भरली सिमला मिरची (Bharli shimla mirchi recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#डिनर
डिनर लंच प्लॅनरमधील माझी ही पहिली रेसिपी
विविध पदार्थांमध्ये सर्रास वापरली जाणारी आणि सर्व सिझनमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी म्हणजे सिमला मिरची. मी आज भरलेली सिमला मिरचीची रेसिपी आपल्यासाठी पाठवत आहे. खमंग आणि चवदार अशी ही भरून मिरची तुम्हीही करून बघा.

भरली सिमला मिरची (Bharli shimla mirchi recipe in marathi)

#डिनर
डिनर लंच प्लॅनरमधील माझी ही पहिली रेसिपी
विविध पदार्थांमध्ये सर्रास वापरली जाणारी आणि सर्व सिझनमध्ये सहज उपलब्ध होणारी भाजी म्हणजे सिमला मिरची. मी आज भरलेली सिमला मिरचीची रेसिपी आपल्यासाठी पाठवत आहे. खमंग आणि चवदार अशी ही भरून मिरची तुम्हीही करून बघा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२०-२५ मि.
२-३ लोकांसाठी
  1. 4सिमला मिरची
  2. 4मोठे कांदे
  3. 4 चमचेकिसलेले सुके खोबरे
  4. 1 इंचआले
  5. 7-8लसूण पाकळ्या
  6. 7-8 कोथिंबीर काड्या
  7. 2-3 चमचेशेंगदाणा कूट
  8. मीठ चवीनुसार
  9. 4 चमचेकांदा लसूण मसाला

कुकिंग सूचना

२०-२५ मि.
  1. 1

    साहित्य

  2. 2

    २कांदे भाजून,खोबरे भाजून घ्या. थंड झाल्यावर आले, लसूण, कोथिंबीर हे सर्व एकत्र वाटून मसाला तयार करून घेणे.

  3. 3

    सिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्या. देठ कापून आतील सर्व बी काढून घ्या. २ कांदे बारीक चिरून घ्या.

  4. 4

    चिरलेल्या कांद्यातील पाऊण भाग बाजूला काढा, पाव भाग फोडणीसाठी ठेवा. पाऊण भाग कांद्यामध्ये २-३ चमचे वाटलेला मसाला, ३ चमचे शेंगदाणा कूट, २ चमचे कांदा लसूण मसाला, मीठ, २ चमचे तेल घालून एकजीव करणे. हा मसाला मिरच्यांमध्ये भरणे.

  5. 5

    आता कढईमध्ये ३-४ पळ्या तेल घालणे. पाव भाग कांदा ठेवलेला घालणे. कांदा ३-४ मि परतून त्यामध्ये उरलेला वाटलेला मसाला घालणे.परतवणे. उरलेला कांदालसूण मसाला घालणे. मीठ घालणे.

  6. 6

    भरलेल्या मिरच्या घालणे, सावकाश हलवून झाकण ठेवणे.

  7. 7

    २-३ वाफा आणणे. यामध्ये पाणी घालायचे नाही, फक्त वाफेवर शिजू द्यावे. अशी ही भरलेली खमंग सिमला मिरची तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Namita Patil
Namita Patil @namitapatil
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes