मिक्स डाळींची आमटी (mix dadichi amti recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#प्रोटीन युक्त मिक्स डाळींची आमटी केव्हातरी भाज्यां खाण्याचा कंटाळा आला की अशी डाळीची आमटी करून बघा खुप छान टेस्टी ( दोन घास जास्तच जातील ) चला बघुया आमटीची रेसिपी

मिक्स डाळींची आमटी (mix dadichi amti recipe in marathi)

#प्रोटीन युक्त मिक्स डाळींची आमटी केव्हातरी भाज्यां खाण्याचा कंटाळा आला की अशी डाळीची आमटी करून बघा खुप छान टेस्टी ( दोन घास जास्तच जातील ) चला बघुया आमटीची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०-१५ मिनिटे
३-४ जणांसाठी
  1. 2 टीस्पूनकाश्मिरी तिखट
  2. 1-2 टीस्पूनगुळ पावडर
  3. ५० ग्रॅम मिक्स डाळी
  4. 1/2 टीस्पूनमोहरी
  5. चविनुसारमीठ
  6. 1-2 टेबलस्पुनतेल
  7. 1कांदा उभा चिरलेला
  8. 1टोमॅटो बारीक चिरलेले
  9. 2-3 टेबलस्पुनभाजलेला कांदा खोबरआलं लसुण कोथिंबिरीचे वाटण
  10. 1/2 टीस्पूनजीरे
  11. 1 टीस्पूनधने पावडर
  12. 1/4 टीस्पूनहळद
  13. 1 टेबलस्पुनघरगुती तिखट

कुकिंग सूचना

१०-१५ मिनिटे
  1. 1

    मिक्स डाळ २-३ तास पाण्यात भिजत घाला व आमटीला लागणारे इतर साहीत्य काढुन ठेवा

  2. 2

    लहान कुकरमध्ये तेल गरम झाल्यावर मोहरी जीरे हळद टाकल्यावर परता व कांदा टाकुन चांगले परता कांदा थोड़ा लालसर झाल्यावर तयार कांदा खोबऱ्याचे वाटण टाकुन परता

  3. 3

    नंतर त्यातच धनेपावडर, दोन्ही तिखट टाकुन परता व चिरलेले टोमॅटो टाकुन परतुन शिजवा

  4. 4

    नंतर त्यात च भिजलेल्या डाळी टाका व परतुन घ्या १-२ मिनिटे नंतर त्यात गरम पाणी व मीठ टाका व झाकण लावुन २-३ शिट्टया काढा

  5. 5

    ५-१० मिनिटाने कुकरचे झाकण काढुन त्यात गुळाची पावडर व आवश्यकते नुसार गरमपाणी टाकुन गॅसवर ऐक उकळी काढा आपली मिक्स डाळीची आमटी तय्यार

  6. 6

    चमचमीत गरम मिक्स डाळीची आमटी बाऊलमध्ये सर्व्ह करा वापरलेल्या डाळी व पुदिना पानांनी सजवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या

Similar Recipes