"पपया मिंट स्मुदी" (papaya mint smoothie recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#GA4
#WEEK23
#Keyword_papaya

"पपया मिंट स्मुदी"
पपई खुप गुणकारी आहे.. पपई खाल्ल्याने अन्न पचन होते.. भरपूर सारे व्हिटॅमिन आहेत, फायबर आहे हे सगळे माहित आहे...पण ... अजून पर्यंत कधीच खाल्ली नाही..😂

कीवर्ड_पपया होते आणि पपई माझ न आवडत फळ आहे.आणि का कोण जाणे , माझ्या मुलांना ही आवडत नाही.....पण रेसिपी तर करायचीच आहे...
मग मी ठरवले स्मुदी करुया...तर केली पण आणि मी एकटीनेच दोन्ही ग्लास गटकुन टाकले, खुप छान झाली होती.. मला तर आमरस खाल्ल्यासारखे च वाटले.आणि मला रेडिमेड आमरस आठवला, आम्ही बऱ्याच वेळा आणला होता आणि माहित ही होते यात नक्की पपया टाकत असतील...पण फक्त पिकलेल्या पायाची स्मुदी एवढी छान लागते हे माहीत नव्हते..
आता वरचेवर घरात स्मुदी बननारच.. कारण मला जाम आवडली.. Cookpad India खुप धन्यवाद 🙏
आज मला नवीन पदार्थ बनवण्याची संधी दिली आणि खाण्याचीही 😄
चला तर माझी रेसिपी बघुया..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तयारी साठी फक्त दहा मिनिटे
दोन
  1. 250 ग्रॅमपपई चे तुकडे
  2. 1/4 कपसाखर
  3. 1/2 कपदुध
  4. 1/2 टीस्पूनवेलचीपूड
  5. 10बारा पुदिन्याची पाने

कुकिंग सूचना

तयारी साठी फक्त दहा मिनिटे
  1. 1

    पपईच्या साल आणि बिया काढून बारीक तुकडे करून घ्यावे.बाकीचे जिन्नस जवळ घेऊन ठेवावे.

  2. 2

    मिक्सरच्या जारमध्ये पपई चे तुकडे, साखर, दुध, वेलचीपूड, पुदिन्याची पाने घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे..व हवे असल्यास दोन तीन बर्फाचे क्युब टाकावेत...मी नाही टाकले..

  3. 3

    तय्यार पपया मिंट स्मुदी ग्लासात ओतून सर्व्ह करावी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes