हार्ट - बिट मोमोज (heart beet momos recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#Heart
#cooksnap
हि शितल राऊत ह्यांची रेसिपी आहे.मला आवडली म्हणून कुकस्नॅप केली. धन्यवाद.

हार्ट - बिट मोमोज (heart beet momos recipe in marathi)

#Heart
#cooksnap
हि शितल राऊत ह्यांची रेसिपी आहे.मला आवडली म्हणून कुकस्नॅप केली. धन्यवाद.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मीनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. ६० ग्रॅम कणिक
  2. ६० ग्रॅम बिट प्युरी
  3. 1/4 टीस्पूनव्हिनीगर
  4. 1/4 टीस्पूनमीठ
  5. 1 टीस्पूनतेल१
  6. स्टफींगसाठी..
  7. ३ टेबलस्पून पत्ता कोबी
  8. 3 टेबलस्पूनगाजराचा कीस
  9. 2 टेबलस्पूनकांदा पात
  10. 1कांदा
  11. 1 टेबलस्पूनआलं लसूण मिरची पेस्ट
  12. 1/2 टीस्पूनकाळी मीरी पूड१
  13. 1/2 टीस्पूनचिली फ्लेक्स
  14. 2 टीस्पूनसोया सॉस
  15. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

४५ मीनीट
  1. 1

    प्रथम बिट वाफवून त्याची प्युरी करून घेतली. मग त्यात थोडे पाणी घालून ते उकळले. त्यात व्हिनीगर व मीठ घातले.व्हीनीगरमुळे कलर फीका होत नाही.

  2. 2

    लगेच ते मिश्रण कणकेत ओतून गोळा मळून घेतला. ते गरम असताना प्रथम थोडे चमच्याने हलवले व नंतर हाताने चांगले मळून घेतले. आता ते न झाकता तसेच ठेवावे. म्हणजे त्याला वाफेमुळे ओलावा येत नाही.

  3. 3

    आता स्टफिंग तयार करण्यासाठी कोबी, कांदा, कांदा पात बारीक चिरून घेतले. गाजर किसून घेतले. आलं, लसूण, मिरची यांची पेस्ट करून घेतली. मग सर्व भाज्यांना मीठ लावून त्या कॉटन वर १५-२० मी नीट पसरवून ठेवल्या. मग त्यात वाटी मध्ये काढून त्यात आलं-लसूण, मिरची पेस्ट, चिली फ्लेक्स, सोया सॉस घालून मिक्स केले.

  4. 4

    आता कणकेचा गोळा थोडा मळून त्याचे लहान लहान गोळे बनविले. त्यातील एक गोळा घेऊन तो एकदा कणकेमध्ये घोळून पातळ लाटून घेतला. त्यावर स्टफिंग घातले.

  5. 5

    त्याला हार्ट शेप मोमोज चा आकार दिला. असे सर्व मोमोज तयार करून घेतले. ते ग्रिसींग केलेल्या चाळणीवर ठेवून इडली पात्रात वाफवून १० मीनीट घेतले.

  6. 6

    वाफऊन तयार झालेले मोमोज डिशमध्ये ठेवून गार्निश केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

Similar Recipes