सिमला मिरचीची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)

Kshama's Kitchen
Kshama's Kitchen @Kshama_1973

सिमला मिरची ही अगदी गुणी भाजी आहे,पहा ना ज्या पदार्थात आपण ती घालू त्याची रंगत वाढवते मग ती पावभाजी असो नाहीतर , तवा पुलाव, सॅलडस,chinese पदार्थ असो. तिला स्वतःची अशी एक सुंदर चव असते. म्हणूनच मी कमी साहित्य वापरून झटपट होणारी सिमला मिरचीची रस्सा भाजी केली आहे.
#cpm6

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 टीस्पूनधणे -जीरे पूड
  2. 3मोठया सिमला मिरची
  3. मीठ चवीनुसार
  4. 2 टीस्पूनमसाला
  5. फोडणीचे साहित्य
  6. 2मध्यम कांदे
  7. 2टोमॅटो
  8. 1 टीस्पूनआलं

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम सिमला मिरची थोडी मोठी चिरून घ्या व तेलावर 5-7 मिनिट वाफवून घ्या. व बाजूला काढून ठेवा.
    त्याच कढईत फोडणी करुन घ्या. आता त्यात आलं घाला व नीट परतून झाल्यावर कांदा घालून परता. कांदा मऊ झाला की त्यात टोमॅटो घाला.

  2. 2

    झाकण ठेऊन मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.

  3. 3

    आता त्यात धणे जीरे पूड, मीठ व मसाला घालून नीट मिसळून घ्या. रस्सा पातळ वाटला तर चमचाभर बेसन लावा. पाणी घालून उकळून घ्या म्हणजे मसाला नीट उतरेल. सर्वात शेवटी त्यात सिमला मिरची घालून 5 मिनिट उकळी काढून घ्या. गरमा गरम भाजी चपाती सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kshama's Kitchen
Kshama's Kitchen @Kshama_1973
रोजी

Similar Recipes