पपई ~ सफरचंद Smoothie (Papaya Safarchand Smoothie recipe in marathi)

Bhagyashree Lele यांनी बनवलेलं "हनी मिंट पपया चिलर" पाहिलं, वाटलं आपण सुद्धा याला थोडा ट्विस्ट देऊन असं काहीतरी बनवावं. तर यांच्या रेसिपी मधला काही भाग #cooksnap करत मी "पपई ~ सफरचंद Smoothie" बनवली आहे.
संत्रे किंवा केळ्यापेक्षा सफरचंदात जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. संशोधकांनुसार सफरचंद अनेक रोगांची शक्यता कमी करतो म्हणून दररोज हे फळ खाल्ले पाहिजे. पपईत असलेले कॅरोटिन डोळ्यांसाठी लाभदायक असतं. डोळे नीट ठेवण्यासाठी दररोज पपई खायला हवी.
तर अशा २ गुणी फळांचं कॉम्बिनेशन कसं वाटतंय ते बघूया :)
पपई ~ सफरचंद Smoothie (Papaya Safarchand Smoothie recipe in marathi)
Bhagyashree Lele यांनी बनवलेलं "हनी मिंट पपया चिलर" पाहिलं, वाटलं आपण सुद्धा याला थोडा ट्विस्ट देऊन असं काहीतरी बनवावं. तर यांच्या रेसिपी मधला काही भाग #cooksnap करत मी "पपई ~ सफरचंद Smoothie" बनवली आहे.
संत्रे किंवा केळ्यापेक्षा सफरचंदात जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. संशोधकांनुसार सफरचंद अनेक रोगांची शक्यता कमी करतो म्हणून दररोज हे फळ खाल्ले पाहिजे. पपईत असलेले कॅरोटिन डोळ्यांसाठी लाभदायक असतं. डोळे नीट ठेवण्यासाठी दररोज पपई खायला हवी.
तर अशा २ गुणी फळांचं कॉम्बिनेशन कसं वाटतंय ते बघूया :)
कुकिंग सूचना
- 1
माझ्याकडे एक मोठा पपई होता, आणि smoothie २ माणसांसाठी बनवायची होती त्यामुळे मी अर्धाच पपई घेतला. आणि एक सफरचंद.
- 2
पपई आणि सफरचंद चे बारीक तुकडे केले. मिक्सर ला लावून घट्टसर वाटून घेतले. मिक्सर ला लावताना २ चमचे मध घातलं.
- 3
मस्त घट्टसर मधाचा आणि फळांचा गोडवा उतरलेली smoothie तयार. सर्व्ह करताना वरून १ - १ चमचा मध सोडायचं. थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवून उन्हाळ्याच्या दिवसात अशी Healthy Smoothie छान लागते. :)
~ सुप्रिया घुडे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
हनी सफरचंद (honey safarchand recipe in marathi)
#HealthydietMake it fruityआरोग्यदायी आहार. दररोज एक सफरचंद डॉक्टरांना दूर ठेवते. Sushma Sachin Sharma -
ओट्स सफरचंद स्मूथी (oats safarchand smoothie recipe in marathi)
#GA4 #week7 #OatsCrossword puzzle 7 मधील Oats हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली ओट्स-सफरचंद स्मूथीची रेसिपी. सरिता बुरडे -
-
कच्ची पपई लिंबू सॅलड (kachhi papaya limbu salad recipe in marathi)
#sp#सॅलड प्लॅनर#शुक्रवार#कच्ची पपई चे फायदे अनेक आहेत वजन कमी करण्यासाठी कच्ची पपई रोज खावी , मधुमेही व्यक्तिने खाल्ली तर त्यांची रक्तातील साखर कमी होते नि इन्शुलीन वाढण्यासाठी मदत होते . रोज कच्ची पपई खाणार्या ना कोलन किंवा प्रोस्टेड कर्करोग होण्याची शक्यता कमी होते.महत्त्वाचे राहिलेच स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.तर अश्या बहुगुणी पपई चे सॅलड कसे करायचे ते बघुयात. Hema Wane -
"पपया मिंट स्मुदी" (papaya mint smoothie recipe in marathi)
#GA4#WEEK23#Keyword_papaya "पपया मिंट स्मुदी" पपई खुप गुणकारी आहे.. पपई खाल्ल्याने अन्न पचन होते.. भरपूर सारे व्हिटॅमिन आहेत, फायबर आहे हे सगळे माहित आहे...पण ... अजून पर्यंत कधीच खाल्ली नाही..😂 कीवर्ड_पपया होते आणि पपई माझ न आवडत फळ आहे.आणि का कोण जाणे , माझ्या मुलांना ही आवडत नाही.....पण रेसिपी तर करायचीच आहे... मग मी ठरवले स्मुदी करुया...तर केली पण आणि मी एकटीनेच दोन्ही ग्लास गटकुन टाकले, खुप छान झाली होती.. मला तर आमरस खाल्ल्यासारखे च वाटले.आणि मला रेडिमेड आमरस आठवला, आम्ही बऱ्याच वेळा आणला होता आणि माहित ही होते यात नक्की पपया टाकत असतील...पण फक्त पिकलेल्या पायाची स्मुदी एवढी छान लागते हे माहीत नव्हते.. आता वरचेवर घरात स्मुदी बननारच.. कारण मला जाम आवडली.. Cookpad India खुप धन्यवाद 🙏आज मला नवीन पदार्थ बनवण्याची संधी दिली आणि खाण्याचीही 😄 चला तर माझी रेसिपी बघुया.. लता धानापुने -
-
पपई ज्यूस (papaya juice recipe in marathi)
#jdr# पपई ज्यूस# शक्तीवर्धक पपई ज्यूस, सर्व रोगांवर मात करणारा पपई ज्यूस, फुल विटामिनने भरलेला पपई ज्यूस, डोळ्यांना शक्ती देणारा पपई ज्यूस.... ऑल टाईम फेव्हरेट पपई.... पासून बनवलेला पपई ज्यूस... या ज्यूस मध्ये मलाई ॲड केल्याने स्मुत क्रीमी असा ज्यूस तयार होतो... Gital Haria -
मधुर पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
#GA4 #week4#मिल्कशेक#मधुरपपईमिल्कशेकGolden Apron चॅलेंज साठी #मिल्कशेक हा क्लू वापरून केलेली रेसिपी आहे .चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई ! पपईचा औषधी उपयोग आहे. पपई स्वादिष्ट तर आहेच शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी. सहज पचणारे फळ आहे पपई. पपई भूक आणि शक्ती वाढविते.पपई माझे आवडते फळं आहे.पपई मिल्कशेक हे एक ऊर्जा देणारे पेय है. पपई आणि दूधाचे का मिश्रण लहान मुले आणि मोठ्या माणसांच्या आरोग्यासाठी खुप उपयोगी आहे.समजा पपई खायला आवडत नसेल तर पपई मिल्कशेक बनवा.अवश्य सर्वाना आवडेल. पपई मिल्क शेक तुम्ही खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात बनवु शकतो.पपई माझे आवडते फळं आहे. पपई मिल्कशेक प्याला खूप मधुर लागतो चला तर आज पपई मिल्कशेक बनवू या. Swati Pote -
पपई ज्युस (papaya juice recipe in marathi)
#jdr#पपई ज्युस# vitamin A असल्यामुळे डोळ्यांसाठी पपई खायलाच पाहिजे , तसेच पांनाचा रस पण प्लेटलेस वाढविण्याठी सर्वात उत्तम पर्याय , अतिशय झटपट होणारी पण तितकीच टेस्टी , चला तर मग बघु या... Anita Desai -
पपई लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#Sp नवीन प्रयोग करताना थोडी भीती मनात असते. कच्ची पपई घालून पहिल्यांदाच सॅलड केले.अनेक Vdos पाहिले.पण ते स्वादिष्ट झाले. Archana bangare -
पपई ज्युस (papaya juice recipe in marathi)
#jrd #पपई ही खरी उष्ण असते पण पपईत अ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते तसेच जीवनसत्व B,C,E, K व पोटॅशियम,कॅल्शियम,मॅगझिन,मिनरल्स पण असतात. आपण नेहमीच पपई नुसती कापून खातो .आज बघुया पपई चा ज्युस कसा करायचा ते. Hema Wane -
-
पपई मिल्कशेक (papaya milkshake recipe in marathi)
