मेलन लेमन ज्यूस (watermelon lemon juice recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#jdr

लालचुटुक रंगाचे हे कलिंगड पण यात भारीच बिया बाई.... खरचं निसर्गाने हे फळ बनविताना त्यात इतक्या बिया का टाकल्या असतील... याला बियाच नसत्या तर मस्त पटापटा हे फळ खाता आले असते...
असो.. निसर्गाला काय दोष द्यायचा... इतके छान फळ त्याने आपल्याला प्रदान केले..

कलिंगड हे एक वेलवर्गीय फळ आहे. यामधे 92% पाणी असते त्यामुळे याच्या सेवनाने शरीरा तील पाण्याची पातळीसमतोल रहाण्यास मदत होते. ऊन्हाळ्यात आवर्जून खावे. यामधे व्हिटामिन 'ए' व ' सी ' मुबलक असते.तसेच उच्च रक्तदाब , ह्रदयरोग ,कॅन्सर या आजाराना काही प्रमाणात दूर ठेवण्यासही मदत करते. कलिंगडाच्या सेवनाने कॅलरीज् वाढत नाहीत. अशा या बहुगूणी फळा चा मी ज्युस बनविला आणि त्याचा बियां शिवाय आस्वाद घेतला....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिटे
२ जणांसाठी
  1. 1कलिंगड
  2. 4-5 पुदिन्याची पाने
  3. 1लिंबू रस
  4. 2 टेबलस्पूनसाखर
  5. 1/2 टीस्पूनमीठ
  6. 1/2 टीस्पूनकाळे मीठ

कुकिंग सूचना

१० मिनिटे
  1. 1

    प्रथम कलिंगडाच्या फोडी करून त्याच्या बिया कडून घ्याव्यात.

  2. 2

    मिक्सर मध्ये फोडी काढून घेऊन त्यात पुदिन्याची पाने घालावीत

  3. 3

    नंतर त्यात साखर, मीठ, काळे मीठ व लिंबू रस घालावा.

  4. 4

    वरील मिश्रण मिक्सर ला फिरवून घ्यावे.

  5. 5

    आता आपले मेलन लेमन ज्यूस तय्यार..... एका कलिंगडाचे दोन भाग करून एका भागातील गर काढून त्या भागात हा ज्यूस ओतावा..... सजावटीला वरून पुदीन्याची पाने, एखाद दुसरा कलिंगडाचा लहान तुकडा व आईसक्यूब घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes