शेवग्याच्या पानांची मोकळी भाजी (shevgyachya panachi mokdi bhaji recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#Immunity # रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा दृष्टिकोनातून, शेवगा आणि पांढरा कांदा अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे जेवणात यांचा उपयोग आवश्यक आहे. म्हणून मग मी आज शेवग्याच्या पानांची, पांढरा कांदा घालून मोकळी भाजी केली आहे. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी, झटपट होणारी आणि करायला एकदम सोपी.. तेव्हा बघुया..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीशेवग्याची पाने
  2. 2मोठे पांढरे कांदे चिरून
  3. 3-4लाल मिरच्या
  4. 4-5लसूण पाकळ्या चिरून
  5. 1-1/2 टेबलस्पूनतेल
  6. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1/2 टीस्पूनधणे पूड
  9. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    आधी शेवग्याची पाने स्वच्छ निवडून धुवून घ्यावी. आणि चिरून घ्यावी. कांदा,मिरची लसूण चिरून घ्यावे.

  2. 2

    गॅसवर एका कढईत तेल टाकून ते गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी टाकून ते तडतडल्यावर त्यात कांदा, मिरची आणि लसूण टाकून चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    कांदा सोनेरी झाल्यावर त्यात हळद आणि धणे पूड घालून मिक्स करावे. आता त्यात चिरलेली शेवग्याची पाने टाकावी. मिक्स करून चवीनुसार मीठ टाकावे.

  4. 4

    झाकण न ठेवता भाजी शिजू द्यावी. 3-4 मिनिटात भाजी शिजते. भाजी तयार आहे खाण्यासाठी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Top Search in

Similar Recipes