साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

Rupali Atre - deshpande
Rupali Atre - deshpande @Rupali_1781

साबुदाणा खिचडी (sabudana khichdi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपसाबुदाणा
  2. 1/2 कपशेंगदाणा कूट (कमी जास्त करणे)
  3. 1 टेबलस्पूनतूप
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 6-7हिरवी मिरची (आवडीप्रमाणे घेणे)
  6. कोथिंबीर
  7. 2उकडलेले बटाटे
  8. चवीनुसारमीठ
  9. चवीनुसारसाखर
  10. आवश्यकतेनुसार पाणी (साबुदाणा भिजवण्यासाठी)

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    प्रथम साबुदाणा स्वच्छ धून त्यातील स्टार्च निघून जाते. त्यात थोडेसे पाणी घालून साबुदाणा 5-6 तास भिजवून घेणे. दुसऱ्या दिवशी करणार असेल तर रात्रभर साबुदाणा भिजत ठेवणे. छान मऊ मोकळा भिजला जातो.बटाटा उकडून घेणे.

  2. 2

    आता मिक्सर पॉट मध्ये मिरची, कोथिंबीर, जीरे याची पेस्ट करून घेणे. आता गॅस वर कढई ठेवून त्या मध्ये तूप घालावे. ते गरम झाले कि जीरे घालावेत. आता त्या मध्ये उकडलेला बटाटा फोडी करून घालणे. त्यात थोडी मिरची पेस्ट घालून परतून घेणे.

  3. 3

    तो पर्यंत साबुदाणा मध्ये चवीनुसार मीठ, साखर, राहिलेली मिरची पेस्ट आणि आवडेल तसा शेंगदाणा कूट घालून साबुदाणा एकत्र करून घेणे. हा साबुदाणा कढई मध्ये घालून छान खिचडी हलवून घेणे.

  4. 4

    झाकण न ठेवता खिचडी छान 5-7 मिनिट मध्यम आचेवर हलवत शिजवून घेणे. तूप कमी वाटले तर वरून थोडे तूप घालू शकता. हळू हळू खिचडी मऊ, मोकळी शिजू लागते. शिजत आली कि अगदी थोडासा रंग बदलतो. वरून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

  5. 5

    मस्त चटकदार हिरवी खिचडी तयार झाली.गरम गरम दही, ताक,उपवास लोणचे सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Atre - deshpande
रोजी

Similar Recipes