पारंपरिक पुरणपोळी (paramparik puran poli recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#hr
#puranpoli
होळी रे होळी, पुरणाची पोळी...होळीला पुरणपोळीचा नैवेद्य हा हवाच. घरोघरी पुरणपोळ्यांचा सुवास दरवळू लागतो. पदार्थ जरी तोच असला तरी प्रत्येकाची बनवण्याची रीत वेगवेगळी असते. आज मी घेऊन आले आहे थोडीशी वेगळी पण पारंपरिक पुरणपोळीची रेसिपी जी मऊ, लुसलुशीत,तोंडात टाकताच लगेच विरघळणारी. मला ही रेसिपी सासूबाईंनी शिकवली. त्यांना त्यांच्या सासूबाईंनी शिकवली.कदाचित त्यांनाही त्यांच्या सासूबाईंनी शिकवली असेल. चला तर मग पाहूया पारंपरिक पुरणपोळी रेसिपी.

पारंपरिक पुरणपोळी (paramparik puran poli recipe in marathi)

#hr
#puranpoli
होळी रे होळी, पुरणाची पोळी...होळीला पुरणपोळीचा नैवेद्य हा हवाच. घरोघरी पुरणपोळ्यांचा सुवास दरवळू लागतो. पदार्थ जरी तोच असला तरी प्रत्येकाची बनवण्याची रीत वेगवेगळी असते. आज मी घेऊन आले आहे थोडीशी वेगळी पण पारंपरिक पुरणपोळीची रेसिपी जी मऊ, लुसलुशीत,तोंडात टाकताच लगेच विरघळणारी. मला ही रेसिपी सासूबाईंनी शिकवली. त्यांना त्यांच्या सासूबाईंनी शिकवली.कदाचित त्यांनाही त्यांच्या सासूबाईंनी शिकवली असेल. चला तर मग पाहूया पारंपरिक पुरणपोळी रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 पोळ्या
  1. पुरणपोळीच्या पारीसाठी
  2. 1 कपरवा
  3. 1 कपमैदा
  4. 1/4 कपतेल
  5. मीठ चवीनुसार
  6. पोळी लाटायला तांदळाची पिठी
  7. पुरणासाठी
  8. 2 कपहरबरा डाळ
  9. 1 कपगूळ
  10. 1 कपसाखर
  11. 1 टीस्पूनवेलची पूड
  12. 1/4 टीस्पूनजायफळ पूड
  13. चिमूटभरहळद
  14. चिमूटभरमीठ
  15. तूप सर्व्ह करताना

कुकिंग सूचना

  1. 1

    हरबरा डाळ निवडून, स्वच्छ धुऊन 2 तास भिजत ठेवावी म्हणजे चांगली शिजते. मोठे जाड बुडाच्या पातेल्यात 6 कप पाणी घालून डाळ शिजवत ठेवावी. यात चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ घालावे. वरुन अर्धवट झाकण ठेवावे. मध्ये मध्ये हलवत राहावे.जर कुकरमध्ये डाळ शिजवायची असेल तर पाणी घातल्यावर कुकरचे झाकण बंद करून 5 शिट्या काढाव्यात मग मंद गॅसवर ५ मिनिटे डाळ शिजू द्यावी.

  2. 2

    डाळ चांगली शिजल्यावर चाळणीवर काढून जास्तीचे पाणी काढून घ्यावे. यालाच कट असे म्हणतात. कट काढल्यामुळे पुरणपोळी हलकी होते. कट काढून शिजलेली डाळ परत पातेल्यामध्ये घालून गूळ-साखर घालून चांगले घोटावे. गूळ साखर घातल्यावर ते पातळ होईल.

  3. 3

    मग हळूहळू ते घट्ट होत जाईल. घट्ट व्हायला लागल्यावर वेलचीपूड, जायफळ पूड घालून मिक्स. करावे. पुरण चांगले घट्ट शिजवावे म्हणजे चमचा मध्ये उभा केला तर पडणार नाही इतपत घट्ट हवे. मग गरम गरम पुरण पुरणयंत्रातून वाटून घ्यावे.

  4. 4

    रवा, मैदा चाळून घ्यावे. एका कढल्यात पाव वाटी तेल कडकडीत गरम करुन घ्यावे.

  5. 5

    परातीमध्ये चाळलेला रवा, मैदा घेऊन त्यात मीठ व तेलाचे कडकडीत मोहन घालून पाण्याने सैलसर मळावे. मळून झाल्यावर ते दोन तास तसेच बाजूला ठेवावे. मग तेलाचा वापर करून परत चांगली कुटून/मळून घ्यावे. जेवढे जास्त मळले जाईल तेवढी पोळी सुंदर होते.

  6. 6

    मळलेल्या पिठाचे व पुरणाचे छोटे गोळे बनवून घ्यावेत. पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट पुरणाचा गोळा असावा.मळलेल्या पिठाच्या गोळ्याची वाटी सारखी पारी करून पुरणाचा गोळा त्यावर ठेवावा. पारी बंद करून आपला पुरणाचा उंडा तयार.

  7. 7

    पुरणाचा उंडा तांदळाच्या पिठीवर लाटून पोळी करून घ्यावी म्हणजे पोळपाटाला चिकटणार नाही.पोळी अलटपलट करून लाटू नये.एकाच बाजूने लाटावी.

  8. 8

    मग पोळी मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्यावी.

  9. 9

    गरम-गरम पुरणपोळी साजूक तूप घालून सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

Similar Recipes