    दही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर वडे छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

Similar Recipes