पाटवडी (patvadi recipe in marathi)

kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06

#KS3
मसाला पाटवडी , रस्सा पाटवडी , फ्राय पाटवडी.
विदर्भ स्पेशल..!

पाटवडी (patvadi recipe in marathi)

#KS3
मसाला पाटवडी , रस्सा पाटवडी , फ्राय पाटवडी.
विदर्भ स्पेशल..!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
५-६ सर्व्हस
  1. 1 टेबलस्पूनतीळ
  2. 1 टेबलस्पून खसखस
  3. 1 टेबलस्पून धने
  4. 1 टेबलस्पूनदाळवं
  5. 1 टेबलस्पूनजीरे
  6. 2मोठे कांदे
  7. 1/2 तुकडेखोबळं खोबऱ्याचे
  8. 1 वाटी डाळीचे पीठ
  9. 1.5 वाटी पाणी
  10. अद्रक लसूण पेस्ट
  11. 7-8हिरव्या मिरच्या
  12. कढीपत्ता
  13. 1 वाटीखोबरा कीस
  14. कोथिंबीर
  15. हळद
  16. लाल मिरची पावडर
  17. काळा मसाला
  18. मीठ
  19. तेल

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    मसाला तयार करण्यासाठी तीळ, जीरे,धने,डाळवं, खसखस, खोबऱ्याचे तुकडे व कांदा भाजून घेणे.

  2. 2

    भाजून झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेणे.

  3. 3

    पाटवडे बनवण्याकरिता मिक्सर मध्ये हिरवी मिरची, थोडी कोथिंबिर बारिक करून घेणे.

  4. 4

    गॅसवर पातेलं ठेवून त्यात २ चमचे तेल टाकून १/२ टेबलस्पून जीरे मोहरी, कडीपत्ता, मिरची-कोथिंबीर पेस्ट, अद्रक लसुन पेस्ट टाकून एकत्रित करून घेणे.

  5. 5

    नंतर १ टेबलस्पून हळद,१/२ टेबलस्पून लाल मिरची पावडर,चवीनुसार मीठ, १.५ वाटी पाणी टाकून उकळी येऊ देणे.

  6. 6

    पाण्याला उकळी आली की १ वाटी डाळीचे पीठ टाकायचं आणि हलवायचं जेणेकरून त्याचा घट्ट गोळा तयार होईल अशा पद्धतीने.

  7. 7

    ५ मिनिटं झाकून ठेवायचं,वाफ येईपर्यंत ताटाला तेल लावून घेणे.

  8. 8

    गॅस बंद करुन पातेल्यातलं मिश्रण ताटात काढून घेणे व पाण्याचा हात लावून पातळ थापून घेणे. नंतर त्यावर खोबर्‍याचा किस व कोथिंबीर टाकणे,
    त्याचे काप करून घेणे.

  9. 9

    आता पाटवडी रस्सा बनवण्यासाठी कढई गॅसवर ठेवून त्यात २ चमचे तेल टाकावे. नंतर जीरे मोहरी,अद्रक लसूण पेस्ट, कांदा खोब्रा पेस्ट, १ टेबलस्पून हळद, १ टेबलस्पून लाल मिरची पावडर, १/२ टेबल्स्पून काळा मसाला, चवीनुसार मीठ(१ टेबलस्पून) लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत हलवायचं.

  10. 10

    तुम्हाला हवे तेवढे पाणी टाकून पातळ करावे. उकळी आल्यावर त्याच्यात पाटवड्याचे थोडे तुकडे टाकून गॅस बंद करणे. व नंतर वरुन कोथिंबीर टाकणे.

  11. 11

    मसाला पाटवडी करण्याकरता कढई मध्ये २ चमचे तेल टाकून जीरे मोहरी, कढीपत्ता, १ टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट, १ टेबलस्पून लाल मिरची पावडर, १ छोटा टेबलस्पून हळद, १/२ टेबलस्पून काळा मसाला, चवीनुसार मीठ आणि पाटवडीचे तुकडे करून टाकावे. नंतर मिक्स करून त्यामध्ये कोथिंबीर टाकून झाकून ठेवून देणे.

  12. 12

    अशा सोप्या पद्धतीने आपले ३ प्रकारचे पाटवडी तयार झाल्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
kalpana Koturkar
kalpana Koturkar @kalpanakoturkar06
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes