अळूच्या पानांच्या वड्यांची मोकळी भाजी (Aluchya Vadyanchi Bhaji Recipe In Marathi)

मैत्रिणींनो , आपण नेहमी धोप्याच्या पानांची वडी खातो. पण विदर्भात त्यातही पोळ्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे खांदमर्दन च्या दिवशी ही मोकळी भाजी करतात आणि आणि हा नैवेद्य ,ज्वारीचा ठोंबरा आणि कढीसोबत बैलांना खाऊ घालतात. पण इतर वेळीही ही भाजी पोळी /भाकरीसोबत खूप छान लागते . तर बघूया पोळ्याच्या निमित्तानं धोप्याच्या पानांच्या वड्यांची .मोकळी .भाजी....वैदर्भिय पद्धतीने ...
अळूच्या पानांच्या वड्यांची मोकळी भाजी (Aluchya Vadyanchi Bhaji Recipe In Marathi)
मैत्रिणींनो , आपण नेहमी धोप्याच्या पानांची वडी खातो. पण विदर्भात त्यातही पोळ्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे खांदमर्दन च्या दिवशी ही मोकळी भाजी करतात आणि आणि हा नैवेद्य ,ज्वारीचा ठोंबरा आणि कढीसोबत बैलांना खाऊ घालतात. पण इतर वेळीही ही भाजी पोळी /भाकरीसोबत खूप छान लागते . तर बघूया पोळ्याच्या निमित्तानं धोप्याच्या पानांच्या वड्यांची .मोकळी .भाजी....वैदर्भिय पद्धतीने ...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम पाने धुऊन पुसुन घ्यावीत. नंतर पानांना लावायला बॕटर तयार करुन घ्यावे. कोरड्या बेसनात दिड टेबलस्पून तिखट, 1/४ टीस्पून हळद, 1/2 टेबलस्पून आलेलसूण पेस्ट, ओवा, तिळ, थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून दही/ ताक घालावे. म्हणजे घसा खाजवत नाही. नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून भज्यांच्या पिठापेक्षा थोडे घट्ट भिजवावे. म्हणजे पानांना ते लावता येईल.
- 2
आता एक पान ठेवून त्याला तयार केलेले बॕटर लावून घ्यावे.त्यावर पुन्हा एक पान ठेवून अर्ध्या भागावर बॕटर लावून त्याला घडी घालावी. पुन्हा अर्ध्या भागावर लावून घडी घालावी. ही वडी तयार झाली वाफवायला. याचप्रमाणे दुसरीही वडी तयार करुन घ्यावी.
- 3
आता या वड्यांना वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर त्याच्या छोट्या छोट्या वड्या कापून घ्याव्यात. नंतर त्यांना हाताने थोड्या बारीक करुन घ्याव्यात. या वड्या आता भाजीसाठी तयार झाल्यात.
- 4
आता कढईत तेल टाका. जिरेमोहरी टाकून तडतडल्यावर त्यात उभा चिरुन घेतलेला कांदा टाकावा. किंचित सोनेरी रंग आल्यावर त्यात आलेलसूण पेस्ट, हळद, तिखट, मीठ टाकावे. चांगले एकञ करुन घेतल्यानंतर तयार असलेल्या वड्या त्यामध्ये टाकाव्या. आणि मिक्स करुन झाकण न ठेवता 2 मिनीट शिजू द्याव्यात.
- 5
आता वड्यांची मोकळी भाजी तयार झालीय. आता एका भांड्यात भाजी काढून घ्या. वरुन कोथिंबीर पेरा. आणि गरमागरम पोळी किंवा भाकरीसोबत जेवायला द्या.
Similar Recipes
-
मक्याच्या दाण्यांची रस्सा भाजी (maka dana bhaaji recipe in marathi)
मक्याचे विविध पदार्थ आपण करतो. त्यातीलच एक मक्याच्या दाण्यांची रस्सा भाजी मी केलीय . गरमागरम पोळी किंवा भाकरीसोबत खूप छान लागते . तेव्हा बघूया रेसिपी .... Varsha Ingole Bele -
कोहळ्याची /लाल भोपळ्याची भाजी (lal bhoplyachi bhaaji recipe in marathi)
नमस्कार ! शिर्षक वाचून कदाचित तूम्हाला ही काय सांगणार असे वाटेल... असो! विदर्भात खेडोपाडी , काही समारंभ असेल तर हमखास ही भाजी केल्या जाते. आणि इतर वेळीही करतात . कुठलाही तामझाम न वापरता, घरी उपलब्ध असलेल्या साहित्यातच अशी भाजी बनविता येते. त्यामुळे या भाजीचे जास्त प्रचलन आहे. Varsha Ingole Bele -
कोचईच्या पानांची मोकळी भाजी (aluchi bhaji recipe in marathi)
काय मैत्रिणींनो दचकलात ना कोचई पाने हे नाव बहुतेक तुम्हा सगळ्यांसाठी नवीन असेल.... आश्चर्यम ,अहो कोचई म्हणजे आपल्या धोप्याची पाने...शुद्ध मराठीत सांगायचं झाल्यास आळूची पाने..जसे हे नाव तुमच्यासाठी नवीन अगदी तसंच आळूची पाने माझ्यासाठी नवीन ,कारण आमच्याकडे आता पण य़ा पानांना "कोचई" अथवा "धोपा" म्हणूनच ओळखल्या जाते. तर अशा या अळूच्या पानांच्या आज तोवर तुम्ही वड्या आवडीने खाल्ल्या असतील ,पण त्या पानांची मोकळी भाजी तितकीच तुम्हाला नक्की आवडेल आणि करायला पण एकदम सोपी आणि साहित्यपण अगदी कमी लागते बर का..... Seema Mate -
अळूवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14 यावेळी अळूवडीची रेसिपी टाकायची म्हटल्यावर आनंद झाला. खूप दिवसांपासून अळूवडीची रेसिपी टाकायचा विचार करीत होते. पण या निमित्तानं टाकतेय. Varsha Ingole Bele -
चुनवड्या (chunvadya recipe in marathi)
दिवाळी झाली ! गोड-धोड खाऊन कंटाळा आला! अशावेळेस काहीतरी चमचमीत तोंडाला झोम्बाणारे जेवण जेवायची हुक्की येते! अशा वेळेस एखादी पारंपारिक रेसिपी बनवली, तर सगळ्यांनाच आवडते.. अशीच ही चुन वड्यांची भाजी! विदर्भात त्यातही वर्धा अमरावती भागाकडे ही भाजी केल्या जाते! चविष्ट आणि घरी असलेल्या पदार्थांपासून, जिभेचे चोचले पुरवणारी ही भाजी , सगळ्यांनाच आवडते! त्यासोबत गरमागरम पोळी किंवा भाकर, कांदा , टोमॅटो आणि लिंबू असले की जेवणाची मजा काही औरच.... Varsha Ingole Bele -
अळूच्या पानांची कुरकुरीत भजी (aluchya pananchi bhaji recipe in marathi)
पावसाळा आणि भजी हे तर ठरलेलच...आज मी मस्त झटपट होणारी कुरकुरीत ,खमंग अशी अळूच्या पानांची भजी बनवली..एकदम मस्त अळूवडी, अळूच फदफद हे करतोच आपण ..पण त्याची भजी पण खूप मस्त होतात. Preeti V. Salvi -
शेवग्याच्या पानांची मोकळी भाजी (shevgyachya panachi mokdi bhaji recipe in marathi)
#Immunity # रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा दृष्टिकोनातून, शेवगा आणि पांढरा कांदा अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे जेवणात यांचा उपयोग आवश्यक आहे. म्हणून मग मी आज शेवग्याच्या पानांची, पांढरा कांदा घालून मोकळी भाजी केली आहे. अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी, झटपट होणारी आणि करायला एकदम सोपी.. तेव्हा बघुया.. Varsha Ingole Bele -
कोंढाळीची कुरकुरीत कांदा भजी (kanda bhaji recipe in marathi)
