नागपुर स्पेशल झणझणीत पाटवडी रस्सा (patwadi rasa recipe in marathi)

R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
Nagpur Maharashtra

#cf महाराष्ट्राच्या गावरान रेसिपी खूप प्रसिद्ध आहे आणि विदर्भाची स्पेशल झणझणीत पाटवडी रस्सा भाजी ची चव वेगळीच आहे

नागपुर स्पेशल झणझणीत पाटवडी रस्सा (patwadi rasa recipe in marathi)

#cf महाराष्ट्राच्या गावरान रेसिपी खूप प्रसिद्ध आहे आणि विदर्भाची स्पेशल झणझणीत पाटवडी रस्सा भाजी ची चव वेगळीच आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

चाळीस मिनिट
चार सर्विस
  1. 2 वाटीबेसन
  2. 1 चमचाआल्याची पेस्ट
  3. 1/2 चमचाहळद
  4. 1 चमचामीठ
  5. 1/4 चमचाआल्याची पेस्ट
  6. काळा मसाला
  7. 2मोठे कांदे
  8. 1टोमॅटो
  9. 1दालचिनीचा तुकडा
  10. 2मोठी विलायची
  11. 1 चमचाजीरे
  12. 2तेच पान
  13. 1 चमचासुखं खोबरं
  14. चमचाहिंग

कुकिंग सूचना

चाळीस मिनिट
  1. 1

    दोन वाटी बेसनात मीठ घालून भजी सारखा पीठ भिजवून घ्यायचा

  2. 2

    एका कढाईत दोन चमचे तेल घालून आलं-लसूण पेस्ट भाजून घ्यायची त्यात हळद तिखट हिंग मीठ घालून थोडं परतायचं

  3. 3

    आता हे चार भिजवलेल्या बेसन चे पीठ घालून छान फिरवायचं आणि लवकर पळीने फिरवून सात ते आठ मिनिटे शिजवून घ्यायचं घट्ट व्हायला लागला की गॅस बंद करून वड्या थापून घ्यायच्या

  4. 4

    तेल घालून फोडणी तयार करायची आणि त्यात आलं-लसणाची पेस्ट कांदा टमाटर मोठी विलायची जीरे दालचिनी घालून परतून घ्यायचं तयार करून घ्यायची

  5. 5

    कढईत तेल घालून वाटलेला मसाला घालून रस्सा तयार करून घ्यायचा रस्सा छान उकळू द्यायचा

  6. 6

    आता पाटवडी वडीच्या आकारांमध्ये कापून घ्यायच्या गरम गरम रस त्यात घालून लगेच खायला द्यायच्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
R.s. Ashwini
R.s. Ashwini @Ash_Gourmet
रोजी
Nagpur Maharashtra
A connoisseur of good food
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes