मालवणी कोंबडी वडे,चिकन मसाला (kombdi vade chicken masala recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#cr
#काॅम्बोरेसिपीज

मालवण किंवा कोकणात सूप्रसिद्ध म्हणून ओळखले जाणारे हे खमंग 'कोंबडी वडे'
चिकनच्या रश्श्यासोबत खाल्ल्याने जेवणाची शान वाढवतात...😊
पाहूयात ,मालवणी कोंबडी वडे आणि
मालवणी चिकन मसाला .

मालवणी कोंबडी वडे,चिकन मसाला (kombdi vade chicken masala recipe in marathi)

#cr
#काॅम्बोरेसिपीज

मालवण किंवा कोकणात सूप्रसिद्ध म्हणून ओळखले जाणारे हे खमंग 'कोंबडी वडे'
चिकनच्या रश्श्यासोबत खाल्ल्याने जेवणाची शान वाढवतात...😊
पाहूयात ,मालवणी कोंबडी वडे आणि
मालवणी चिकन मसाला .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ ते ५ सर्व्हिं
  1. 1किलो चिकन स्वच्छ केलेले
  2. 1 कपसुके खोबरे
  3. 2कांदे उभे चिरून
  4. 1/2 कपओले खोबरे
  5. 1कांदा बारीक चिरून
  6. 2तमालपत्र
  7. 1 टेबलस्पूनमालवणी मसाला
  8. 1/2 टीस्पून हळद
  9. मीठ चवीनुसार
  10. फ्रेश गरम मसाल्यासाठी
  11. 1/4 कपधणे
  12. 1/2 टेबलस्पूनकाळिमिरी
  13. 5लवंग
  14. 1/2 टेबलस्पूनखसखस
  15. 1/2 टेबलस्पूनबडीशेप
  16. तुकडा दालचिनी
  17. 1/2 कपलसूण पेस्ट
  18. कोथिंबीर
  19. पाणी गरजेनुसार
  20. वड्यासाठी लागणारे साहित्य
  21. 2 कपतांदळाचं पीठ
  22. 1/2 कपज्वारीचे पीठ
  23. 1/4 कपगहू पीठ
  24. 1/4 कपबेसन
  25. 1/4 कपउडीदडाळ
  26. 1 टीस्पूनमेथीदाणे
  27. 1/4 कपकप धणे
  28. 5काळिमिरी
  29. गरम पाणी गरजेनुसार
  30. मीठ
  31. 1/2 टीस्पूनहळद

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    चिकनला आलं लसूण पेस्ट लावून ठेवा.

  2. 2

    वाटणासाठी कांदा, सुके खोबरे,ओले खोबरे छान लालसर भाजून घ्या. गरम मसाला सुद्धा थोडं तेल टाकून भाजून घ्या.

  3. 3

    गरम मसाला मिक्सरमधे वाटून घ्या.
    कांदा खोबरे सुद्धा थोडं पाणी घालून वाटून घ्या.

  4. 4

    कढईत तेल गरम करून त्यात तमालपत्र,कांदा परतून घ्या. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतावे. नंतर त्यात वरील सर्व मसाले,वाटलेला गरम मसाला,मीठ, घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या.

  5. 5

    ग्रेव्ही छान परतून घ्या. नंतर त्यात चिकन घालून अंदाजे पाणी घालून चिकन छान शिजू द्यावे.

  6. 6

    मालवणी चिकन तय्यार...😋😋

  7. 7

    वड्यासाठी उडीदडाळ, मेथीदाणे २ तास भिजवून घ्या. नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या.

  8. 8

    पॅनमध्ये धणे,काळिमिरी छान भाजून घ्या.आणि बारीक पूड करा.

  9. 9

    बाऊलमधे सर्व पिठं, उडीदडाळ पेस्ट,वाटलेला मसाला, मीठ,हळद,कोमट पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या.

  10. 10

    प्लॅस्टिक शीटला तेल लावून वडे‌थापून गरम तेलात वडे तळून ठेवा‌.

  11. 11

    गरमागरम वडे चिकन मसाला सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

टिप्पण्या (4)

Bhakti Chavan
Bhakti Chavan @BhaktiC_3728
Zabardast !! Presenation is outstanding
(संपादित)

Similar Recipes