#KS8#स्ट्रीटफुड कोंढाळी नागपुर जवळच एक गाव.....गाव तसं लहानच पण येथील कांदा भजी मात्र अख्ख्या विदर्भात फेमस .लहानपणी नागपुर ते बुलडाणा असा लाल परीचा प्रवास करताना कोंढाळीला गाडी थांबली की हमखास ही कांद्याची भजी घ्यायचो.अजुनही आठवलं की तोंडाला पाणी सुटतं.ईतकी चविष्ट आहे तेथील ही कांदा भजी......चला तर मग पाहुया ही फेमस रेसिपी..... Supriya Thengadi -
गरमागरम कांदाभजी (kanda bhaji recipe in marathi)
आमचेकडे नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील कांदाभजी प्रसिध्द आहेत. तसे तर भजे हे सर्वमान्य व आवडीचे आहेत. त्यातही पाऊसधारा बरसताना भज्यांपेक्षा चांगली रेसिपी ती काय? पण प्रत्येकाची बनविण्याची पद्धत वेगळी...नाही का? Varsha Ingole Bele -
झटपट पनीर भाजी (Paneer Bhaji Recipe In Marathi)
#LCM1 पनीर हे प्रोटीन युक्त आहे ही भाजी पोळी किंवा पुरी बरोबर पण खाता येते नी करायला पण खुप सोपी आहे Manisha Joshi -
चिवळीच्या भाजीच्या वड्या (chawali bhaji vadi recipe in marathi)
मैत्रिणींनो, चिवळीची भाजी रानभाजी म्हणून ओळखली जाते. उन्हाळ्याच्या दिवसात ही भाजी जास्त वापरली जाते. औषधीयुक्त असल्यामुळे , उष्णता वाढल्यास हाता पायाला ही भाजी चोळतात. ज्याने शरीराला थंडावा मिळतो... तर अशाच भाजीच्या वड्या मी आज केल्या आहे! या वड्या नुसत्याही वाफवून खाता येतात , तळून छान लागतात किंवा त्याची मोकळी भाजी सुद्धा करता येते! तर बघूया आज आपण तळलेल्या वड्या... Varsha Ingole Bele -
बूंदी ची भाजी (boondi chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7सात्विकरेसिपीही एक जैन रेसिपी आहे. पर्युषण वेळी दहा दिवस भाज्या खात नाहीत तेव्हा ही रेसीपी बनवले जाते. व इतर वेळी घरात भाज्या अवेलेबल नसतील तेव्हा पण आपण ही रेसिपी ट्राय करू शकता. चला तर मग करुया बुंदीची भाजी. साहित्य पुढील प्रमाणे. MaithilI Mahajan Jain -
मिश्र डाळींची डाळ भाजी (mishra dalichi bhaji recipe in marathi)
डाळ आणि पालेभाजी मिळून पातळ भाजी केली की विदर्भात त्याला डाळ भाजी म्हणतात. ही भाजी बहुतेक सर्वानाच आवडते. त्यातल्यात्यात भाकरीसोबत खूपच मस्त लागते. त्यासोबत कांदा किंवा घोळाना आणि लोणचे असले की मग जेवणाचे काही विचारायलाच नाही. जेवायला बसलेला माणूस पोटावरून हात फिरवत उठणार हे नक्की..... Varsha Ingole Bele -
लाल माठाची मोकळी भाजी (lal mathachi mokli bhaji recipe in marathi)
#msr #मला बरेच दिवसांनी ही भाजी मिळाली. त्यामुळे मी आज ही मोकळी भाजी केली आहे. छान लागते चवीला,... शिवाय कमी साहित्यात, झटपट होते.. Varsha Ingole Bele -
भोगी स्पेशल / भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)
#EB9#W9जानेवारी महिन्यात मुबलक पीक आलेले असतात.तेव्हा हिवाळ्यात अशी ही भाजी संक्रांती च्या आदल्या दिवशी भोगी असते त्या दिवशी ही भाजी करतात.:-) Anjita Mahajan -
कांद्याची चटणी किंवा भाजी (Kandyachi Bhaji Recipe In Marathi)
#BR2भाजी रेसिपीसकधी घरात भाजी नसेल किंवा इतर भाज्या खायचा कंटाळा आला की, तेव्हा झटपट होणारी ही भाजी आहे.कमी साहित्यात झटपट होणारी ही भाजी आहे. Sujata Gengaje -
