कोंबडी वडे (भोकाचे वडे) (kombdi vade recipe in marathi)

Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
Mumbai

#cr
पाचकळशी पद्धतीचे पारंपारीक वडे... सणावाराला मुख्यत: गौरी पूजन व दिवाळी ला (नॉन-व्हेज खायच्या दिवशी) माझ्या माहेरी हेच वडे बनतात....

कोंबडी वडे (भोकाचे वडे) (kombdi vade recipe in marathi)

#cr
पाचकळशी पद्धतीचे पारंपारीक वडे... सणावाराला मुख्यत: गौरी पूजन व दिवाळी ला (नॉन-व्हेज खायच्या दिवशी) माझ्या माहेरी हेच वडे बनतात....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

overnight
4 सर्व्हिंग्ज
  1. भोकाचे वडे
  2. 1 कपतांदळाचा रवा
  3. 1 कपउडीद डाळीचा रवा
  4. 1 मुठ भरबारिक रवा
  5. 4-5 चमचेदही
  6. १५-२० दाणे काळे मिरी
  7. 1 चमचाजीरे
  8. कोमट पाणी गरजेनुसार
  9. मीठ चवीनुसार
  10. कोंबडी रस्सा
  11. ५०० ग्राम चिकन
  12. 2 चमचेमिरची पावडर
  13. 2-3 चमचेपाचकळशी मसाला
  14. 1 चमचाहळद
  15. 4मध्यम कांदे (बारिक चिरलेले)
  16. 2 चमचेआलं - लसूण पेस्ट
  17. मीठ चवीनुसार
  18. तेल, पाणी गरजेनुसार

कुकिंग सूचना

overnight
  1. 1

    तांदळाचा रवा, उडीद डाळ, काळे मिरी व जीरे मिक्सरच्या भांड्यात बारीक दळून घ्या (पाणी न घालता)

  2. 2

    एका परातीत वरील दळण काढून घ्या. थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या. (थालिपीठा पेक्षा घट्ट मळावे. प्लासटिकच्या पिशवी वर थापता आले पाहिजेत.

  3. 3

    वरील मळलेले पीठ रात्रभर झाकण ठेवून गरम ठिकाणी फुलु द्या.

  4. 4

    दुसर्या दिवशी सकाळी त्यात चवीनुसार मीठ पीठ घालावे व परत मळून घ्यावे.

  5. 5

    प्लास्टिक ची पिशवी (तेलाची, तूपाची, इ.) कापून पूर्ण उघडावी. वड्याचे पीठाचा गोळा घ्यावा व पिशवी वर ठेवून पाण्याचा हात घेऊन गोल थापावा. त्याला मध्ये भोक करावे.

  6. 6

    एका कढईत तेल घ्यावे व चांगले तापवून घ्यावे. एक-एक वडा गरम तेलात टाकून पुरी सारखा तळून घ्यावा.

  7. 7

    चिकन रस्सा बनवण्यासाठी एका पातेल्यात चिकनला हळद, मीठ, मिरची पावडर व मसाला लावून ठेवावा.

  8. 8

    एका भांड्यात तेल घ्यावे. त्यात बारिक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. त्यात आलं-लसूण पेस्ट घालावी व हरवस वास निघून जाई पर्यंत परतून घ्यावे.

  9. 9

    तळलेल्या कांद्यात मसाला लावलेली चिकन घालून चांगले परतावे.

  10. 10

    गरजेनुसार पाणी घालून चिकन व्यवस्थित शिजवून घ्यावी. वरून कोथिंबीर घालून भोकाच्या वड्यां बरोबर गरम गरम सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Yadnya Desai
Yadnya Desai @Kitchen_Yadnya
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes