कुळदाच पिठलं व तांदळाची भाकरी (kuldach pithla v tandalachi bhakhri recipe in marathi)

Mrs. Snehal Rohidas Rawool
Mrs. Snehal Rohidas Rawool @cook_29139601
नायगाव - वसई

कोकणात साधं जेवण म्हणून ओळखल जाणार म्हणजे पिठलं व भाकरी
#KS1

कुळदाच पिठलं व तांदळाची भाकरी (kuldach pithla v tandalachi bhakhri recipe in marathi)

कोकणात साधं जेवण म्हणून ओळखल जाणार म्हणजे पिठलं व भाकरी
#KS1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
४ लोकांसाठी
  1. भाकरी बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  2. 2 वाट्यातांदळाचे पीठ
  3. चवीनुसारमीठ
  4. 1/2 ग्लासगरम पाणी हवं असल्यास पाणी टाकू शकतात
  5. कुळीद पिठलं साठी लागणारे साहित्य
  6. 4 चमचेकुळीद पीठी
  7. 2 चमचेगरम मसाला
  8. कडीपत्ता
  9. लसूण पाकळ्या
  10. 2 चमचेतेल
  11. 3 चमचेओल खोबर
  12. चवीनुसारमीठ
  13. आवश्यकतेनुसार पाणी
  14. ४-५ कोकम

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    २ वाटी तांदळाचे पीठ घ्यावे. गरम पाण्यात चांगले मळून घ्यावे. मग भाकऱ्या थापून घ्यावा. व गरम तव्यावर टाकून त्या वर वरून पाणी टाकावे. पाणी भाकरीवरील सुकल्यावर भाकरी परतावी. दोन्ही बाजूने चांगली भाजून घ्यावी. गरमा गरम तयार तांदळाची भाकरी

  2. 2

    एका भांड्यात कुळीद पीठ, गरम मसाला, मीठ व हळद व ओल खोबर टाकून त्यात 1 ग्लास पाणी टाकून मिश्रण एक जीव करून घ्यावे.

  3. 3

    मग एक कढई ठेवून त्यात तेल टाकून चांगलं गरम झाल्यावर त्यात प्रथम बारीक ठेचलेला लसूण, कडीपत्ता, बारीक कांदा चांगला परतवून घ्यावा. हे सर्व मंद आचेवर करावे. मग त्यात वरील मिश्रण टाकावे. चांगले ढवळून घ्यावे. पिठलं चांगलं उकळल्यानंतर त्यात कोकम टाकून गॅस बंद करावे.

  4. 4

    अश्या प्रकारे गरमा गरम पिठलं व भाकरी तयार. सोबत सफेद कांदा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs. Snehal Rohidas Rawool
रोजी
नायगाव - वसई

टिप्पण्या

Similar Recipes