शेवग्याच्या पानांची पीठ लावून मोकळी भाजी (shevgyachya pananchi pith laun bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 #शेवगा# मानवाच्या आरोग्यासाठी निसर्गाचे वरदान....याची पाने, फुले आणि फळे, म्हणजे शेंगा, बहुमोल खजिनाच... आ ज या शेवग्याच्या पानांची, भाजी केली आहे मी आज...काय आहे, आमच्या आवारातच शेवग्याचे झाड आहे. त्यामुळे हा खटाटोप...तेव्हा बघुया...पौष्टिक आणि चविष्ट अशी ही भाजी... Varsha Ingole Bele -
कोबीभात (kobibhat recipe in marathi)
खरे तर भाताचे विविध प्रकार , वेगवेगळ्या प्रांतात केल्या जातात . महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत . त्यापैकीच एक कोबीभात ! त्याचीच कृती आज सांगणार आहे....हा गरमागरम भात गरम कढी किंवा मठ्ठ्यासोबत एकदम मस्त लागतो. आणि पोटभरीचा होतो. Varsha Ingole Bele -
मोकळी वांग बटाटा भाजी (vanga batata bhaji recipe in marathi)
#cpm5#week5#रेसिपी_मॅगझीन#वांग_बटाटा_भाजी मी या आधीच एक वांगी बटाटा रस्सा भाजी शेअर केली आहे👉 पण आज या रेसिपी मॅगझीन साठी पुन्हा एकदा ही मोकळी वांग बटाटा भाजी सादर करत आहेत🤗 मोकळी म्हणजे मी या भाजी मध्ये पाणी न घालता बनवलेली आहेत🤗 म्हणून मी या भाजीला मोकळी वांग बटाटा भाजी हे नाव देत आहे👉 Jyotshna Vishal Khadatkar -
खेकडा भजी (bhaji recipe in marathi)
#cooksanp स्वरा ची रेसिपी आहे पहीले कांदा भजी करायचे पण ती कुरकुरीत नाही होत मॅडम ची ही रेसिपी बघितली आणि केली खुप छान झाली कुरकुरीत Tina Vartak -
पनीर भाजी (paneer bhaji recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक_लंच_प्लॅनर#रविवार_पनीर_भाजी पनीर ची भाजी खुप साऱ्या पद्धतीने बनवतात पण मला या पद्धतीने केलेली भाजी खुप आवडते.. लता धानापुने -
नागपुर स्पेशल वडी वांग्याची भाजी (vadi vangyachi bhaji recipe in marathi)
#ks3#विदर्भनागपुर स्पेशल वडी वांग्या ची भाजीउन्हाळा आला की उन्हाळात मूग डाळीची वडी उडदाची वडी आणि पापड, कुरडया ,शेवया, सरगुंडे असं वर्षभरासाठी साठवून ठेवतो उन्हाळ्यात भाजीचा खूप विचार येतो ,आणि तेव्हा हे वड्या ची भाजी नागपूरला खरोखरी असते, नागपूरला लग्नात पण हळदीचा जेवणाला वडी वांग्याची भाजी असते, चला बघूया वडी वांग्याची भाजी ची रेसिपी Mamta Bhandakkar -
अळूवडी ची रस्सा भाजी (aluvadi rassa bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14आळू किंवा धोप्या ची पाने यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येतो. या पानांच्या बेसन किंवा इतर पीठ लावून वड्या करतात .किंवा अळूच्या पानांची डाळ भाजी सुद्धा चांगली होते .अशा या पानांच्या वड्याची भाजी सुद्धा खूप छान होते. यापूर्वी मी अळूवड्या ची मोकळी भाजी ची रेसिपी दिलेली होती .आता या वड्याची रस्सा भाजी केलेली आहे. ती तुम्हाला नक्कीच आवडेल. Varsha Ingole Bele -
पापड भाजी...नगर स्पेशल (papad bhaji recipe in marathi)
#KS2अहमदनगर ला मिळणाऱ्या स्ट्रीट फूड पैकी माझी सगळ्यात आवडती डिश म्हणजे पापड भाजी.चटपटीत अशी ही पापड भाजी करायला सोप्पी आणि सगळ्यांना आवडेल अशी आहे. Preeti V. Salvi -
अळूच्या पानांची भजी.(Aluchya Paanachi Bhajji Recipe In Marathi)
#GSR.. नेहमी आपण अळू वडी करतो. पण आज मी अळूच्या पानांची भजी केली आहेत. म्हणजे,काय झाले, आणलेली पाने शिळी झाली. त्यामुळे त्याच्या वड्या करण्याची इच्छा झाली नाही. मग, सरळ ती पाने चिरून, बेसनात टाकून, भजी केलीत. मस्त झालीत. बाप्पाला नैवद्य पण झाला... Varsha Ingole Bele -
आळुवडी (aluvadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #आळुवडीआळु वडी हा पश्चिम महाराष्ट्रातला पारंपारिक खाद्यपदार्थ आहे. Shilpa Limbkar -
खेकडा भजी (khekda bhaji recipe in marathi)
#KS6#जत्रा/यात्राभारतीय समाज व्यवस्थेमध्ये जत्रांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे आजही एकविसाव्या शतकात जत्रेची लोकप्रियता टिकून आहे. जत्रा हे भारतीय ग्रामीण समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असून, या लोकप्रिय संस्कृतीची लोकप्रियता आपल्याला महाराष्ट्रातील घराघरात भिंतीवर टांगून ठेवलेल्या दिनदर्शिके वरील गावोगावच्या जत्रे विषयक दिलेल्या माहितीवरून लक्षात येते. जत्रा ही सामाजिक, सांस्कृतिक इतिहास सांगणारे महत्त्वाचे स्त्रोत आहे..वेगवेगळ्या कबरी, समाधी, शीलालेख, जुने मंदिर, संगम, राजाचे थडगे अशा स्थानाजवळ जत्रा भरली जाते.जत्रा चा कालावधी दोन दिवसापासून ते 15 दिवसांपर्यंत असतो. गाव जत्रेची संस्कृती ही अत्यंत लोकप्रिय सांस्कृतिक व्यवहार असून, ती महाराष्ट्रात व भारतात सर्वत्र आढळून येते. जत्रेच्या काळात त्या त्या देवतेचे विशेष पुजोपचार होतात...मैत्रिणींनो जत्रा म्हंटली की खाद्यपदार्थांची रेलचेल ही असतेच असते. जत्रेमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद त्या-त्या जागेनुसार तिथल्या खाद्य संस्कृतीनुसार आपल्याला घेता येतो. पण कुठलीही जत्रा असो, तिथे एक कॉमन पदार्थ हा असतोच असतो आणि तो म्हणजे *खेकडा भजी* .. जत्रेतील गरमागरम खेकड्या भज्याची मजा काही औरच असते. नाही का..चला तर मग करूया *खेकडा भजी*... 💃 💕 Vasudha Gudhe -
चिऊची भाजी / घोळ भाजी (Chavaichi bhaji or ghol chi bhaji recipe in marathi)
#msr#रानभाजी_चिवळचिऊची भाजी म्हणजे चिवळ / घोळ भाजी शीतल, ग्राही, शोथहर आणि रक्तशुद्धी करणारी आहे. रक्तपित्तात ही भाजी प्रशस्त तर ज्वरात पथ्यकर आहे. चिवळीची भाजी शरीरातील उष्णता कमी करणारी व लघवी साफ होण्यासाठी उपयुक्त आहे. लघवीची, हातापायांची व डोळ्यांची होणारी जळजळ चिवळच्या भाजीने कमी होते. आज आपण याची भाजी कशी बनवायची ते बघूया 😊 Vandana Shelar -
विदर्भ स्पेशल चवळीची मोकडी भाजी (chavlichi mokdi bhaji recipe in marathi)
#ks3विदर्भ स्पेशल चवळी ची मोकळी भाजीचवळीची भाजी विशेष करून उन्हाळ्यात मिळते आणि हे आरोग्यासाठी खूप पौष्टिक राहते, यात काही ही मसाले पडत नाही फक्त लाल मिरच्या आणि कांद्याची फोडणी असते चला मंग रेसिपी बघूया Mamta Bhandakkar -
कढिपत्ता पुदिना पकोडे (Kadipata Pudina Pakode Recipe In Marathi)
कांदा भजी तर आपण नेहमीच खातो पण आज आपण बनवूयात कढिपत्ता आणि पुदिना कांद्यासोबत घालून भजी. हि भजी एकदम मस्त चवीला लागतात. Supriya Devkar
More Recipes
- "बर्ड नेस्ट" (bird nest recipe in marathi)
- बिस्कीट मोदक (biscuit modak recipe in marathi)
- वेनिला हार्ट कुकिज् (vanilla heart cookies recipe in marathi)
- पूर्णान्न आप्पे (purnanna appe recipe in marathi)
- व्हॅनिला हर्ट कूकीज,डेरीमिल्क स्टफ कूकीज (vanilla heart &dairy milk stuff cookies recipe in marathi)
टिप्पण्या