मुग भाजी (moong bhaji recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#डिनर
#साप्ताहिक डिनर प्लॅनर
#बुधवार

मुग भाजी (moong bhaji recipe in marathi)

#डिनर
#साप्ताहिक डिनर प्लॅनर
#बुधवार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मीनीट
  1. ६० ग्रॅम मुग डाळ
  2. 1 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  3. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  4. 1/2 इंचआलं
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. 1/2 टीस्पूनधणेपूड
  7. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  8. मीठ चवीनुसार
  9. तळण्यासाठी तेल
  10. ग्रेव्ही साठी
  11. 1कांदाा
  12. 1/2टमाटाा
  13. 1/2 टेबलस्पूनकोथिंबीर
  14. 7-8लसुण पाकळ्या
  15. 1/2 इंचआलं
  16. १+१/२ टेबलस्पून खोबर कीस
  17. 3/4 टीस्पूनगरम मसाला
  18. 1 टेबलस्पूनतेल
  19. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

४० मीनीट
  1. 1

    प्रथम मूग डाळीचे भजी बनवण्यासाठी मुगडाळ दोन-तीन तास भिजत घातली. मग मिक्सर मध्ये वाटून घेतली. जास्त बारीक वाटायची नाही. आलं व मिरची यांची पेस्ट करून घेतली.

  2. 2

    एका वाटी मध्ये वाटलेली डाळ काढून त्यात आलं, मिरची पेस्ट,धणे जीरे पावडर, मीठ, कोथिंबीर, तांदळाचे पीठ घालून सर्व ५ मी नीट चांगले फेटून घेतले.

  3. 3

    आता गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात चमच्याने थोडे थोडे मिश्रण घालून मिडीयम गॅसवर भजी तळून घेतली.

  4. 4

    ग्रेव्ही साठी आलं-लसूण ोबर्‍याचा किस यांचे मिक्सरवर वाटण करून घेतले.कांदा, टमाटा, कोथिंबीर बारीक चिरून घेतले.

  5. 5

    मग कढाईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, हळद, कांदा, खोबरं, आलं-लसूण ह्यांचे वाटण घालून चांगले परतून घेतले.मग टमाटा, तिखट, मीठ गरम मसाला घालुन सर्व चांगले परतून घेतले. गरम पाणी घालून चांगले उकळून ग्रेव्ही तयार केली.

  6. 6

    तयार ग्रेव्हीमध्ये वरील तयार मुग भजे घातले आणि वरून कोथिंबीर घातली व बाऊलमधे काढून सर्व्ह केले. घरात भाजी नसली तरी आपण पटकन ही भाजी करू शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes