खाडीची कोलंबी आणि शिंद / वास्ता / बांबु (Bambu Recipe in Marathi)

नमस्कार,
मी अश्विनी महेश पाटील, मी आज तुम्हाला खाडीची कोलंबी आणि शिन म्हणजेच बांबुची भाजी दाखवणार आहे .
साहित्य:- खाडीची कोलंबी एक वाटी, शिंद म्हणजेच वास्ता, दोन पळी तेल ,दोन चमचे मसाला, एक चमचा हळद ,चवीनुसार मीठ, कोथिंबीर ,मिरची ,आलं ,लसूण वाटण टोमॅटो ,बटाटा, कांदा, चिंचेचा कोळ अर्धा वाटी.
कृती:- सर्व प्रथम कोलंबी तेलावर टाकून थोडी शिजविल्यावर कांदा घालून तोही परतवायचा. त्यानंतर वाटण ,मसाला ,हळद ,चवीनुसार मीठ हे घालून परतवायचा. मग बटाटा , शिंद घालून सगळं मिक्स करायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडा पाणी घालून भाजी शिजवून घेणे. बटाटा शिजल्यानंतर चिंचेचा कोळ घालावा. त्यानंतर दहा मिनिटं ऊकळा घ्यावा. गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालावी .अशाप्रकारे शींद आणि कोळंबीची भाजी रेडी .
#AV
धन्यवाद.
खाडीची कोलंबी आणि शिंद / वास्ता / बांबु (Bambu Recipe in Marathi)
नमस्कार,
मी अश्विनी महेश पाटील, मी आज तुम्हाला खाडीची कोलंबी आणि शिन म्हणजेच बांबुची भाजी दाखवणार आहे .
साहित्य:- खाडीची कोलंबी एक वाटी, शिंद म्हणजेच वास्ता, दोन पळी तेल ,दोन चमचे मसाला, एक चमचा हळद ,चवीनुसार मीठ, कोथिंबीर ,मिरची ,आलं ,लसूण वाटण टोमॅटो ,बटाटा, कांदा, चिंचेचा कोळ अर्धा वाटी.
कृती:- सर्व प्रथम कोलंबी तेलावर टाकून थोडी शिजविल्यावर कांदा घालून तोही परतवायचा. त्यानंतर वाटण ,मसाला ,हळद ,चवीनुसार मीठ हे घालून परतवायचा. मग बटाटा , शिंद घालून सगळं मिक्स करायचं. त्यानंतर त्यामध्ये थोडा पाणी घालून भाजी शिजवून घेणे. बटाटा शिजल्यानंतर चिंचेचा कोळ घालावा. त्यानंतर दहा मिनिटं ऊकळा घ्यावा. गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालावी .अशाप्रकारे शींद आणि कोळंबीची भाजी रेडी .
#AV
धन्यवाद.
कुकिंग सूचना
- 1
कोलंबी तेलावर टाकून थोडी शिजविल्यावर.
- 2
कांदा,वाटण,मसाला,हळद, मीठ घालून परतवायचा.
- 3
बटाटा, शिंद मिक्स करायचं
- 4
पाणी घालून, बटाटा शिजल्यानंतर चिंचेचा कोळ घालावा.
- 5
दहा मिनिटं ऊकळा.अशाप्रकारे शींद आणि कोळंबीची भाजी रेडी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पारंपारिक पद्धतीने कोलंबी आणि पाण्यातला आंबा भाजी
पारंपारिक पद्धतीने कोलंबी आणि पाण्यातला आंबा ह्याची भाजी दाखवणार आहे .साहित्य:- वर्षभर भरलेला आपण पाण्यातला आंबा ,एक खाडीची कोलंबी ,आलं लसूण मिरची कोथिंबीर यांचे वाटण तीन चमचे आणि मसाला दोन चमचे, हळद एक चमचा ,मीठ चवीनुसार, दोन पळी तेल.कृती :- सर्वप्रथम कोलंबी साफ करून तेलावर तळायची. त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापून घालायचा, एक मोठा टोमॅटो बारिक कापून घालायचं ,ते परतून झाल्यानंतर त्यामध्ये वाटण, मसाला, हळद ,चवीनुसार मीठ टाकून द्यायचं. एक बटाट्याच्या बारीक काप करून त्या भाजीत घालाव्यात ,त्या भाजी मध्ये थोडे पाणी घालून बटाटा शिजवून आणि कोळंबी शिजवुन घ्यावी .बटाटा शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये पाण्यातला आंबा बारीक कापून घालावा भाजी शिजून द्यावी. त्यानंतर आपल्या घरात जशी माणसं असेतील ,त्याप्रमाणे भाजीत रस्सा ठेवावा. रशाला अर्धा चमचा तांदळाचं पीठ लावून घ्यावं आणि भाजी मिक्स करून घ्यावी .एक ऊकळा भाजीचा घ्यावा .सुंदर अशी आपली खाडीत कोलंबी आणि पाण्यातला आंब्याची भाजी रेडी 🙏🏻#AV Hinal Patil -
पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण (Bomblanch kalvan Recipe in Marathi)
नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील , आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने बोंबलाचं कालवण दाखवणार आहे. कृती:- त्यासाठी पाच ते सहा बोंबील घेऊन ते साफ करून घ्यायचे आणि त्याचे चार ते पाच तुकडे करायचे .त्यानंतर स्वच्छ धुवून त्यामध्ये दोन चमचे तेल, दोन चमचे वाडवळी मसाला किंवा घरचा मसाला,एक चमचा हळद ,चवीनुसार मीठ, कोथिंबीर ,मिरची ,आलं ,लसूण पेस्ट त्यामध्ये टोमॅटो एक किसून घालायचा, त्यामध्ये चिंचेचा कोळ अर्धा वाटी आणि अर्धा चमचा तांदळाचे पीठ हे सर्व बोंबला मध्ये एकत्र करून चमच्याने मिक्स करून घ्यायचं. तुमच्या घरात जशी माणसं असतील त्याप्रमाणे रस्सा वाढवायचा आणि पाच मिनिटानंतर गॅसवर भाजी ठेवून एक ऊकळा घेणे वरून थोडी कोथिंबीर बारीक कापून घालणे .झटपट बोंबलाचा रस्सा रेडी....#AV धन्यवाद 🙏 Ashwini Patil -
पारंपारिक पद्धतीने बोंबलाची पोंतेडी (bomblachi potendi recipe in marathi)
पारंपारिक पद्धतीने बोंबलाची पोतेंडीसाहित्य:-केळफुल ,कांदा ,मिरच्या ,कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट,मीठ,मसाला,हळद,अर्धा वाटी तांदळाचे पिठ,एक वाटी चण्याचे पीठ, एक चमचा गरम मसाला ,ओले बोंबील.कृती:- सर्वप्रथम केळफुल घेऊन ते साफ करून घ्यायचं .त्या बोंडाला साफ करताना एक मध्ये दांडी असते आणि एक पापुद्रा असतो तो काढून घ्यायचा आणि त्यानंतर ते बारीक कापुन घ्यायच. स्वच्छ पाण्याने धुऊन, त्यामध्ये बारीक कांदा कापून ,दोन मिरच्या बारीक कापून ,त्यामध्ये बारीक कोथिंबीर कापून ,त्यानंतर आलं लसूण पेस्ट, एक चमचा चविनुसार मीठ, दोन चमचे मसाला, एक चमचा हळद ,अर्धा वाटी तांदळाचे पिठ,एक वाटी चण्याचे पीठ, एक चमचा गरम मसाला आणि त्यामध्ये ओले बोंबील साफ करून स्वच्छ पाण्याने धुऊन बारीक कट करून मिक्स करून घ्यायचे. हे सगळं मिश्रण एकत्र करून गोळा बनवून घ्यायचा. त्यानंतर मध्ये तीन चमचे तेल टाकून भाकरी करून घ्यावी. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटाने ती भाकरी उलटी करून घ्यावी पुन्हा दहा मिनिटे गॅसवर शिजवून देणे .दहा मिनिटांनी गॅस बंद केल्यानंतर भाकरी थंड झाल्यानंतर तिचे तुकडे पाडावेत. अशा प्रकारे आपली बोंबलाची पोंतेडी रेडी झाली.#AVधन्यवाद 🙏 Hinal Patil -
पारंपारिक पद्धतीने तांदळाच्या पिठाची मुटकी (Tandalachya Pithache Mutke Recipe in Marathi)
पारंपारिक पद्धतीने तांदळाच्या पिठाची मुटकीसाहित्य :- तांदळाचं जाडसर पीठ, कोथिंबीर, मिरची, सोललेले वाल, बारीक कापलेला कांदा, नारळ खऊन घेतलेला ,मीठ ,तेल, हळद , जीरे , एक पेला तांदळाचे पीठ आणि दोन पेले पाणी .कृती :- सर्वप्रथम तेलावर फोडणी देण्यासाठी एक चमचा जीरे तीन ते चार मिरच्या बारीक कापून एक कांदा बारीक कापून, एक छोटी वाटी कोथिंबीर ,बारीक कापून अर्धा वाटी नारळ खीचून, मीठ, हळद ,एक चमचा छोटी वाटी वाल सोलले हे सगळं तेलावर फोडणी द्यायचं. त्यानंतर दोन ग्लास पाणी टाकून ऊकळुन घ्यायचं थोडे वाल शिजत आले की त्यामध्ये एक पेला तांदळाचे पीठ टाकायचं आणि उकडून घ्यायचं. उकडून झाल्यानंतर पीठ मळून हाताच्या मुठीने मुटके वाळायचे त्यानंतर पुन्हा उकडीच्या करंडयात दहा मिनिटांसाठी उकडून घ्यायचे खूप सुंदर अशी मुटकी आपली रेडी.Ashwini Mahesh Patil धन्यवाद Ashwini Patil -
वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजी (vanga batata kolambi tawa bhaji recipe in marathi)
सर्व ऋतू मध्ये मिळणारी हमखास भाजी म्हणजे वांग. सोबतच बटाटा व कोलंबी घालून केलेली झणझणीत अशी वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजीभाजी.#cpm5 Mrs. Snehal Rohidas Rawool -
ग्रीन व्हेजिटेबल कोफ्ता करी (green vegetable kofta curry recipe in marathi)
प्रथम पालक धुवून वाफवून घ्या.मुगडाळ वाटुन घ्या.मिरचीलसुणची पेस्ट करा.सर्व मिक्स करा.त्यामधे कोथिंबीर,मनुके ,काजु तुकडे घाला . चवीपुरते मीठ घालून त्याचे गोळे करुन तळुन घ्या.हे झाले कोफ्ते.ग्रेव्ही- कांदा चिरून थोडा शिजवुन घ्या.पालक पानं वाफवून घ्या.काजु, कांदा,पालककोथिंबीर, हिरवी मिरची,हे सर्व वाटुन घ्या.पॅनमध्ये तेल घालून वरील वाटण घाला.तेल सुटेपर्यंत परता.किंचित हळद ,गरम मसालाचवीपुरते मीठ घाला.पाणी घालून ग्रेव्ही तयार करून उकळवून त्यामधे कोफ्ते घाला.पराठा बरोबर सर्व्ह करा. Kusum Zarekar -
कोलंबी बिर्याणी
#फॅमिलीमाझ्या फॅमिली मधे सगळेच खवय्ये आहोत. पण प्रत्येकाची आवडनिवड वेगळी आहे. मला तर जास्त व्हेजच खायला आवडतं. पण माझ्या फॅमिली मधले पक्के नाॅनव्हेज खाऊ आहेत. मी क्वचितच खावंसं वाटलं तर खाते, पण मला फॅमिली साठी त्यांना खावंसं वाटेल तेव्हा व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बनवून खायला घालायला फार आवडतं. फिश खाण्याच्या बाबतीत मात्र खूप वेळा सगळ्यांची आवड एक होते. त्यातून फिश म्हटलं की पहिली पसंती कोलंबीच असते. कोलंबी पासून मी खूप वेगवेगळे प्रकार बनवत असते. कधी फक्त कोलंबी फ्राय तर कधी कोलंबीची आमटी, कधी कोलंबी मसाला, कोलंबी बिर्याणी इत्यादी. आज बरेच दिवसांनी कोलंबी मिळाली. पण ती साफ करण्यातच खूप वेळ गेला, आणि भुकेची वेळ जवळ येत होती. तेव्हा अगदी झटपट तयार होणारी आणि मस्त चटकदार अशी कोलंबी बिर्याणी बनवली. छान चमचमीत बिर्याणी खाऊन घरचे अगदी तृप्त झाले याचे समाधान वाटले. त्याच कोलंबी बिर्याणीची कृती देत आहे. Ujwala Rangnekar -
कोलंबी मसाला (kolambi masala recipe in marathi)
#GA4 #week18 #fishकोलंबी मसाला ही डिश चविष्ट आणि अगदी झटपट होणारी आहे. Ujwala Rangnekar -
कोलंबी कांद्याची पात घालून (kolambi kandychi paat ghalun recipe in marathi)
#GA4 #week18 #Fish हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. आमच्या कडे नेहमीच करतो भाकरी बरोबर छान लागते. Hema Wane -
कोलंबी, शेवगाच्या शेंगा नि बटाटा (एक पारंपरिक कालवण) (shevgachya shenga batata recipe in marathi)
#ही पालघर जिल्ह्यात करण्यात येणारी पारंपारिक रेसिपी आहे . Hema Wane -
माचोळ ची कोलंबी घातलेली आमटी
#रेसिपीबुक#गावाकडची आठवण#week2#सीफूड#SKP specialमाचोळ ही एक रान भाजी आहे ... खाडीच्या जावळ सपडते. नोवेंबर अखेर ते फेब्रुवारी अखेर. आमच्या एसकेपी (सोमवंशषिय क्षत्रिय पाठारे - पचकळशी) जाती मधे कोलंबी किंवा मटण घालून माचोळची आमटी करतात. Yadnya Desai -
भेंडीची चिंच गुळातली आमटी(bhendichi chinch gulatil aamti recipe in marathi)
मागील दोन-तीन महिन्यांतील कठीण काळात एक चांगली गोष्ट घडली. आपल्या कडे पूर्वी असलेला आणि मधल्या काळात विस्मरणात गेलेला एक गुण आपल्याला पुन्हा गवसला. आपण पुन्हा लहान गोष्टी तितक्याच उत्साहाने साजऱ्या करू लागलो. आजची ही भेंडीची भाजी अशीच खास आहे. भेंडी ही सर्व मोसमात मिळणारी काहीशी नॉन ग्लॅमरस भाजी. पण चिंचेचा आंबटपणा आणि गुळाचा गोडवा सोबत घेऊन साध्याशा भेंडीचे मेकओव्हर होते आणि जेवणाच्या ताटात ती भाव खाऊन जाते. चलो लेट्स सेलिब्रेट भेंडी! Ashwini Vaibhav Raut -
-
🟡अप्पम.. 🟢चटणी
🟡साहित्यएक वाटी तांदुळअर्धी वाटी ओले खोबरेमीठ चवीनुसारचटणी साठीकैरीपुदीनामिरची कोथिंबीरगुळमीठलाल मिरचीफोडणीचे साहित्य P G VrishaLi -
झटकेपट तुप अंड भाजी (Toop Anda Bhaji Recipe in Marathi)
नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील . तुम्हाला झटकेपट तुप अंड भाजी दाखवणार आहे .कृती:- पाच ते सहा अंडी उकडून घेणे .त्यानंतर त्याची साल काढून ती बारीक कापून घेणे . एका पातेल्यामध्ये तीन ते चार चमचे तूप घालून त्यामध्ये फोडणीसाठी तीन चमचे काळी मिरी पावडर ,दोन चमचे जिरा पावडर ,चवीनुसार मीठ हे सर्व फोडणीवर घालने, मग त्यामध्ये उकडलेलीअंडी बारीक कट करून घालने. पाच मिनिटांसाठी शिजवून द्यायचं. पातेल्यावर झाकण ठेवू नये .चमच्याने परतवत राहायचं वरून बारीक कोथिंबीर कापून घालने. आपली रेडी झाली तूप आणि अंड भाजी .#AVधन्यवाद 🙏 Ashwini Patil -
भरलेला पापलेट (Bharlela Paplet Recipe in Marathi)
साहित्य:- एक मोठा पापलेट साफ करून घ्यायचे. पापलेट च्या वरच्या भागाने राऊंड मध्ये दोन्ही साईडने गोल असं कट करून घ्यायचा आहे .त्यानंतर मसाला, थोडसं मीठ आणि त्याला थोडसं दोन तीन थेंब पाणी टाकून मिक्स करायचे आहे आणि आपण राऊंड कट केला आहे त्याला मसाल्याचा हात लावून घ्यायचा आहे. त्यानंतर वाटणा मध्ये कोथिंबीर, मिरची ,आलं, थोडस लसणाच्या चार ते पाच पाकळ्या ,एक चमचा लिंबू चा रस ,नारळ खऊन घ्यायचा आहे हे वाटण तेलावर फोडणी द्यायचं थोडं थंड झाल्यानंतर पापलेट मध्ये भरायचा आहे.पापलेट भरून झाल्यानंतर ते तांदळाच पीठ लावून तव्यावर फ्राय करायचं.#AV#cfAshwini Mahesh Patil: धन्यवाद Ashwini Patil -
इंडो कोलंबी चायनीज फ्राईड राईस (indo kolambi chinese fried rice recipe in marathi)
मी ह्याला इंडो नाव दिलेय कारण कोलंबी मी माझ्या पध्दतीने करून त्यात घातली आहे .अशी घातली कि भाताची चव छान होते नि त्याला थोडा झेजवान लुक येतो .तर बघा करून असा नक्की आवडेल . Hema Wane -
मालवणी कोलंबी तिखलं (MALVANI KOLAMBI TIKHLA RECIPE IN MARATHI)
कोकणातली सर्वांची फेवरेट रेसिपी म्हणजेच झटपट तयार होणारे तिखलं. आमसूल आणि कैरी चा आंबट स्वाद,हिरव्या मिरचीचा झणझणीत स्वाद असलेले कोलंबी तिखलं नॉर्मल ग्रेव्ही पेक्षा छान लागते. ही रेसिपी खाताना मला माझ्या गावाकडची आठवण येते. #रेसिपीबुक #गावाकडचीआठवण #week2 Madhura Shinde -
कोलंबी पुलाव (kolambi pulav recipe in marathi)
#फॅमिलीघरात सर्वाना आवडणारा कोलंबी पुलावSuchitra Bhogte
-
कोलंबी नवलकोल रस्सा (Kolambi Navalkol Rassa Recipe In Marathi)
कोलंबी ही मच्छी घरातील सर्वांनाच आवडते कारण त्याच्यात काटे नसतात. लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत कोलंबी खाऊ शकतात, फक्त कोलंबी पांढरी असावी म्हणजे सर्वांना पचण्यासाठी हलकी असतात. लाल रंगाची किंवा शीळी कोळंबी कधीही घेऊ नये, ती वातूळ असतात आज आपण नवलकोल कोलंबी हा अतिशय उत्कृष्ट चवीचा रस्सा बघणार आहोत. Anushri Pai -
कोलंबी मसाला (Kolambi Masala Recipe In Marathi)
#PR पार्टी रेसिपीज साठी मी आज माझी कोलंबी मसाला ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोलंबी दम बिर्याणी (kolambi dum biryani recipe in marathi)
#cm#आमच्या कडची माझ्या हातची ही फेवरेट डिश आहे .सगळेच खुष तुम्ही करून बघाच नि हा बिर्याणी मसाला घरी करा तुम्ही कधीच बाहेरचा मसाला वापरणार नाही. Hema Wane -
कोलंबी कोळीवाडा
कोलंबी चे कोणतेही प्रकार करा ती त्या मध्ये चार चांद लावते.आज मी सोपे पद्धतीने कोळंबी चे स्टार्टर केले आहे#सीफूड Madhuri Rajendra Jagtap -
ज़ाफरानी कोलंबी
#सीफूडकेशर म्हणजे ज़ाफरान... म्हणून ह्या डिश चे नाव ज़ाफरानी कोलंबी 😋😋😋 Yadnya Desai -
सोडे रस्सा (सुकी कोलंबी) (Sode Rassa Recipe In Marathi)
#ATW3#TheChefStoryओली कोलंबी आपण नेहमीच बनवतो मात्र पावसाळ्यात मासे किवा कोळंबी खायला मिळत नाही अशा वेळेस सुकी कोलंबी खाल्ली जाते. चला तर मग बनवूयात सोडे रस्सा. Supriya Devkar -
-
शेंगा बटाटा भाजी आणि मसाला रोटी
#lockdownrecipe day 15फ्रिजमधे शेवग्याच्या शेंगांचे तुकडे करुन एअरटाईट डब्यात घालून ठेवले होते. त्या शेंगा घेऊन त्यात 3 बटाटे घालून साधीच पण चवदार भाजी केली. आणि जरा बदल म्हणून चपतीच्या पीठात तिखट, हळद, ओवा आणि मीठ घालून मसाला चपात्या केल्या. Ujwala Rangnekar -
वांगी-बटाट्याची रस्सा भाजी (vaangi batatyachi rassa bhaaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week2रेसिपी ३वेगवेगळ्या ठिकाणी काही विशिष्ट पदार्थांचा वापर जेवणात केला जातो! जसे की काही ठिकाणी तीळ-शेंगदाण्याचा कुट तर काही ठिकाणी खोबरं! तसेच काहीसे माझ्या गावचे...!!!!माझे गाव वाणगाव(डहाणू)..ह्या पट्ट्यात चिंचेचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. मासे असले की सोबत चिंच कढी लागतेच!!!!अशीच मी एक रेसिपी शेअर करत आहे जी मला माझ्या गावची आठवण करून देते. ही आहे चिंच घालून केलेली वांगी बटाट्याची भाजी!!!गावी शेती असल्यामुळे आंबे, चिकू, पेरू, चिंच.. आणि वेगवेगळ्या भाज्यांची रेलचेल असायची! त्यातलीच गावठी वांगी घरी आणायची सोबत घरचीच चिंच आणि गॅस असुनसुद्धा चुलीवर बनवायची..मज्जा यायची... चुलीची चव म्हणजे आहाहा.!(ही भाजी कोलंबी घालून पण छान लागते.) Priyanka Sudesh -
फ्लॉवर, मटार रस्सा भाजी (flower mutter rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week24#cauliflowerआज मी फ्लॉवर, मटार, बटाटा, टोमॅटोची रस्सा भाजी बनविली. Deepa Gad -
कोलंबी फ्राय (kolambi fry recipe in marathi)
#GA4 #week5 #fishकोलंबी फ्राय हे आमच्या घरी सर्वांना खूप आवडते. मला तर फिश फ्राय मधे कोलंबी फ्राय हे सगळ्यात जास्त आवडीची आहे. साफ करताना त्याचे बाहेरील कवच काढावे, आणि आतील दोरा अलगद न तूटता काढावा, तो दोरा पांढरा, लाल किंवा काळ्या रंगाचा असतो. दोरा नाही काढला तर पोटात दुखते. खरपूस कुरकुरीत कोलंबी फ्राय बनवायला खूप सोपी अगदी पटकन होते. याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar
More Recipes
टिप्पण्या