दुधी भोपळा कोफ्ता करी (Dudhi bhopla kofta curry recipe in marathi)

Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780

#GA4 #week20
#कीवर्ड कोफ्ता
😊 विथ लच्चेदार अज्वाईनी पराठा.

दुधी भोपळा कोफ्ता करी (Dudhi bhopla kofta curry recipe in marathi)

#GA4 #week20
#कीवर्ड कोफ्ता
😊 विथ लच्चेदार अज्वाईनी पराठा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

सव्वा तास
४ लोक
  1. १ १/२ वाटी दुधी भोपळा -किसलेला
  2. १ टीस्पूनआलं लसूण पेस्ट -
  3. २ टीस्पूनलाल तिखट -
  4. 1 टीस्पूनहळद -
  5. 1 टीस्पूनधने जीरे पूड -
  6. १/२ टीस्पूनओवा -
  7. १ १/२ वाटीबेसन -
  8. तेल - कॉफ्ते तळण्यासाठी
  9. मखणी ग्रेव्ही चे साहित्य
  10. ४ मध्यमटोमॅटो - आकाराचे (मोठे तुकडे)
  11. २ मोठेकांदे - (मोठे तुकडे)
  12. तुकडाकाजू - १/२ वाटी
  13. 1 टीस्पूनआलं लसूण पेस्ट -
  14. 1 टीस्पूनजीर -
  15. १ टेबलस्पूनकोथिंबीर - (बारीक चिरलेली)
  16. १ टेबलस्पूनक्रीम - (ऑप्शनल)
  17. 2 टीस्पूनलाल तिखट -
  18. 1 टीस्पूनहळद -
  19. 1 टेबलस्पूनबटर -
  20. मीठ - चवीनुसार
  21. 1 टीस्पूनकसुरी मेथी -
  22. अज्वैनी लाच्चा पराठा साहित्य
  23. 2 वाट्यागव्हाचे पीठ -
  24. मीठ - चवीनुसार
  25. 1 टेबलस्पूनओवा -
  26. 1 टेबलस्पूनतेल -
  27. 3 टेबलस्पूनतूप -
  28. १ टीस्पूनगरम मसाला पावडर - (मखणी ग्रेव्ही साठी)

कुकिंग सूचना

सव्वा तास
  1. 1

    एका बाउल मध्ये दुधी भोपळा किसून घ्या.त्यात हळद,लाला तिखट,धने जीरे पूड,मीठ,ओवा घालून एक जीव करून घ्या.

  2. 2

    ५ मिनिटे झाली की त्यात बेसन घाला आणि भजी ला लागतं असं मिश्रण करून घ्या.

  3. 3

    दुसऱ्या बाजूला कढई मध्ये तेल तापत ठेवा.तेल गरम झाल्यास कोफ्ते तळून घ्या.गोल्डन ब्राऊन तळून घ्या.

  4. 4

    माखणी ग्रेव्ही ची तयारी करायला घ्या.

  5. 5

    भांड्यात थोडा तेल घालून आधी जिर घाला,मग कांदा,कांदा थोडा खरपूस भाजला की टोमॅटो,आलं लसूण पेस्ट,हळद,लाला तिखट,मीठ आणि काजू घालून छान परतून घ्या.

  6. 6

    मिश्रणात थोडा पाणी घालून नीट शिजवून घ्या.

  7. 7

    तयार माखनी ग्रेव्ही थंड करण्यासाठी ठेवा.

  8. 8

    ग्रेव्ही थंडी झाली की मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.

  9. 9

    एका भांड्यात थोडा तेल आणि १ टीस्पून बटर गरम करा,त्यात तयार मखनी ग्रेव्ही घाला.

  10. 10

    ग्रेव्ही ला उकळी आली की त्यात कोफ्ते सोडा.ग्रेव्ही छान मंद आचेवर उकळून घ्या.

  11. 11

    तयार दुधी कोफ्ता करी मध्ये वरून बारीक चिरलेली कोथिंबीर,क्रीम,बटर,गरम मसाला पावडर आणि कसुरी मेथी घाला आणि झाकून ठेवा.

  12. 12

    पराठ्या साठी परातीत गव्हाचे पीठ,मीठ आणि ओवा घ्या.पीठ छान घट्ट,तेल घालून मळून घ्या.

  13. 13

    तयार पिठाचा गोळा १५/२० मिनिटे झाकून ठेवा.पिठाचे एक सारखे गोळे करून घ्या.

  14. 14

    लाच्छा पराठा करण्या साठी आधी गोलाकार पोळी लाटून घ्या,त्यावर थोडा तूप लावा,आणि सुख पीठ भुरभुरा आणि जसा आपण कागदाचा पंखा बनवतो तसा आकार करून घ्या,आणि त्याचा पुन्हा गोळा करून घ्या.

  15. 15

    एकसारखे लच्छा करून घ्या.

  16. 16

    तवा गरम करण्या साठी ठेवा.पिठाच्या गोळ्याचा मध्यम आकारा चा जाडसर पराठा लाटून घ्या.

  17. 17

    पराठा छान तूप लावून शेकून घ्या.

  18. 18

    गरम गरम दुधी भोपळा कोफ्ता करी गरम लाच्चेदार पराठ्यान बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepali Bhat-Sohani
Deepali Bhat-Sohani @deepali_5780
रोजी

Similar Recipes