#GA4 #week 23या आठवड्यातील पपई हा कीवर्ड घेऊन मिल्कशेक केला.आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असे हे फळ आहे.सफरचंदा प्रमाणे रोज आहारात समावेश केला तर फारच उत्तम. Archana bangare -
सफरचंद पपई मिल्क शेक (safarchand papaya milk shake recipe in marathi)
कूकस्नॅप चलेंज साठी, मी वर्षा बेले यांची एप्पल, पपई मिल्क शेक ही रेसिपी केली आहे. खूप छान झाला, मिल्कशेक! धन्यवाद ताई! Sujata Gengaje -
"पपया लेमन मिंट सॅलड" (papaya lemon mint salad recipe in marathi)
#sp#शुक्रवार_पपया लेमन सॅलड#सॅलड प्लॅनर मधील माझी सहावी रेसिपी.. "पपया लेमन मिंट सॅलड" लता धानापुने -
-
पपई ज्युस/ हेल्थी पपई द्री (papaya juice recipe in marathi)
#GA4#week23#kayword_papaya#healthy papaya drinkएकदा माझ्या घरी एकाच वेळी खूप साऱ्या पपई पिकल्या होत्या तशाच खाऊन सगळे कंटाळले म्हणून मग मी हे मस्त टेस्टी ड्रिंक बनविले आणि सगळ्यांना खूप आवडले...😋😋 Monali Garud-Bhoite -
पपया लेमन सलाड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक प्लॅनर सलाड मध्ये शुक्रवारची रेसिपी आहे पपया लेमन सलाड. हे सलाड थाई रेसिपी मध्ये मोडते. थायलंड मध्ये कच्च्या पपई चे वेगवेगळ्या प्रकारचे सलाड केले जाते. त्यापैकी एक मी आज बनवले आहे. पपई सर्वांनाच आवडते असे नाही. त्यात कच्ची पपई तर बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यात असणारे पेपेन हे पचनाला चांगले असते Shama Mangale -
पपई लेमन सॕलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp पपई ,लेमन सॕलड एक स्वादिष्ट प्रकार Suchita Ingole Lavhale -
सफरचंद जॅम (safarchand jam recipe in marathi)
#Cookpadturns4#cookwithfruitsकूकपॅडचा चौथा वाढदिवस त्याबद्दल खूप सार्या हार्दिक शुभेच्छा....आणि माझी ही कूकपॅडवरची पन्नासावी रेसिपी आहे तर आजची रेसिपी गोडा सहित सादर करते.....सफरचंद जॅम😘 Vandana Shelar -
पपया लेमन सलाड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp शुक्रवार विषय पपया लेमन सलाड करायला एकदम सोप व खायला पण एकदम सोपं व पचायला पण सोपं असं सोपं सॅलड खरोखरच बहुगुणी आहे .पपया 12 महिने मिळतो व त्याचे औषधी गुण खूप आहेत पपई तसाच खाल्ला तरी तो आरोग्यासाठी एकदम उत्तम ,त्वचेसाठी गुणकारी आहे .पपई च काय त्याची पाने पण फार गुणकारी आहेत पेशी (प्लेटलेट्स) कमी झाले तर याच्या पानांचा रस सकाळी अमोश्या पोटी प्यायला देतात .अश्या या बहुगुणी पपया लेमन सलाड मी कसे केले ते पाहुयात मग ... Pooja Katake Vyas -
पपया पनीर मिल्क शेक (papaya paneer milkshake recipe in marathi)
आज खुप गावठी पपया मिळाल्या, एकदम गोड आणि रंग पण सुंदर, विचार केला संध्याकाळच जेवण न करता छान मिल्कशेकच घेउ, अगदी सोप , झटपट होणार शिवाय प्रोटीनयुक्त विदाउट शुगर , चला तर मग —— Anita Desai -
पपया लेमन सॅलड (papaya lemon salad recipe in marathi)
#sp की वर्ड--पपया लेमन सॅलड #शुक्रवार पपया लेमन एक भन्नाट combination चे सॅलेड.. खूप चटपटीत..चवीमध्ये बदल हवा असेल तर नक्की करुन बघा..मी यामध्ये किवी पण add केल्यात त्यामुळे या सॅलेडचा tanginess अजून enhance झालाय..चला तर मग या सर्वात सोप्प्या रेसिपी कडे... Bhagyashree Lele -
लेमनी पपई मिक्स सलाड (lemon papaya mix salad recipe in marathi)
#sp #शुक्रवार #पपई लेमन सलाड साठी मी जरा हटके सलाड बनवले आहे. कच्ची पपई न वापरता तयार पपई वापरली. हे सलाड पण तितकेच टेस्टी बनले आहे. Sanhita Kand -
सफरचंद हलवा (safarchand /apple halwa recipe in marathi)
#CookpadTurns4#cook with fruit recipeसफरचंद हे फळ आपल्याला बारा महिने मिळते. याचा हलवा खूप छान लागतो.चला तर मग बनवूयात हलवा Supriya Devkar -
-
सफरचंद, मोसंबीचा रस (safarchand mosambi juice recipe)
हे मध चवीसह उपवासाच्या उद्देशाने आहे.#nrr8 day Sushma Sachin Sharma -
पपया डाळ वडा (papaya daal vada recipe in marathi)
#SRस्टार्टर्स म्हणजे तर पार्टीची शान....आणि चमचमीतस्टार्टर्स ने तर ही वाढवायलाच हवी,म्हणुन मस्त हेल्दी आणि टेस्टी पपया डाळ वडा रेसिपी..... Supriya Thengadi -
हनी मिंट पपया चिलर..(honey mint papaya chiller recipe in marathi)
#jdr की वर्ड-- पपई हनी पपया चिलर...चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई !!! पपई खाण्याचे आणखी दहा फायदे...* शरीरातील कोलेस्टेरॉल कमी करते – पपईमध्ये व्हिटामिन सी व फायबरचे प्रमाण अधिक असल्याने रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहण्यापासून बचाव होतो. रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल साचून राहिल्याने हृद्यविकाराचा धोका संभवतो.* वजन घटवण्यास मदत होते – एका मध्यम आकाराच्या पपईमध्ये 120 कॅलेरीज असतात. त्यामुळे जर तुम्ही वजन घटवण्याच्या विचारात असाल तर पपईचा आहारात नियमित समावेश करा. पपईतील डायटरी फायबर्समुळे वेळी-अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणे शक्य होते.* रोगप्रतिकारशक्ती वाढते –आजारांशी सक्षमतेने सामना करण्यासाठी तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार गरजेचे आहे. तसेच शरीरातील व्हिटामिन सीच्या गरजेपेक्षा 200% अधिक व्हिटामिन सी केवळ पपईमुळे मिळू शकते.* मधुमेहींसाठी गुणकारी – पपई चवीला गोड असली तरीही त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. कपभर पपईच्या तुकड्यांमधून केवळ 8.3 ग्रॅम साखर असते. यामुळे मधुमेहींनी पपई खाणे हितकारी आहे. तसेच पपई खाल्ल्याने मधुमेह जडण्यापासून बचाव होतो.* डोळ्यांचे आरोग्य सुधारते – पपईमध्ये व्हिटमिन ए मुबलक प्रमाणात आढळते. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी व्हिटामिन ए अत्यंत गरजेचे आहे..* सांधेदुखीपासून आराम मिळतो – पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. तसेच सूज कमी करण्यास मदत करतात* पचन सुधारते- पपईतील पपैन नामक एंजाईम पचन कार्य सुधारते.*मासिक पाळीचा त्रास कमी होतो*कर्करोगापासून बचाव होतो*ताण तणाव कमी होतो..गुगल स्त्रोत..चला तर रेसिपी करु या.. Bhagyashree Lele -
पपई लेमन सलाद (papaya lemon salad recipe in marathi)
#sp # पपई लेमन सलाद करताना मी पिकलेल्या पपईचा वापर केला आहे त्यात.... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या