"झणझणीत पाटवडी रस्सा" (patwadi rassa recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#डिनर

#शुक्रवार_पाटवडी रस्सा

#डिनर प्लॅनर मधील माझी सहावी रेसिपी
या रेसिपी ला विदर्भ स्पेशल असे का म्हणतात तेच कळत नाही.. कारण आमच्या जुन्नर, आंबेगाव तालुक्यात तर नवीन नवरीच्या दुसऱ्या बोळवणीला (पाठवणीला)
शिदोरी म्हणून ही पाटवडी लागतेच..हो रस्सा नसतो म्हणा..
आणि बाळाच्या बारावी ला सुद्धा पाटवडी लागतेच.. अगदी काही जण तर डोहाळे जेवणाला सुद्धा माहेराहून पाटवडी ची शिदोरी आणतात.. रस्सा मात्र घरी पाटवडी बनवली तरच असतो..
माझी रेसिपी तशीच आहे की वेगळी आहे.. चला तर मग रेसिपी बघुया.

"झणझणीत पाटवडी रस्सा" (patwadi rassa recipe in marathi)

#डिनर

#शुक्रवार_पाटवडी रस्सा

#डिनर प्लॅनर मधील माझी सहावी रेसिपी
या रेसिपी ला विदर्भ स्पेशल असे का म्हणतात तेच कळत नाही.. कारण आमच्या जुन्नर, आंबेगाव तालुक्यात तर नवीन नवरीच्या दुसऱ्या बोळवणीला (पाठवणीला)
शिदोरी म्हणून ही पाटवडी लागतेच..हो रस्सा नसतो म्हणा..
आणि बाळाच्या बारावी ला सुद्धा पाटवडी लागतेच.. अगदी काही जण तर डोहाळे जेवणाला सुद्धा माहेराहून पाटवडी ची शिदोरी आणतात.. रस्सा मात्र घरी पाटवडी बनवली तरच असतो..
माझी रेसिपी तशीच आहे की वेगळी आहे.. चला तर मग रेसिपी बघुया.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
पाच, सहा
  1. 1 कपबेसन पीठ
  2. 1 टेबलस्पूनहिरवी मिरची,लसूण, आले,पेस्ट
  3. 1/4 टीस्पूनहळद
  4. 2 टेबलस्पूनतेल
  5. चवीनुसारमीठ
  6. 1 टेबलस्पूनखवलेला नारळ
  7. आवडीनुसार कोथिंबीर
  8. रस्सा बनवण्यासाठी.
  9. 1/4 वाटीसुके खोबरे
  10. 1/4 वाटीओले खोबरे
  11. 2कांदे
  12. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  13. 1 टेबलस्पूनघरचा मसाला
  14. 1 टीस्पूनकिचन किंग मसाला
  15. चवीनुसारमीठ
  16. आवश्यकतेनुसार पाणी
  17. आवडीप्रमाणे कोथिंबीर, कडिपत्ता
  18. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जीरे हिंग हळद, हिरवी मिरची लसूण आले पेस्ट घालावी. चांगले परतून घ्यावे.व दोन कप पाणी घालून मिडीयम गॅसवर उकळत ठेवावे..

  2. 2

    तोपर्यंत बेसन पीठ एका वाटी मध्ये घेऊन थोडे थोडे पाणी घालून चांगले मिक्स करावे, गुठळ्या होऊ नये याची काळजी घ्यावी.

  3. 3

    पॅनमधील पाण्याला उकळी आली की त्यात बेसन पीठाचे बॅटर घालून सतत ढवळत राहावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत..पाणी आणि बेसन पीठ एकजीव झाले की झाकण ठेवून बारीक गॅसवर शिजू द्यावे.. पीठ पॅन सोडायला लागले की समजावे बेसन शिजले आहे... दुसरी पद्धत म्हणजे हात लावून बघावे हाताला चिकटले नाही तर बेसन शिजले आहे असे समजावे..कच्चे असेल तर हाताला चिकटते..

  4. 4

    ताट उलटे करून तेल लावून घ्यावे..व शिजलेले बेसन त्यावर काढून चमच्याने किंवा स्पॅच्युला ने एकसारखे पसरवून घ्यावे.. त्यावर कोथिंबीर आणि खोवलेला नारळ भुरभुरावा..व तसेच थंड होण्यासाठी ठेवावे

  5. 5

    तोपर्यंत रस्स्याची तयारी करून घ्यावी.. खोबरे कांदे कापून घ्यावे व तेल घालून भाजून घ्यावे.. मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे..

  6. 6

    कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जीरे हिंग हळद, घरचा मसाला, लाल तिखट, किचन किंग मसाला, कोथिंबीर, कडिपत्ता घालून परतून घ्यावे व वाटप केलेला मसाला घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतावे..व नंतर गरम पाणी टाकावे म्हणजे छान तर्रीवाला रस्सा होतो..

  7. 7

    रस्सा दहा मिनिटे मध्यम आचेवर उकळू द्यावा.. म्हणजे रस्सा तयार झाला..

  8. 8

    ताटावर थापलेली पाटवडी थंड झाल्यावर हव्या त्या आकारात कापून घ्यावी... रस्सा तयार आणि वडी ही तय्यार.. वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.. झणझणीत पाटवडी रस्सा.. चपाती भाकरी भातासोबत सर्व्ह करावे..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

Similar Recipes