पुरण पोळी (puran poli recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#hr
आज माझी 200 वी रेसिपी पोस्ट करत आहे ....
होळी रे होळी पुरणाची पोळी.. असं म्हणत होलिका पुजनासाठी प्रत्येक घरात आवर्जून करतात ती पुरणपोळी ...
पुरण पोळी करण्यासाठी आजकाल प्रत्येक जण वेगवेगळ्या आणि सोयीनुसार पद्धती वापरतात पूर्वी पुरणपोळी करण्यासाठी पुरणपात्राचा वापर करायचे पण आता मिक्सरमध्ये बारीक वाटूनही मॅशरने मॅश करून पुरण करतात तसेच पुरणजाळी वापरून पुरण करतात.मी यांत डाळ कुकरमध्ये शिजवून गूळ घालून मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पुरण शिजवून जाळीने गाळून केले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
8-10 पुरणपोळी
  1. 1 कपचणाडाळ / हरभरा डाळ
  2. 2 कपपाणी
  3. 1कपा पेक्षा कमी गूळ
  4. 2-3 टेबलस्पूनसाखर
  5. चवीनुसारमीठ
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टेबलस्पूनबदाम पूड
  9. 1 टेबलस्पूनकाजू पूड
  10. 1 टीस्पूनजायफळ वेलची केशर 2 लवंग सुंठ पावडर
  11. 1 कपकणीक
  12. 1 कपमैदा
  13. 1 टेबलस्पूनतेल
  14. चवीनुसारमीठ
  15. 1/2 टीस्पूनहळद
  16. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    चणाडाळ / हरभरा डाळ 1-2 स्वच्छ धुवून भिजत घालावी. कुकरमध्ये डाळ 2 कप पाणी हळद थोडे तेल घालून शिजवून घ्यावी आणि गाळून पाणी वेगळे करावे या पाण्याची कटाची आमटी करता येते.

  2. 2

    आता शिजवलेली डाळ गूळ साखर चिमूटभर मीठ घालून 3-4 मिनिटे मायक्रोवेव्ह करावे आणि एकत्र करावे आणि 5-7 मिनिटे परत मायक्रोवेव्ह करावे अधूनमधून मिक्स करावे गरजेनुसार 1-2 मिनिटे मायक्रोवेव्ह करावे आणि तयार पुरण गाळण्यातून गाळून घ्यावे चमचा वापरून लवकर गरम पुरण लवकर गाळता येते यामुळे पुरण एकसारखे मऊसूत होते.

  3. 3

    मिक्सरमध्ये बदाम बारीक वाटून घ्या त्यात काजू केशर लवंग जायफळ वेलची सुंठ घालून एकत्र बारीक वाटून घ्यावे आणि तयार पुरणात एकत्र करावे यामुळे पुरणपोळीची चव फारच अप्रतिम येते.

  4. 4

    परातीत कणीक मैदा हळद मीठ घालून एकत्र करावे तेल घालून सर्व पीठाला चोळून घ्यावे आणि हळूहळू पाणी घालून गोळा भिजवून घ्यावा तेलाचा हात लावावा आणि 10-15 मिनिटे झाकून ठेवा.

  5. 5

    कणीकेचे गोळा घेऊन त्याचा उंडा करून नाहीतर थोड लाटून पुरण भरून नीट बंद करून घ्यावा गरजेनुसार थोड तेल वापरावे.

  6. 6

    तवा गरम करण्यासाठी ठेवा आणि कोरडे गव्हाचे पीठ नाहीतर मैदा वापरुन पुरणपोळी लाटून अलगदपणे तव्यावर घाला आवडीनुसार तुपावर दोन्ही बाजूंनी भाजून घ्या तयार पुरणपोळी तूपावर दुधाबरोबर नाहीतर कटाच्या आमटी बरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes