पावट्याची उसळ व तांदूळाची भाकरी (pavtyachi usal v tandalachi bhakhri recipe in marathi)kjki

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#KS1 कोकण म्हंटल की तांदूळचे पीक त्याच बरोबर पावट्याचे पीक सुद्धा घेतात. मग भाकरी आणि पावट्याची उसळ मस्त बेत जमतो. कोकणात प्रत्येक घरात तांदुळाची भाकरी होतेच होते.

पावट्याची उसळ व तांदूळाची भाकरी (pavtyachi usal v tandalachi bhakhri recipe in marathi)kjki

#KS1 कोकण म्हंटल की तांदूळचे पीक त्याच बरोबर पावट्याचे पीक सुद्धा घेतात. मग भाकरी आणि पावट्याची उसळ मस्त बेत जमतो. कोकणात प्रत्येक घरात तांदुळाची भाकरी होतेच होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
2व्यक्तींसाठी
  1. 1 कपपावटे
  2. 2कांदे
  3. 5-6लसूण पाकळया
  4. 4-5काळी मिरी
  5. 4-5लवंगा
  6. 4 टेबलस्पूनकिसलेले सुके खोबरे
  7. 5-6आमसूल
  8. 1 टेबलस्पूनगुळ
  9. 1 टेबलस्पूनजिरें
  10. 1 टेबलस्पूनराई
  11. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  12. 1/2 टेबलस्पूनहळद
  13. 1/2 टेबलस्पूनहिंग
  14. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  15. 2 टेबलस्पूनतेल
  16. आवश्यक्ते नुसार मीठ
  17. 2 कपभाकरी साठी तांदुळाचे पीठ

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    पावटे 10 -11तास भिजत घालून नंतर शिजवून घ्यावेत

  2. 2

    एक कांदा उभा चीरुन घ्यावा. लसूण सोलून घ्यावा. खोबरे किसून घ्यावे. त्यात खडा मसाला घालून सर्व एका पॅन मध्ये थोडं तेल घेऊन गॅसवर मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावे. थंड झाल्यावर मिक्सर मधून वाटून घ्यावे.

  3. 3
  4. 4

    शिजवलेल्या पावट्याना मिक्सर मधून वाटलेला मसाला लावावा. त्यात सर्व मसाले घालावे. मीठ घालावे आणि सर्व मिक्स करून घ्यावे.

  5. 5

    गॅसवर मध्यम आचेवर एका पॅनमध्ये तेल घालून त्यात राई जिरें घालावे. ते तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून तो तांबूस होई पर्यंत परतावा. त्यात मसाला लावलेले पावटे घालावे. कोकम, मीठ व गुळ घालून आवश्यक तेवढे पाणी घालून उकळवून घ्यावे. पावट्याची उसळ तयार.वरून कोथिंबीर घालावी.

  6. 6

    भाकरी चे पीठ परातीत घेऊन त्यात आवश्यक तेवढे पाणी घालून चांगले मळून घ्यावे. मळलेल्या पिठाची कोरड्या पिठावर भाकरी थापून घ्या.

  7. 7

    थापलेली भाकरी तव्यावर ज्या बाजूने थापतो ती बाजू तव्यावर टाकावी. पीठ लावलेली बाजू वर ठेवावी. त्यावर पाणी लावावे.

  8. 8

    तीन चार मिनिटांनी भाकरी उलटून दुसऱ्या बाजूने शेकून घ्यावी. दोन्ही बाजूनी तव्यावर शेकल्यावर तवा काढून भाकरी गॅसवर दोन्ही बाजूनी भाजून घ्यावी. भाकरी तयार. पावट्याच्या उसळी बरोबर सर्व करावी.

  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes